Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे गणराज्य की धनराज्य?

ग — गंगाधर मुटे, Wed, 08/17/2011 - 18:16
हे गणराज्य की धनराज्य? प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!! एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!! डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!! विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही...!! गंगाधर मुटे .................................................................... (पूर्व प्रकाशित कविता - रानमेवा काव्यसंग्रह ) ....................................................................

प्रतिक्रिया द्या
1074 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रकाश१११ Fri, 08/19/2011 - 18:03 नवीन
गंगाधर मुटेजी-मस्त कविता. एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!! आवडली ..!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा