पाककृती

खजुराचे लाडू

Primary tabs

साहित्यः अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्‍याचा किस. ५० ग्रॅम बदाम २ छोटे चमचे खसखस ३ चमचे तुप पाककृती: खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. Image removed. बदाम कापुन घ्या. खसखस निवडून घ्या. Image removed. खोबर्‍याचा किस मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या. Image removed. आता भांड्यात तुप घालुन ते गरम झाले की खसखस घाला. मग त्यावर बाकिचे सगळे साहित्य म्हणजे खजुर, बदाम आणि भाजलेल खोबर घाला. Image removed. आता हे सगळ मिश्रण ५ ते ७ मिनिटे म्हणजे चांगले गरम होईपर्यंत मिडीयम गॅसवर ठेवा. जास्त शिजवण्याची गरज नाही. Image removed. भांडे खाली उतरवा व लाडू वळा. झाले लगेच तय्यार पौष्टीक, लज्जतदार, सोप्पे खजुराचे लाडू. Image removed. Image removed. अधिक टिपा: ह्याच साहित्याच्या खजुराच्या वड्या व रोलही करु शकता. हे लाडू करायला अगदी सोप्पे असतात. थंड गरम कसेही वळता येतात. खजुराच्या मऊपणामुळे ते पटकन वळतात. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकु शकता. बाळींतिणिंसाठी पौष्टीक.
चिंतामणी

फोटो आणि पाकृ छान.

खूप दिवसांनी गोड पदार्थाची पाकृ आल्याने बरे वाटले.

रेवती

असं कसं म्हणता चिंतुकाका?
गेल्या चार दोन दिवसात आल्यात की नारळी भात आणि करंज्यांच्या पाकृत्या!
आता ही पाकृ कोणाला आवडणार नाही गं जागुतै?;)
आजकाल बाळंतीण स्पेशल पाकृत्या येत आहे म्हणून मजा वाटते आहे.

प्रभो

तूझी मजा वाटून झाली असेल तर माझ्यासाठीचं नारळीपाकाच्या लाडवांचं पार्सल कुठेय? ही सायलंट रिमायंडर आहे ;)

जागूताई, लाडू मस्तच. माझी आई हे सगळं मिक्सरमधून काढून घेते एकदा.

रेवती

माझी आई हे सगळं मिक्सरमधून काढून घेते एकदा
नशीब तेवढा वेळ तरी ते मिश्रण शिल्लक राहतं.
लाडवाबद्दल खरडलय.

शेखर

वा वा !! एकदम छान दिसतात....

पुढच्या वेळी कुंद्याला खजुर आणायला सांगितले पाहिजेत....

छानच.............:)

ए दोन्ही प्लेटमधील तू एकटी खावू नकोस, एक इकडे पाठव ह...

गवि

:) उत्तम..

आमचे राघवदास आणि गूळपापडी पेंडिंग आहेत ते विसरु नको म्हणजे झाले हो ताई.

इरसाल

खजूर आपल्याला कधीही, केंव्हाही , कुठेही चालतो.त्यामुळे टेन औट ऑफ टेन.
लड्डू उठाके अब्बीच खाने का दिल कर ऱ्हां !

जागुताई आवरा बनवताव तेचा करताव काय ?

स्मिता.

मस्तच! माझे आवडते लाडू... मीपण या विकांताला करणार.

जागु

चिंतामणी, रेवती, प्रभो, सानिका, शेखर, निवेदिता ताई, जाई, प्राजक्ता, स्मिता धन्यवाद.

गगनविहारी नाही विसरले नाही. गुळपापडी लवकरात लवकर टाकण्याची व्यवस्था करते. राघवदास साठी दिवाळी पर्यंत थांबावे लागेल.

इरसाल माझ्याकडे ५ डोकी व दिरांकडे ३ डोकी. व अधुन मधुन येणारे पाहूणे. एवढ्यांना संपवायला किती वेळ लागेल ?

५० फक्त

लाडु भारीच हो, पण करणं ठरवलं तर ते शेतात बैलाच्या तोंडाला जाळी बांधुन कामाला लावतात ना तसं करावं लागेल.

अवांतर - पुन्हा एकदा बिनचमच्याची पाक्रु, छे छे छे काय दिवस आलेत चमच्यांना, अरेरे अरेरे.

डावखुरा

ओ काका लाडु खायला काय चमचा लागतो का?

हा घ्या सोन्यचा चमचा आणि आता सांभाळुन ठेवा बरंका...

डावखुरा


आय हाये काय दिसतयेत म्हणुन सांगु....जाउदे प्रतिक्रिया देण्यात वेळ.. नाही घालवत ..

जागु

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

कच्ची कैरी

व्वा !!नणंदबाईंची चांगलीच सेवा चालली आहे ;)मजा आहे बुवा !!