Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(थंड झाले खाकरे गं)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Wed, 08/17/2011 - 22:23
बरेच दिवस खुणावणारी वाचनखूण आज काढता येईल. हुश्श. थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर विसर तो स्वयपाक सारा, गटकूनिया साफ कर वेड लागे मम खिशाला विकतचेही खायला वेड लावे याद मजला, या समोसा खायला यायचे ते का न मजला, अरण्यरूदन बास कर थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर भाजण्याही भाकर्‍या मम दादला आला पुढे फोडण्या या चढविता का ओगराळी खडखडे? ना कुणी तुझ भरवण्याला तू अपेक्षा लाख कर थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर काय जळले, का करपले, शोधिता इथल्या खुणा मी नि माझीच पाककॄती बाकी कुणी काही म्हणा वाट लावू पूर्णब्रह्मी "खाद्यरसिका तूच मर!" थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर दोष कोणा काय देऊ अन्नपूर्णे, सांग ना 'पाकी' जे कौशल्य नाही हा कसा ठरला गुन्हा चाड ना मेहेनतीची, हेच आता मान्य कर थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर खाउनी मग तामसी होईल थोडी बोंबही खर्चुनी नोटा जरा घेईन त्यावर दारूही वेदना संवेदनांची आज काशी केली तर थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर (हे पूर्ण करण्यात मदत करणार्‍या काही मित्रमैत्रीणींचा ऋणनिर्देश करणे अनावश्यक आहे.)

प्रतिक्रिया द्या
8323 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ढ
ढब्बू पैसा Wed, 08/17/2011 - 22:35 नवीन
अदितीबै, खाकरे थंडच खातात त्यामुळे इतकी माफी मागण्याची गरज नाही! अवांतर :फारच आगावू आहेस बै तू! एकाच दिवसात दोन धागे, त्यातला एक विचाप्रवर्तक वेग्रे आणि दुसरं विडंबन! कित्ती कित्ती व्हर्साटाईल आहेस! (विडंबन झक्कास हेवेसांन;) )
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 08/17/2011 - 23:29 नवीन
_/\_!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 08/17/2011 - 23:53 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 08/18/2011 - 00:17 नवीन
:) :) :) :) आले बॉ एकदाचे ;) आमचे एक वरिजनल विडंबन होते, ते अर्धवटच राहिले. मिटिंगांचा खेळ लय वाईट. :( हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर ;)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 08/18/2011 - 00:45 नवीन
येणार येणार, कोणीतरी टाकेल, हातरी नाहीतर तोतरी, असं म्हणत असताना आदिती यांच्याकडून आलं विडंबन. लय भारी. प्रियाली यांना : मी तुमच्या विडंबनाची पुढची ओळ सुचवतो, बघा आवडते का? हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर विसरती ज्येष्ठां सुधा, ढळढळित अपमानपर ह. घ्या. - याचा अर्थ तुम्ही हलकटपणे घ्या असा लावलात तर त्याला मी जबाबदार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/18/2011 - 00:56 नवीन
येणार येणार, कोणीतरी टाकेल, हातरी नाहीतर तोतरी, असं म्हणत असताना आदिती यांच्याकडून आलं विडंबन.
हीतरी नाहीतरी तोतरी म्हणायला हरकत नव्हती. असो, कोटीसाठी इथे माफ करण्यात आल्या गेलं आहे. कवितेत शुद्धलेखनाचं स्वातंत्र्य घेतलं गेलं हे ठीक आहे, पण प्रतिसादात मला आदिती म्हणण्याचा क्षूद्रपणा का बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रियाली गुरुवार, 08/18/2011 - 01:58 नवीन
पुढली ओळ मस्तच होती, हे घ्या आणखी थोडे पण वेळेअभावी एक ओळ सुचत नाही. सुचवता का? पण हा प्रतिसाद उडण्याची शक्यता आहे हे हलकट्टपणेच सांगते. ;) हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर विसरती ज्येष्ठां सुधा, ढळढळित अपमानपर वेड होते त्या जिवाला मनोगताशी भांडला वेड 'तात्या'ला _____________________ यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. हलकट्ट सारी लेकरे रे, संकेतस्थळा माफ कर गाळलेल्या जागा भरा. तिरक्या अक्षरांतील ओळ तशीच आहे, त्यात बदल नाही. समझनेवालोंको इशारा काफी है| ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पंगा गुरुवार, 08/18/2011 - 01:08 नवीन
का ते सांगणे कठीण आहे, पण मजा आली नाही. कसेही जुळवायचेच म्हणून उगाच ओढूनताणून जुळवल्यासारखे वाटले. एक उदाहरणच घ्यायचे झाले, तर 'वाट लावू पूर्णब्रह्मी'ला 'भाडखाऊ लोकशाही'चा ठसका नाही, शिवाय त्याच्या जवळपासही जात नाही. (भकारादि शब्द असलाच पाहिजे असे म्हणणे नाही, किंबहुना त्याचे खास आकर्षणही नाही, पण मूळ कवितेत वापरलेल्या शब्दाची केवळ ध्वनिसाधर्म्याने आठवण करून देऊ शकणारा एखादा शक्यतो भकारादि क्याटेगरीत न मोडणारा परंतु तितकाच ठसकेबाज शब्द वापरता आला असता, तर कौशल्य दिसते. असा कोणता शब्द वापरता येईल तो मी सुचवू शकणार नाही, ती माझ्या बस, झुकझुकगाडी, जहाज किंवा विमानाची बात नाही. ती डोकेदुखी कवयित्रीची.) बाकी तांत्रिकदृष्ट्या वृत्तात वगैरे ठिकठिकाणी गंडले आहे, ते वेगळेच. एकंदरीत काही खास वाटले नाही. पुविशु. (अवांतर: मिपावर सध्या एक बुज़ुर्ग विडंबनसम्राज्ञी तूर्तास सुप्तावस्थेत आहेत. त्यांनी मनावर घ्यायचे ठरवलेच तर बहार आणू शकतील असे वाटते. चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/18/2011 - 19:22 नवीन
आक्षेप मान्य आहे.
'वाट लावू पूर्णब्रह्मी'ला 'भाडखाऊ लोकशाही'चा ठसका नाही, शिवाय त्याच्या जवळपासही जात नाही
'काड्याघालू' वगैरे शब्द सुचले होते. पण मात्रांचा घोळ होतो ना. असो, स्वतःलाच पुविशु देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
श
शुचि गुरुवार, 08/18/2011 - 01:22 नवीन
आत्तापर्यंत सर्वात आवडलेली कविता :) छान लिहीली आहेस आदिती.
  • Log in or register to post comments
श
शहराजाद गुरुवार, 08/18/2011 - 03:15 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/18/2011 - 04:21 नवीन
शंका: खाकरे हा प्रकार थंडच खातात (थंड याच अर्थ तव्यावरून उतरवून बराच वेळ झाला आहे असे.): अवांतर: अरे अरे अरे.... स्वतन्त्र प्रतिभेच्या व्यक्तीमत्वावर विडंबनासारख्या परोपजिवी प्रकार हाताळण्याची वेळ यावी? स्वगतः बिचार्‍या घासु गुर्जीनी तरी कशाकशाला म्हणून "लै भारी" असे म्हणायचे ?
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 08/18/2011 - 07:32 नवीन
छाण...........
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 08/18/2011 - 07:43 नवीन
*&^%$#%&*(* असो!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 08/18/2011 - 07:44 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 08/18/2011 - 09:26 नवीन
__/\__ आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/18/2011 - 09:36 नवीन
अदिती, घासुगुर्जी, प्रियाली : _/\_
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 08/18/2011 - 10:31 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/18/2011 - 10:59 नवीन
लगे रहो....ठपाठप....ठपाठप....:smile:
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 08/18/2011 - 13:21 नवीन
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर विसर तो स्वयपाक सारा, गटकूनिया साफ कर झाल .. पुढच काही वाचायची गरजच नाही!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/18/2011 - 15:00 नवीन
मंद काही अनिवासी सॅमकाका माफ कर... ह्या विडंबनाचे पुढे काय झाले ?
  • Log in or register to post comments
र
रमताराम गुरुवार, 08/18/2011 - 16:54 नवीन
दुरुस्ती करू का जरा? नवश्रीमंत या शब्दाप्रमाणेच 'नवअनिवासी' असा शब्दप्रयोग सुचवू का? (अदिती दूरदेशी असल्याने मार टाळता येत असल्यानेच हे धाडस करतो आहे. ) (हलकेच घे गं, नायतर तिकडून सुपारी देशील माझी. शाब्दिक कोटी करण्याची उबळ आली की आमचा अगदी पुल होतो, स्थळकाळाचे म्हणा की कोणाशी पंगा घेतोय त्याचे भान रहात नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/18/2011 - 16:57 नवीन
नाही, माझी अजिबात हरकत नाही. पण मात्रा हुकतात ना! आता मूळ कवितेतल्या मात्र मोजताना माझं गणित हुकलं ते तर ठीकच, पण आता तुझी सूचना आहे तर तूच लिही की दोन चार ओळी! बाकी मी तशी हिंसक नाहीच, उरता उरले शाब्दिक फटाके, ते काय दूरदेशातूनही फोडता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
र
रमताराम गुरुवार, 08/18/2011 - 19:04 नवीन
आता तुझी सूचना आहे तर तूच लिही की दोन चार ओळी! मी?....मी??...मी कविता लिहू.... एकदम कविता??? नाही म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात ते मान्य आहे, पण एवढाही काही 'हा' झालो नाही मी. आपली कविता लिहिण्याची लायकी आपल्याला ठाऊक आहे. काही जालकविता वाचून हा सुज्ञपणा आणखी काही लोकात असता तर कित्ती बरं झालं असतं असा विचार चाटून जातो. (अर्थात हा टोमणा तुला नाही हे वे. सां. न. ल.) आणि मात्रांचे म्हणाल तर आता या वयात आमचा संबंध फक्त 'सूतशेखर' किंवा तत्सम मात्रेशी. पण एखाद्या वैयाकरणाला विचारलेस तर तो लगेच 'नवअनिवासी' ऐवजी 'नवऽनिवासी' असा शब्द वापरून एक मात्रा कशी वाचते ते समजावून सांगेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/18/2011 - 23:29 नवीन
मंद सारे अनिवासी सॅमकाका माफ कर बदल व्हीजा नियम आता जाळुनीया राख कर वेड लावे आयटी अन गोरटेली यौवना वेड कसले रॅटरेसच, थांबला तो संपला जायचे हरित देशी, आणि म्हणणे 'फॉर हियर' मंद सारे अनिवासी सॅमकाका माफ कर पुढचं कोण लिहीणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रभो गुरुवार, 08/18/2011 - 15:20 नवीन
खंगरी!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 08/18/2011 - 15:26 नवीन
प्रयत्नातून बनलेला खुसखुशीत खाकरा आवडला! ;) बाकी मदत करणार्‍यांच्या ऋणात कायम राहण्यासाठी त्यांचा निर्देश न करणं ही आदितीची कल्पना आवडली! ;) (खाकरेप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 08/18/2011 - 15:29 नवीन
बाकी मदत करणार्‍यांच्या ऋणात कायम राहण्यासाठी त्यांचा निर्देश न करणं ही आदितीची कल्पना आवडली!
अं.. उह उह! (खाकरले... खाकरण्याचा आवाज कसा लिहायचा हे माहित नसल्याने जे लिहिले ते गोड मानून घ्यावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 08/18/2011 - 15:32 नवीन
असा केला तरी चालले असते आम्ही समजून घेतले असते! ;) (समजूतदार्)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
कवितानागेश गुरुवार, 08/18/2011 - 16:11 नवीन
:D
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 08/18/2011 - 17:26 नवीन
खाकरा स्वतः खायची वेळ आली? मला वाटलं नवरा हा असल्या प्रयोगांसाठी असतो!!
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 08/19/2011 - 09:17 नवीन
आपण वर्षातून एकदा का होईना स्वयंपाक करतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! ;-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा