जे न देखे रवी...

गुलाबाचा सण

Primary tabs

वर्ष एक झाल सखे
गुलाबाचा सण होता
दोन मने जोड्णारा
एक वेडा क्षण होता

फुललेल्या गुलाबाला
एक फुल दिल होत
लाजुनिया फुल वेड
बावरुन गेल होत

मनामध्ये होती भीती
काटे त्याचे बोचतिल
नकाराचे शब्द तिचे
कायमचे टोचतील

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

वर्ष एक गेल कस
कळलच नाही काही
गुलाबाच्या गंधातच
गुंतुनिया मन राही

चेतन

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं

पुलेशु

(काटे टोचण्याला घबरणारा) चेतन

अरुण मनोहर

चेतन --->
पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं

सुचवू का?
पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
माझे फुल वेडे वाटे

कसे???

फटू

फुललेल्या गुलाबाला
एक फुल दिल होत
लाजुनिया फुल वेड
बावरुन गेल होत

खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

हे मस्तच.....

(गोड-गुलाबी)
मदनबाण.....

वरदा

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे


मस्तं....