Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उहापोह

न — निनाव, गुरुवार, 08/18/2011 - 15:59
झिजलेल्या काठची माती गिळून विस्तारणारे तळे ऊंच लाटांमधल्या रागाचे सुटणारे संयमाचे कडे पाउस न पडताच मातीतली दडपण पाउलवाटे वरची विचारांची वण्-वण! पानगळीतल्या गीतात नव्या पालवी चे स्वर न बदळणार्या रीतीं वर बदळणारे अगणित मत! ओळखीचे भाव अनोळखी चेहर्‍यांवर भिंत्यांवरची ओल उतरते हळुच फरशी वर खिडक्यांवर डोकावते सुंदर पानांची वेल नव्-आकृतीत जागा शोधण्याचे खेळ! परिस्थिती? कि मात्र एक क्षण? अभिव्यक्ति? कि मात्र एक अनुभव? खेळ? योगा-योग? कि भाग्यच हे? बहुतेक, नकळत मनावर उठणारे वण!

प्रतिक्रिया द्या
1592 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ग
गणेशा गुरुवार, 08/18/2011 - 16:14 नवीन
कविता आवडली..
झिजलेल्या काठची माती गिळून विस्तारणारे तळे ऊंच लाटांमधल्या रागाचे सुटणारे संयमाचे कडे
मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/18/2011 - 16:36 नवीन
आवडली कविता. अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ध
धन्या गुरुवार, 08/18/2011 - 16:44 नवीन
छान कविता...
न बदलणार्‍या रीतीं वर बदलणारे अगणित मत!
हे बाकी अगदी खरं आहे... सध्या चालू असलेल्या चर्चांवरुनही हे लक्षात येतं :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 08/18/2011 - 17:04 नवीन
निनाव -काय बोलू.मस्त जमलीय ..!!
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 08/18/2011 - 17:37 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 08/18/2011 - 18:00 नवीन
कविता आवडली. पाण्याची, मातीची, पाऊलवाटांची रूपकं छानच. शेवटच्या कडव्यांत या रूपकांचा त्याग केला आहे. तो थोडासा खटकतो, पण कदाचित कवीने ते जाणूनबुजून केलं असाव. अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 08/18/2011 - 18:29 नवीन
कविता आवडली. "विचारांची वण् वण" आणि "मनावर उठणारे वण" यांची जोडी अजून आजमावतो आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 08/19/2011 - 09:18 नवीन
तुम्हा सर्वांचे खूप आभार! आ. निनाव.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा