२६ जुलै २००५ एक अनुभव !!
💬 प्रतिसाद
(6)
व
विसोबा खेचर
Mon, 05/26/2008 - 11:03
नवीन
केळकरसाहेब,
सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे.
२६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...!
मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार!
मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता!
एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्याजाणार्यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती!
असो...
आपला,
(मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 05/26/2008 - 11:58
नवीन
अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये)
मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Mon, 05/26/2008 - 13:44
नवीन
खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी.
मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये
सहमत
आपला
(नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर
- Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ
Mon, 05/26/2008 - 19:49
नवीन
त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती.
़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.
- Log in or register to post comments
श
शितल
Tue, 05/27/2008 - 01:21
नवीन
टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे.
तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 05/27/2008 - 05:18
नवीन
हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता.....
सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले..
बसचा प्रवास सुरु झाला....
प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का?
वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता..
ऑफिस मधल्या सहकार्यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!!
माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके..
बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले
अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण..
एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो....
ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!!
शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला...
पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :)
मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए.....
(अती बडबड्या)
मदनबाण.....
- Log in or register to post comments