Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धिक्कार हो!

द — दैत्य, गुरुवार, 08/18/2011 - 20:54
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती भिकार ते दिवाळीतले फटाके जे ऊजळती राहून तुझ्या संगती भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू लेखणी सुतकी रडू लागली वासना तुझ्या विनोदी झुरळ ते वहाणही कच खाऊ लागली जोहार हे जगणे तुझे अन न मागताच तू मुंडके दिले सशाचे फुकाचे हृदय तुझे अन ढगाने मदाने हसूं पाहिले पाटच्या पाण्यातसुद्धा रंग तुजला दिसला खूनाचा वारही तूच केलेस अन खर्चही मागशी आता वेदनांचा प्रेम जे केलेस तेही चोरट्यांना भरपूर दिसले मद्य जे प्यालेस तेही शंभरांना आधीच प्याले प्रार्थना जशी तुझी ती भज्यांवरची माशीच की कंटाळूनी तो हाकली देवही शिळे लपविण्या त्यासही यत्न की अंगारे धुपारे दुपारी सुपारी फोटोतही दिवा तूच लावला विजांच्या कडाक्यातही त्या अंधारही तूच की कमावला का उगाच्या फुशारक्या अन काय तू दिलेस ह्या धरेला का म्हणशी सूर्यास ह्या आंधळा ग्रहण जे लागले तुझ्या डोळा सावकारी हा रथ निघाला तू बैलजोडी ही कोडगी आसूडांचा पाऊस पडला का साहसी सर्व हे, फोड की धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती अंतरिक्षात सुस्नात बालक तुझे अन का दाबशी घशात स्वतःच्या माती ? -दैत्य (ऑगस्ट १८, २०११)

प्रतिक्रिया द्या
1076 वाचन

💬 प्रतिसाद (1)
य
यकु गुरुवार, 08/18/2011 - 21:25 नवीन
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा
Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा