Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी पुरुष बिच्चारा

ग — गणेशा, Fri, 08/19/2011 - 12:23
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा तरी एकदा बघा सभेत मी मलाच बिच्चारा म्हंटलो तर पहातो काय स्त्रीयांचा हंडा मोर्चा अंगावर धावून आला कारण काय म्हणे तर अबले पणावर त्यांच्या आम्ही घाला घातला आता कसले काय घरातला हंडा ही सावधानतेने घेतो नळाखाली हळूच लावून लोकमत ची सखी अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो काय करणार मी पुरुष बिच्चारा -------- शब्दमेघ नोट : कविता पुनःप्रकाशित.

प्रतिक्रिया द्या
2376 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ग
गणपा Fri, 08/19/2011 - 12:45 नवीन
------- शब्दमेघ गणुत्सु कस वाटतेय ;)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 08/19/2011 - 12:51 नवीन
कवितेचे पण विडंबन (बळेच ओढुन ताणुन केलेले) न आवडणारा मी .. उगा नावाचे विडंबन कश्यापायी भाउ. आणि गणुत्सु असे कसे होयीन .. कारण माझ्या कित्येक कविता ह्या स्त्रीच्या आहेत.. आणि पुरुषाची ही एकुलती एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Fri, 08/19/2011 - 13:03 नवीन
मी या कविते बद्दलच म्हटलं रे. तुला का मी ओळखत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
किसन शिंदे Fri, 08/19/2011 - 13:06 नवीन
'लाईनमन' या शब्दाचा दुसरा अर्थ असाही निघतो हे आज पहिल्यांदाच कळतंय.. बाकी कविता मस्तच..!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 08/19/2011 - 13:14 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 08/19/2011 - 14:04 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/19/2011 - 16:08 नवीन
एक नंबर कविता रे. आवडली. अवांतरः
लोकमत ची सखी अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
हल्ली गृहशोभिका वाचत नाहीस काय? ;)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 08/19/2011 - 17:17 नवीन
आणि 'चारचौघी'? - एडिटर इन चीफ, 'चारचौघं'. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्राजु Fri, 08/19/2011 - 16:11 नवीन
उगी उगी!!! ;)
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Fri, 08/19/2011 - 17:14 नवीन
:) ह्म्म्म्म
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 08/19/2011 - 17:20 नवीन
चांगली कविता.. गणेशा रॉक्स!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/19/2011 - 17:35 नवीन
आता तू गेलास! येतोय तुझ्यावर हंडामोर्चा. :D
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 08/19/2011 - 19:29 नवीन
वैनींना अजुन दाखवलेली दिसत नाहिए ही कविता! ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 08/19/2011 - 19:37 नवीन
कुणाला काय दाखवायचं ते कळतं त्याला, एक तर वैनी अन दाखवा काय कविता, वैनीनं विचारलं या कवितेचा जन्म कुठं झाला तर काय बोलणार बिचारा पुरुष.
  • Log in or register to post comments
ज
जयनीत Wed, 08/31/2011 - 17:49 नवीन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा .... मस्त......
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा