अहो आण्णा ...
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...
फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात
निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ...
दोन दिवस मी देखील पुरवली माझी मोर्च्याची निषेधाची खाज
५ ची टोपी २० ला विकत घेताना अजिबात बाळगली नाही लाज
उधारीची मेणबत्ती घेऊन काल बर्याच दिवसांनी इतका चाललो
शेवटी थकून २० रुपये ज्यादा देऊन रिक्षेने डायरेक्ट घरी आलो ...
अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार
वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ...
शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत
आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...
- विश्वेश
💬 प्रतिसाद
(12)
ऋ
ऋषिकेश
Sat, 08/20/2011 - 06:19
नवीन
:) आवडले..
कालच "मी अण्णा" अशी टोपी घातलेल्या रिक्षावाल्याने मीटरप्रमाणे भाडे घ्यायला दिलेला नकार ऐकून (योगायोगाने मागुनच येणारी) बस पकडून घरी आलो :)
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Sat, 08/20/2011 - 07:34
नवीन
हा हा हा :)
- Log in or register to post comments
र
रमताराम
Sat, 08/20/2011 - 09:08
नवीन
ऋषिकेशा, तू अंमळ अडाणी आहेस बरे. प्रत्येक जण 'इतरांच्या' भ्रष्टाचाराबाबत आंदोलन करत आहेत. आपण स्वतः व्याख्येनुसार स्वच्छ असतोच.
आणि तसेही गंगेत बुडी मारली की पापक्षालन होते ना मग 'मी अण्णा' म्हटले की मी भ्रष्टाचारमुक्त होतोच. गंगेत पापक्षालन करून आलेले नवी पापे करायला मोकळे होतात हे ठाऊक नाही?
अवांतर: मटामधील सुहास फडकेंचा ब्लॉग वाचलात का?
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 08/26/2011 - 01:14
नवीन
गमतीदार अनुभव!
- Log in or register to post comments
अ
अभय भावे
Sat, 08/20/2011 - 07:16
नवीन
सुन्दर कविता, खरच जर लोकपाल समत झाले तर परिस्थिती सुधारेल का
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 08/20/2011 - 08:16
नवीन
अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार
वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ...
सुंदर... :)
शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत
आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत
अप्रतिम...
परवा गोपाळकाला आहे, त्या निमित्त्याने अण्णा कॉग्रेसची हांडी फोडतील का त्याची वाट बघतोय. ;)
(अण्णांचा समर्थक आणि भ्रष्टाचारानी विटलेला )
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Sat, 08/20/2011 - 08:50
नवीन
अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार
वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ...
सुंदर.. आवडेश !!
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sat, 08/20/2011 - 08:55
नवीन
नेमकेपणाने मांडलेले कटु सत्य
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Sun, 08/21/2011 - 13:10
नवीन
अगदी खरी आहे तुमची कविता!
- Log in or register to post comments
न
निनाव
Mon, 08/22/2011 - 07:38
नवीन
खरंय. पटले. कविते च्या माध्यमाने सर्वांमधे जागरुकता निर्माण करण्याचा आगळाच प्रयत्न.
अर्थात, आपण सर्व नागरिकांनी एकजुट होऊन हताश न होता प्राबळ्य दाखविले पाहिजेच.
इंटरनेट च्या या युगात, हे आंदोलन कदाचित स्वातंत्र आंदोलना सारखे अंगावर रोम उभे करणारे वाटत नसेलही, परंतु डोळे मिटून का जर स्वतः ला विचारले तर प्रामाणिक उत्तर प्रत्येकाला प्रत्येकाचे कळेलच.
कविता छानच.
- Log in or register to post comments
च
चिमी
गुरुवार, 08/25/2011 - 09:21
नवीन
काय खर आहे, खर आहे लावल आहे सर्वान्नी?
हेच तर चुकत आहे - encourage, participate करायच सोडुन उत्साही लोकान्ना मागे खेचायच :-(
underestimating the power of ppl - सामान्य म्हने :-(
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 08/26/2011 - 00:23
नवीन
१००% खरंय!!
छान लिहिली आहे कविता.
- Log in or register to post comments