Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राखेमधे लोळतो मी (हजल)

ग — गंगाधर मुटे, Sun, 08/21/2011 - 09:07
राखेमधे लोळतो मी (हजल) मलिंदा मिळावा असे भाकतो मी जगावेगळे मागणे मागतो मी कशाला गडे रोज येतेस स्वप्नी? असा काय आमिर तुला वाटतो मी? जसे गुंग व्हावे नशीले पिताना तुला पाहताना तसा झिंगतो मी मला नेमक्या टाळती अप्सरा त्या बहूतेक त्यांना कवी भासतो मी! दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो मी करा बंद कानात आकाशवाणी अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी समाजात चर्चेमधे राहण्याला अभय मस्त राखेमधे लोळतो मी                          गंगाधर मुटे ------------------------------------- (तर ही हजल)

प्रतिक्रिया द्या
1592 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मदनबाण Sun, 08/21/2011 - 09:15 नवीन
वा... सुंदर. :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 08/21/2011 - 13:06 नवीन
>>दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो >><< प्र.के.अत्रेंची प्रेमाचा गुलकंद कविता आठवली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/21/2011 - 16:09 नवीन
वाचतोय. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 08/21/2011 - 17:19 नवीन
अजून येऊ द्या. :D युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/21/2011 - 17:27 नवीन
>>>>युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे. आपण शेतकरी संघटनेच्या कामात सतत व्यस्त असता. आपली धावपळ आणि कामावरील प्रेम क्षणभराच्या भेटीत आम्ही ओळखून आहोत आणि इतके असुनसुद्धा- 'तुला पाहताना तसा झिंगतो मी' आणि 'दिलेली फुले तू जमा खूप झाली' या दोन ओळींनी अजूनही आपल्यामागील जांगडगुत्ता अजून सुटला नाही की काय असे वाटले. ;) (हलकेच घ्या) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Mon, 08/22/2011 - 07:42 नवीन
अहो साहेब, "शराब और शबाब के बगैर गझलको (और गझलकारको भी) गझलियत नही आती" हा गझलेचा मुळ सिद्धांत आहे, असे म्हणतात. म्हणून कायदेशिर बाजूची पुर्तता करण्यासाठी अशा रचना रचाव्या लागतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
निनाव Mon, 08/22/2011 - 07:31 नवीन
खूप छान मुटे जी. मस्त लिहिले आहे. हे खुप भन्नाट लिहिले आहे तुम्ही :) >>>मला नेमक्या टाळती अप्सरा त्या बहूतेक त्यांना कवी भासतो मी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा