Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू लिहिलेस नि मला सुचून गेले. ..!!

प — प्रकाश१११, Mon, 08/22/2011 - 06:51
[एका मित्राला सहज म्हणून डॉलरचा हिशेब पैशात सांगितला नि एका डॉलरमध्ये कमीत कमीत ३ किलो कांदे आले असते असे म्हणालो .नि येथे फक्त ३ कांदे आले. त्यावरून त्याने गमतीशीर पत्र लिहिले .त्यावरून खालील सुचले ] ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय . . मी एकडे तिकडे बघत चालतो पोरगाच खिशातून कार्ड काढतो काय करतो..? किती देतो..? मी बघत नाय ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय ...!!. आभाळाचा रंग निळा तेवढाच मी बघत बसतो पिवळा पिवळा एक पक्षी छान गाणे गात असतो काय गातो कसा गातो मी बघत नाय खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय ....!! रस्त्यावरून एकटाच चालतो रस्ता अगदी शांत असतो कोणीतरी अनोळखी सहज मोर्निग करतो आपण पण तेच करतो आपल्याला दुसरे येते काय ..? खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!! तू लिहिलेस नि मला सुचून गेले मन गाणे गाऊन गेले लिहायला फक्त थोडा त्रास वाचता वाचता होतील भास वाचायला तुला त्रास काय ...? खिसा भरलेला नि ह्यालाबी पैसा चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!!

प्रतिक्रिया द्या
1906 वाचन

💬 प्रतिसाद (10)
न
निनाव Mon, 08/22/2011 - 07:19 नवीन
मस्तच प्रकाश दा. पुन्हा एक छोटी अशी गोष्ट पण खूप साधेपणानं आणिक सुंदर मांडली आहे. कविते बद्दलः शेवटच्या कडव्यात अजुन थोडे बदल अपेक्षित होउ शकतात.. थोडंस खटकतंय.. रिदम थोडा सा गडबडतो आहे. तेवढंच. असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 08/22/2011 - 18:02 नवीन
अगदी असेच म्हणते. कविता छान पण थोडे काही बदल हवे आहेत असे वाटले. विशेषतः शेवटच्या कडव्यात. शेवटचे कडवे थोडे अर्थात गोंधळ करते आहे असे माझे तरी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
ज
जाई. Mon, 08/22/2011 - 07:22 नवीन
उत्तम कविता
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 08/22/2011 - 07:49 नवीन
मस्तचः)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 08/22/2011 - 10:55 नवीन
साक्षात भास्कर महाराज जे पाहू शकत नाहीत ते पाहाण्याची नजर आहे आपली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/22/2011 - 12:30 नवीन
रस्त्यावरून एकटाच चालतो रस्ता अगदी शांत असतो कोणीतरी अनोळखी सहज मोर्निग करतो आपण पण तेच करतो आपल्याला दुसरे येते काय ..? खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!!..............''हे अतीशय बोलकं,आणी अप्रतीम'' :-)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 08/22/2011 - 17:27 नवीन
आभाळाचा रंग निळा तेवढाच मी बघत बसतो पिवळा पिवळा एक पक्षी छान गाणे गात असतो काय गातो कसा गातो मी बघत नाय खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय ....!! एकदम छान
  • Log in or register to post comments
म
मन१ Wed, 08/24/2011 - 09:45 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/24/2011 - 15:04 नवीन
छान कविता...
  • Log in or register to post comments
च
चाल क बि.एन गुरुवार, 08/25/2011 - 16:01 नवीन
मन गाणे गाऊन गेले लिहायला फक्त थोडा त्रास वाचता वाचता होतील भास वाचायला तुला त्रास काय ...? फार च सुन्देर ... आभार..परत कधी ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा