Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे...

प — प्रिया ब, Mon, 08/22/2011 - 10:37
देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे... रोज सकाळी आईच्या गजराने उठायचं आहे... नाक मुरडत दूध पिऊन time table भरायचं आहे... सायकल वरून मैत्रीणींबरोबर रस्ता अडवत शाळेला जायचं आहे... रांगेत उभं राहून प्रार्थनेनंतर वर्गात शिराय्चं आहे... पहिल्याच तासाच्या टीचरांना attendance द्यायचा आहे... घरी न केलेला home work free period मध्ये संपवायचा आहे... art craft च्या lecture मध्ये रंगी बेरंगी कागद, टिकल्यांशी खेळायचं आहे... डब्यात आणलेली नावडती भाजी recess मध्ये दुसरीशी share करायची आहे... संध्याकाळी घरी पोचताच दप्तर ठेऊन बाहेर खेळायला जायचं आहे... दिवे लागणीच्या वेळी परत येऊन 'शुभंकरोती' म्हणायचं आहे... आई समोर बसून पाठ केलेले पाढे आणि कविता म्हणून दाखवायचे आहे... अवघड वाटणारं गणित बाबां कडून समजून घ्यायचं आहे... लवकर ग्रुहपाठ उरकून 'गोष्टी' साठी आजीच्या मागे लागायचे आहे... रविवारी उठून Jungle book, Duck Tales, पोटली बाबा की बघायचं आहे... वाढदिवसाची तयारी एक महिना आधीपासून करायची आहे... बाबांचा हात धरून गणपती देखावे पहायचं आहे... दिवाळीच्या सुट्टी मध्ये किल्ल करायचा आहे... शाळेतल्या एक दिवसाच्या सहलिला जायचं आहे... annual social मध्ये नाचात भाग घ्यायचा आहे... वार्षिक परिक्षेनंतर खूप ice cream खायचं आहे... colony मध्ल्या मित्र मैत्रीणीं बरोबर अंगत पंगत करायची आहे... लहान सहान कारणा वरून सगळ्यांवर रुसायचं आहे... मला परत एकदा लहान व्हायचं आहे... ~~ प्रिया

प्रतिक्रिया द्या
1892 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
श्रावण मोडक Mon, 08/22/2011 - 10:57 नवीन
म्हणजे तुम्ही मोठ्या झाल्या आहात होय? छ्या... मला वाटलं... ;) ह. घ्याच.
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Mon, 08/22/2011 - 12:07 नवीन
शिल्पा, आपल्या प्रत्येकाच्याच मनात हा सुखद नॉस्ताल्जिया लपलेला असतो. त्यामुळेच मोठे होऊनही आपले जीवन वैराण होत नसावे. तुझ्या हळव्या स्मृतिरंजनाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 08/22/2011 - 12:33 नवीन
शिल्पा,
क्काय? या प्रिया ब आहेत. शिल्पा ब नाहीत. अर्थात, 'ती मीच', 'मी तीच' असे असेल तर माझी माघार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
आ
आत्मशून्य Tue, 08/23/2011 - 00:12 नवीन
हॅहॅहॅ... असो त्यांनी कदाचीत मनातील भावनांना वाट करून दीली असावी. समजून घ्या (त्यांच्या वाक्याचा आशय).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
य
योगप्रभू Mon, 08/22/2011 - 13:39 नवीन
मी चुकून शिल्पा लिहिले. मला प्रिया ब. अभिप्रेत होते. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 08/22/2011 - 15:14 नवीन
छान ग प्रिया.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 08/22/2011 - 18:50 नवीन
रात्रशाळेत जावे लागेल! ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 08/22/2011 - 20:10 नवीन
तुम्हाला प्रॉढशाळेत म्हणायचं आहे का ?
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Tue, 08/23/2011 - 05:47 नवीन
घ्या ! इथे बालवाडीच्या गप्पा चाल्ल्यात अन तुम्ही म्हणताय प्रौढशाळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा