पाककृती

चिकन पिटा सँडविच

Primary tabs

साहित्यः ५०० ग्राम चिकन ब्रेस्ट २ टेस्पून लिंबाचा रस २ टेस्पून आले+लसुण्+पुदिना पेस्ट १ टेस्पून तंदूरी मसाला दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून काळीमिरीपूड १ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार पिटा ब्रेड आपल्या आवडीचे क्रंची सॅलॅड पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉस साहित्य व पाकृ लेमन विनीग्रेट (सॅलॅड ड्रेसींग) १/४ कप ऑलिव्ह ऑईल २ टेस्पून / अर्धा लिंबाचा रस १/२ टीस्पून मस्टर्ड पावडर १ टीस्पून काळीमिरीपूड १ टीस्पून ड्राईड हर्ब्स मीठ चवीपुरतं Image removed. सर्व एकत्र करून चांगले फेटा व सॅलॅड वर ओतून चांगले मिक्स करा. Image removed. तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही चिली फ्लेक्स , गार्लीक पावडर ही घालू शकता. पाकृ: चिकन ब्रेस्टला लिंबाचा रस, आले+लसुण्+पुदिना पेस्ट, तंदूरी मसाला, लाल तिखट, काळीमिरीपूड, गरम-मसाला व मीठ लावून ६-७ तास मॅरिनेट करा. Image removed. पॅन्मध्ये थोडे तेल घालून चिकन ब्रेस्ट शॅलो-फ्राय करा.(हवे असल्यास ग्रील, ओव्हन्मध्ये ही चिकन बेक करू शकता) Image removed. Image removed. पिटा ब्रेड तव्यावर शेकून किंवा टोस्टरम्ध्ये टोस्ट करून घेणे. पिटा ब्रेडच्या पॉकेट मध्ये ड्रेसींग घातलेले सॅलॅड, फ्राईड चिकन ब्रेस्ट, पुदीनाची चटणी / टोमॅटो सॉस घालून सर्व्ह करणे. Image removed.
प्रियाली

ए-१ फक्त मला लेट्युस सॅलडपेक्षा कोबी, भोपळी मिरची, टोमॅटो असं सॅलड आवडतं आणि थोडं वेरिएशन करून मेडिटेरेनिअन (हामुस, ताहिनी, पिकल वगैरे) पाककृतीही चांगली लागते.

प्रचेतस

पाकृ आणि फोटोज नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

अवांतरः तुमचा तो चमचा ५०फक्त यांना पाठवून दिला की काय? दिसला नाही म्हणून म्हणतो. :)

५० फक्त

@ वल्ली, नाही तो चमचा हल्ली सानिकातै नी ठेवुन दिलाय शोकेस मध्ये, असं एक पत्र छापुन आलंय लंटनच्या द सॉन या दुरदर्शन मालिकेत, नेटवर लागते ती.

ओ नाही ओ मी त्याला कुणाची दृष्ट लागु नये म्हणून तीट लावून कपाटाच्या तिजोरीत सांभाळून ठेवला आहे ;)
पत्ता पाठवून द्या येत्या दिवाळी ला भेट म्हणून घरपोच आणून देईन म्हण्तेय :)

सोत्रि

सनिकास्वप्निल,

तुमच्याकडे 2 जास्तीचे चमचे आहेत म्हणे त्या तिजोरीत ठेवलेले? :)

- (चमचा) सोकाजी

गणपा

एकदम भारी.
प्रयाली म्हणते तस वेरिएशन करून पण भन्नाट लागतं.
थोडक्यात घरगुती शोवर्मा. :)

Mrunalini

मस्तच.... आणि तुझा चमचा खुपच famous झालाय. ;)

प्राजु

जबर्दस्त पाकृ.
मुलाला नक्कि आवडेल माझ्या,
जय हो सानिका ताई!

५० फक्त

पहिल्या फोटोत व्हिल साबणाचा लिंबु दिसतोय, जाम भारी,

काल गणपागुरुंच्या धाग्यावर लिहिला तोच प्रतिसाद पुन्हा रिपिट मारतो,

मांसाहारी नसल्याने छान सुंदर असा प्रतिसाद देणे शक्य नाहि,

पण विषय आवडत नसला तरि सर / बाई आवडतात तसं क्लासला हजेरी लावतात कालेजात म्हणुन हा प्रतिसाद. बाकि प्रेझेंटेशन आणि कढईतली वाफ लेन्सवर येउ न देता फोटो काढण्याचे कसब उपयुक्त आत्मसात केले पाहिजे.

आणि तो च...... भेटी लागी जीवा लागलीसे आस.

अवांतर - पत्ता देउ का तुम्हाला माझा ?

पल्लवी

कौतुक करायला कुठले नवीन शब्द वापरावेत ह्या विचारातच लै वेळ गेला , पण वेगळं कै सुचलं नै !
साधंसुध "अ-प्र-ति-म" म्हणते ! :)

खादाड

एका सँडविच मध्ये जेवण होइल !!

गवि

छान.. नेहमीच्यापेक्षा वेगळा पदार्थ. धन्यवाद.