Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिथुनायण भाग २ - आग ही आग

आ
आदिजोशी
Tue, 08/23/2011 - 04:51
💬 74 प्रतिसाद
साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो "तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो. डायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते. आता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते. ह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो "अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो "मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का? कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो "तू हमारी बदली करवाएगा? अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है". ह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला. मधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही. कमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो "ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टागर हुं". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात. ह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. "जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच. टायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात. सिनेमाचा मुख्य व्हिलन "टायगर" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला "देख लुंगा टायगर के बच्चे" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे. सिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग ऐकवण्यात येतं "क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं? झुमका संभालूं के ठुमका संभालू? दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी? आजु संभालूं के बाजू संभालूं? चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं? प्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो. यथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते "जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार". हळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो. हिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो. सिनेमातले निवडक यादगार संवाद: १. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है. २. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है. ३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है. ४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है. ५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं. ६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं. ७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं. ८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना. शेवटची हाणामारी झाल्यावर "आग ही आग है पानी में" ह्या सुमधुर गाण्याने सिनेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा "आग ही आग" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला "ही" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच. पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः

Book traversal links for मिथुनायण भाग २ - आग ही आग

  • ‹ मिथुनदांचा 'जस्टीस चौधरी' - म्हणजेच ओरिजिनल सरकार
  • Up
  • मिथुनायण भाग ३ - शेरा ›

प्रतिक्रिया द्या
14959 वाचन

💬 प्रतिसाद (74)
स
स्पा Tue, 08/23/2011 - 05:10 नवीन
हा हा हा खपलो... __/\__
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2011 - 05:36 नवीन
आई शप्पथ... बेक्क्क्कार हसले.....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/23/2011 - 05:43 नवीन
हेही परीक्षण लैच भारी. अवांतरः आग ही आग याच नावाचा चंकी पांडेचाही एक असाच भयाण चित्रपट पाहिला होता.
  • Log in or register to post comments
व
विनीत संखे Tue, 08/23/2011 - 07:35 नवीन
हो मलाही चंकीचाच आठवला... टुकार चित्रपट हे दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तीची दाद देण्यासाठी पाहायचे असतात असं मीही मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
आ
आत्मशून्य Tue, 08/23/2011 - 11:42 नवीन
हेच मत आहे. काम करणार्‍याने मन लावून काम केलय ना ? मग बास, चित्रपटाची कथा काहीही असो जो पर्यंत मज्या येतेय, आपण दाद देतोच, चित्रपटाला (शक्यतो)नावं ठेवायची नाहीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे
क
किसन शिंदे Tue, 08/23/2011 - 05:51 नवीन
एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात. हॅहॅहॅ... :D :D हे लय भारी हा.. आणी परिक्षण तर त्याहून कडक..
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 08/24/2011 - 17:32 नवीन
मंजे काय रे भाउ?? (आमच्या पुण्यात हा शब्द ऐकलेला नाही मी ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
पल्लवी Tue, 08/23/2011 - 06:00 नवीन
एकच नंबर !!!
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 08/23/2011 - 06:08 नवीन
धमाल परीक्षण हहपुवा
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 08/23/2011 - 06:15 नवीन
हे परीक्षण ही जबर्‍याच रे.... अवांतरः आता रव्याचे लाडु इथल्या कोणत्या दुकानात मिळतात हे शोधावे लागेल :(
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 08/23/2011 - 06:32 नवीन
हहपुवा. बेक्कार हसले
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 08/23/2011 - 06:50 नवीन
मजा आ गया, एकदम मज्जा! मिठूनदा कि फिल्में तो देखी है रे, पर तुम्हारे परिक्षण पढनेपर वापस देखने की चाहत हो रहीं हैं रे..... :-) हे क्रमशः सुखावतंय.....
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 08/23/2011 - 07:00 नवीन
प्रभुजींच्या बर्‍याच चित्रपटांचं परिक्षण करणार आहे. शेवट अर्थातच गुंडा ने होईल. कारण गुंडा झाला की त्याच्या नंतर काहीच उरत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
श
शाहिर Tue, 08/23/2011 - 11:33 नवीन
लोहा ला विसरु नका !! रावण राज ,मिलिटरी राज , कालिया, भीष्मा हे सुद्ध माइल स्टोन आहेत मिथुनदाच्या मुव्हीज ने सांस-बहुचा सुड घेणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ह
हुप्प्या Tue, 08/23/2011 - 07:09 नवीन
जोशीबुवा तुम्हाला साष्टांग दंडवत! आपली प्रतिभा अफाट आहे. असाच ओघ असू द्या. _/\_ _/\_ _/\_
  • Log in or register to post comments
म
मन१ Tue, 08/23/2011 - 07:14 नवीन
मेलो ....फुटलो..... . ....मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो. -----/\----- वाचता वाचता "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" हे लक्ष्याच्या आवाजात ऐकुन पाहिलं, जाम आवडलं(त्याच्या अँ ऊं अ‍ॅ वाल्या शैलीसह. )
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/23/2011 - 07:22 नवीन
छान..पण एखादी एखादी यु ट्युबावरची लिंक सुद्धा देत चला.
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 08/23/2011 - 07:24 नवीन
अगदी हेच म्हणायला पुन्हा आलेलो. आंतरजालावरची छायाचित्रेही वापरावीत..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
स्पा Tue, 08/23/2011 - 07:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
व
विनीत संखे Tue, 08/23/2011 - 07:37 नवीन
एक नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ख
खेडूत Tue, 08/23/2011 - 07:40 नवीन
हा मात्र त्या वेळी मिस झाला ... कॉलेजात जायला लागल्या बरोबर हा आणखी एक आग हि आग आला होता. तो पाहिला होता. खेडूत
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Tue, 08/23/2011 - 07:44 नवीन
दोन्ही परीक्षणं अफाट !! आयला सकाळी सकाळी हापिसात खुळ्यागत हसत बसलोय ! यू मेड माय डे ! _/\_ लेका तुझ्या प्रतिभेला ! जे पी
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Tue, 08/23/2011 - 07:47 नवीन
समी़क्षण अगदी 'आग' आहे. बाकी उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. या आदरणीय विदुषींबद्दलही आमचं कुतुहलशामक ज्ञानवर्धन करांवं ही विनंती.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 08/23/2011 - 08:21 नवीन
डॉ. नो ह्या पहिल्या बाँडपटात ती व्हाईट बिकिनी घालून समुद्रातून वर येते असा एक तुफान सीन आहे. तिच्या कपड्यांच्या आवडीमुळे त्यावेळच्या चित्रपट रसिकांनी आणि समिक्षकांनी तिला उर्सुला अनड्रेस असं टोपण नाव ठेवलं असा किस्सा ऐकिवात आहे. अधिक माहिती आणि सचित्र चरित्र जालावर कुठेही उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त
अ
अन्या दातार Tue, 08/23/2011 - 08:02 नवीन
आगायाया! कसलं भारी लिवता वो! _/\_
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/23/2011 - 08:16 नवीन
कं लिवलंय, कं लिवलंय - एक लंबर! आता 'गुंडा'च्या परीक्षणाची वाट पाहतोय :) अवांतर - मिथुनदांना घेऊन कुणी एक मराठी चित्रपट काढायला हवा राव. नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार आणि गीतकार/संवादलेखक ठाण्यातले एक प्रथितयश शिक्षक-कम-लेखक!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/23/2011 - 14:25 नवीन
मिथुनदांना घेऊन कुणी एक मराठी चित्रपट काढायला हवा राव. नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार आणि गीतकार/संवादलेखक ठाण्यातले एक प्रथितयश शिक्षक-कम-लेखक!
कोल्लापूरच्या म्युन्सिपल गार्डनात कर्दळीच्या आगेमागे अलका बुकल काकूंसोबत थुई थुई नाचणारा मिथून डोल्यापुढं आला....आणि सद..सद्ग...सद्गदित झालो हों! आणि मिथुनदाच्या तोंडी 'कष्टाच्या घुसळणीतून यशाचं नवनीत' वगैरे डायलॉग ऐकायला मिळण्याच्या धास्तीनं ब्लडप्रेशर हाय-लो हाय-लो व्हायला लागलं राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ग
गवि Tue, 08/23/2011 - 14:32 नवीन
नम्रपणे गाण्यासाठी काही शब्द सुचवू इच्छितो.. इश्कात, स्वप्नात, ज्वानीत, मिठीत ये साजणा.. धुंदीत, रानात, कानात, पानात ये साजणी.. कोवळी ओली ही काया जवळी घे ना तू राया इ इ.. यात ज्वानी, कोवळी इत्यादिपैकी काहीही प्रत्यक्ष असणे अपेक्षित नाही. आजरोजीच्या वयाचे मिथुनदा आणि अलकाकाकू सुद्धा "जिथे आहे जसे आहे" तत्वावर घेतले तरी चालून जातील. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 08/23/2011 - 15:22 नवीन
यात ज्वानी, कोवळी इत्यादिपैकी काहीही प्रत्यक्ष असणे अपेक्षित नाही. आजरोजीच्या वयाचे मिथुनदा आणि अलकाकाकू सुद्धा "जिथे आहे जसे आहे" तत्वावर घेतले तरी चालून जातील.
मेलो! साफ खपलो. S)
इश्कात, स्वप्नात, ज्वानीत, मिठीत ये साजणा..
अग्गायायाया....बाकीचं ठीक आहे, पण 'ज्वानीत ये साजणा' ? परत? काय गाणं लिहिलंय का थर्टी प्लसची जाहिरात? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
स्वतन्त्र Tue, 08/23/2011 - 08:52 नवीन
थोडा थोडा वाचायचं ठरवलंय ! मघाशी जरा जास्त झालं तर हसून हसून पोट दुखायला लागलं.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Tue, 08/23/2011 - 08:57 नवीन
टारेंट डाऊनलोडला ठेवण्यात आले आहे :)
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Tue, 08/23/2011 - 09:06 नवीन
हसुन हसुन जीव जायची वेळ आली. आईईई ग!!!! अजुन येउद्यात! :)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 08/23/2011 - 09:09 नवीन
मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.
_/\__/\__/\_ शब्द नाहीत ....खपलो आहे!!! -(परम मिथुनभक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 08/23/2011 - 09:51 नवीन
खूपच सही आहे हे आणि आधीचे परीक्षण!! :-) धमाल! धमाल!! अजून खालील चित्रपटांचे (नॉन-मिथून) परीक्षण करण्यास भरपूर वाव आहे. आदिजोशीसाहेबांनी किंवा अजून कुणी नुकतेच पाहिलेले असल्यास मज्जा येईल. मक्सद (नागराजा, नागराजा, नागराजा तुम आ जाओ...घंटा बडवणारे जितेंद्र आणि राजेश खन्ना आणि घटांवर लोंबकळणारे साप) आग और शोला (एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं....मुहम्मद अझीझचा रम्य आवाज आणि आशिष चनाना नावाच्या हीरोची अफलातून अदाकारी...मंदाकिनी मात्र आपल्याला आवडायची बाबा, उगीच खोटे का बोला? 'जीवा' मधल्या 'रोज रोज आँखोंतले...' मध्ये काय छान दिसली होती...तेजाबमध्ये पण स्विमिंगपूलवरच्या प्रसंगातदेखील मंदाकिनी छान दिसली होती. अर्थात तिची कर्तबगारी मोस्टली तितकीच होती.) घर घर की कहानी (कितने सावन, कितने यौवन, कितने यौवन बीत गये, तुम हो वहीं या और कोई, तुम लगने लगे नये....तेरे बदन के मुकाबिल क्या सूरज क्या सितारे, तेरे आगे कुछ नही हैं जन्नत के सारे नजारे....काय नजाकत आहे काव्यात...वा वा...आनंद बक्शी आणि लक्ष्मी-प्यारे या त्रिकुटाने गाण्यांचे जे वडापाव मोहम्मद अझीझच्या बेसनी आवाजात तळले हा त्यातलाच एक लालसर वडा) नगीना (बलमा, बलमा तुम बलमा हो मेरे खाली नाम के, तुम्हे क्या मर जाऊ तो मर जाऊ मैं तुम किस काम केयेयेयेयेयेयेयेये....टुंग टुंग टुंग...श्रीदेवीचा अफाट नाच...गाणे हिट, पिक्चर सुपर हिट) पाताल भैरवी (मेहमान नजर की बन जा, ईक रात के लिये, मैं जन्मों से तरसा हूं....तानादिनी तानादिनी सुन प्रिये.....चुम्मा चुम्मा जुम्मा चुम्मा..मुझ को बना ले प्रियतम्मा...) --समीर
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 08/23/2011 - 09:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Tue, 08/23/2011 - 10:05 नवीन
अगदी असेच करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/23/2011 - 10:07 नवीन
^न! पहिल्या परिच्छेदानंतर पुढचे वाचायला जायला बराच वेळ लागला... हसून हसून मेलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/23/2011 - 10:16 नवीन
अ‍ॅड्या... मिथुनच्या पोराचाही एक पिच्चर आला होता ना रे काही दिवसांपूर्वी?
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/23/2011 - 10:19 नवीन
अरे देवा.. जबरदस्त ठो ठो हसू आले आहे. आग ही आग (चंकी पांडे) पाहिला होता. त्यामुळे स्टोरी वाचता वाचता बुचकळ्यात पडलो. नंतर उलगडा झाला. अरे काय रे हे वस्त्रहरण.. :) तुझ्याकडून अशाच अनेक परीक्षणांची डोळे लावून वाट पाहात आहे. एक मुद्दत नामक मिथुनदांचाच सिनेमा पाहिला होता. डिस्को डान्सर असतो मला वाटते तो त्यात. आणि "लडकी लडकी लडकी लडकी लडकी.." असं काहीसं अनेक पोरींसोबत स्टेजवर एक नाचगाणंही आहे त्यात. लहानपणी पाहिल्याने आता ष्टोरी नाय आठवत (तेव्हाही समजली असण्याची शक्यता कमी आहे कारण हिंदी पाचवीपासून पुढे सुरु झालं) ... पुन्हा एकदा म्हणतो.. झक्कास ..अफलातून.. दणकेबाज लेख.. मिथुनदा स्टाईलमधे.. क्या बात..! क्या बात..!! क्या बात...!!! (आणि एक पिस्तुलाचा हवेत बार खुषीप्रीत्यर्थ..)
  • Log in or register to post comments
य
यकु Tue, 08/23/2011 - 16:28 नवीन
एक पिस्तुलाचा हवेत बार खुषीप्रीत्यर्थ.. ही कल्पना फार आवल्डी!!!! आमचेही बार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आत्मशून्य Tue, 08/23/2011 - 11:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 08/23/2011 - 11:51 नवीन
मेलो च्यायला हसुन हसुन आयला हे हम मिथुन को जिंदा रखने के लिये उसकी पिक्चर का गैर कानूनी ऑपरेशन करत हैं. ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/23/2011 - 13:40 नवीन
अ‍ॅड्या अ‍ॅड्या अरे तू नावडता समिक्षक का नाही रे झालास ? कालचा आणि आजचा लेख म्हणजे तडतड वाजणार बाजा आणि उड उड उडणार्‍या पॉपकॉर्नची तुफान मेजवानी आहे. बर्‍याच दिवसांनी खळखळून हसलो रे :) धन्यवाद. बादवे त्या सदाशिव अमरापूरकरचा एक शिणीमा आहे, ज्यात बहुदा आपला धर्मुदादा पण आहे. त्या शिणिमात अमरापूरकर साहेब जगावर राज्य करण्याची (आणी सगळ्यात आधी भारतावर) स्वप्ने बघत असतात. त्यात त्यांनी एक वाघ पाळलेला असतो. ह्या चित्रपटातल्या अनेक खल्लास संवादापैकी एक म्हणजे, 'वाघ का पाळला आहे' असे एका विदेशी माणसाने विचारल्यावर अमरापूरकर साहेब म्हणतात, "कुत्ते कुत्ते पालते है और शेर शेर !" त्या शिणुमावरपण लिही रे एकदा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/23/2011 - 13:53 नवीन
मलाही सिनेमाचं नाव आठवत नाही पण हे तुम्ही म्हटलेलं नक्की आठवलं, पण तोच का हो सिनेमा ज्यात सदाशिव अमरापुरकर बँडवाल्यासारखा पण पांढर्‍या रंगाचा युनिफॉर्म घालून एका रथासारख्या गाडीतून फिरत असतात. (बाकी खांद्यावर एपिलेट्स् आणि खिशाला बँडवाल्यांसारखी मेडले वगैरे आहेतच..) नावही भयंकर आहे त्यांचे त्यात प्रलयनाथ किंवा अशाच काही अशुभसूचक टाईपचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा Tue, 08/23/2011 - 14:04 नवीन
ओ गवी तो प्रलयनाथ (दिपक शिर्के) राहिला तिरंगा मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मृत्युन्जय Tue, 08/23/2011 - 14:22 नवीन
फरिश्तेच आहे तो. उत्कृष्ट चित्रपट आहे. दारु पिउन सुजलेले विनोद खन्ना आणि कुत्र्याचे रक्त पिण्याच्या वल्गना करणारा धर्मेंद्र. जोडीला तोंडी लावायला खलनिर्दालक भगवान रजनीकांत. त्यातला सदाशिव अमरापुरकरचा डायलॉग देखील मला चित्रपट अगदी काल बघितल्यासारखा आठवतो " देखो कैसे बंदर की तरह उछल रहा है" (हे रजनी अण्णाला उद्देशुन). शोल्लेट पिच्चर होता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गवि Tue, 08/23/2011 - 14:07 नवीन
हा का? Image removed. फरिश्ते?
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 08/23/2011 - 16:08 नवीन
मला वाटतं हा "एलान ए जंग" असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
श्रीरंग Wed, 08/24/2011 - 06:33 नवीन
वरील चित्र "फरिश्ते" चित्रपटातलं असून, यूट्यूब लिंक "ऐलान-ए-जंग" चित्रपटाची आहे. दोन्ही चित्रपटांत धरम-पाजी आणी सदाशिवरावभाऊ असल्यामुळे अभक्तांचा गोंधळ उडतो, कित्येकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
आ
आदिजोशी Tue, 08/23/2011 - 14:11 नवीन
सगळ्यात आधी मिथुनचे काही सिनेमे घेतलेत परिक्षणासाठी. ते झाले की मग वळूच इकडे तिकडे :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा