जे न देखे रवी...
सहज
Primary tabs
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
~X(
सहज सहज करताकरता हे काय झाले?
शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले
सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले
वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T
सहज चेतन
सहजपणे जे मनात येते
सच्च्या मनाने कागदावर उतरते
सहज प्रतिक्रीया व्यक्त करवते
फसलेले अथवा यशस्वी लिखाण ते!
लगे रहो चेतनभाई......
धन्यवाद अरुणजी...
सहजासहजी प्रतिक्रिया न मिळणारा (सहज चेतन) #:S
अवांतरः किती सहजपणे प्रतिक्रिया दिलेय
मला उगाच वाटले की माझ्यावर काही स्तुतीसुमने उधळलीत...
तुमचा विरंगुळा झाला पण माझी निराशा केलीत. :-( आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले"
"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं !
माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता)
कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8}
अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले"
एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)
चेतनसाहेब गंमत केली. माफी कसली. मिपावर सगळे हसत खेळत असते..
मुख्य सांगायचेच विसरलो. कविता मस्त "सहज" जमल्यात. अजुन येऊ देत.
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
हेच सर्वात महत्वाचे! :)
वा चेतनराव, छोटेखानी परंतु सुंदर कविता...!
तात्या.
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,
कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली. लिहित राहा, र्ह्दयास भिडणार्या कविता अशाच जन्मल्या आहेत.
अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)'' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो,
सहज गस्त घालतो.सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतोतयाला 'सहज' असे म्हणतो''( सहजराव,( ह. घ्या. ))
'' सहज चालतो, सहज बोलतो
संस्थळावर सहज असतो,
सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो,
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
जबरा !!!!!!!! :))
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
धन्यवाद तात्या, बिरुटे सर, अरुणजी , सहजराव, सतिश
अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य
बिरुटे सर मस्त लिहलयं अशिच काही व्यक्तिचित्रं लिहा मजा येइल वाचायला (तात्यांना स्पर्धा)
तुर्त दि:गमुढ चेतन :T