Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक महाभयंकर जात

र — रोमना, Fri, 08/26/2011 - 11:07
एक महाभयंकर जात खरे पाहता, "जात" हा शब्द दर्शवितॊ ते वर्गीकरण. जसे की सजीवांमध्ये - प्राणी, पक्षी, माणूस, वनस्पती वगैरे. यामध्येही अनेक पोट जाती असू शकतात जसे की, शिकार करणारे प्राणी, शाकाहारी वगैरे. माणसाने हि आपापल्या जाती बनविल्या. माणसाच्या जाती मुख्यत: त्याचे स्थळ, तो करतॊ ते काम, त्यानुसार रहाणीमान दर्शविण्यासाठीच होता. पण या जातीचा चुकिचा अर्थ ज्यांनी पसरविला, वाढवला व पॊसला ती एक महाभयंकर जात आहे. ती कशी ओळखायची हे पुढे वाचा म्हणजे कळेलच... सत्याला सारुन मागे, असत्याला मिळाली वाट उदया आली नवी जमात ती होती राजकारण्यांची जात मानवतेला संपवाया कलियुगी अवतरले हे खास, जी सैतानाचि औलाद हि तर राजकारण्यांची जात ! मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन झाले मॊठे, आता विकतात ते स्वतात हि तर राजकारण्यांची जात ! दुर्गुण बरेच करुन गोळा केले ज्यांनी आत्मसात, तरी म्हणतील आम्ही साफ हि तर राजकारण्यांची जात ! मते मागाया येतो एक दुजाला खुर्चीत बसवितात, अन तिसरेच देश चालवितात हि तर राजकारण्यांची जात ! दिले ज्यांनी त्या निवडून त्यांच्या पोटावर बसतात, अन नरड्याचे घोट घेतात हि तर राजकारण्यांची जात ! घेऊन तुम्हा विश्वासात पाठित खंजिर खुपसतात, मालकावर पलटवार करतात अरे हि तर राजकारण्यांची जात ! साप विषारी परवडला पण हे भिनले अंगात तर मनुष्य मनुष्य नाही रहात हि तर राजकारण्यांची जात ! वेळीच सोला या सापाना जोवर आहे शेपूट हातात तरच टिकेल माणूस जमात काढून टाका अ-सत्याची कात

प्रतिक्रिया द्या
1056 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा