Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणेरी वाहतूक

प — प्रिया ब, Fri, 08/26/2011 - 13:21
चालणारा, दुचाकीस्वार, चार चाकी चालवणारा ह्यांचे स्वगत : पुढे मागे करत करत रस्ता कसाबसा मी ओलांडला "काय मेले गाडीवाले चालवतात" असा विचार मनास चाटून गेला फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील हे मोठे गाडीवाले करतात भलताच माज असे रस्ते आडवून गाड्या चालवतात जणू काही ह्यांचच आहे राज आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात पावसाळा असला तर विचारयलाच नको; सर्रास चिख्खल उडवून जातात ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त लेन न पाळणार्यांचा तर परवानाच केला पाहिजे जप्त रस्यावर चालणारे तर बागेत असल्यासारखे फिरत असतात कुठे कुठे आणि कसं लक्ष्य ठेवायचे हे प्रश्न आम्हास पडतात कुणाला हक्क कधी द्यायचा हे कोडे तसेच राहणार? प्रत्येकाने नियमाचे पालन केले तर हा प्रश्नंच नाही उरणार तोपर्यंत ही कोंडी तशीच असणार; म्हणून मंत्र अगदी सोपा आपलंच साधन पुढे रेटून आपापल्या स्थळी पोचा

प्रतिक्रिया द्या
2240 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मनीषा Fri, 08/26/2011 - 13:37 नवीन
वाहतूकीत अडकलेल्यांची स्वगते छान आहेत ... पण ते 'पुणेरी' कशासाठी ? सर्वच शहरांमधून थोडीफार हीच परिस्थिती आहे ...
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 08/26/2011 - 13:47 नवीन
खरं आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मराठी_माणूस Fri, 08/26/2011 - 13:44 नवीन
आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त शिस्त नसेल तर मग कोपर्‍यात घालावेच लागेल :)
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 08/26/2011 - 14:09 नवीन
<< कुणाला हक्क कधी द्यायचा हे कोडे तसेच राहणार?>> या प्रश्नाचं उत्तर वाहन परवान्यावरच दिलंय. माझ्या वाहन परवान्याच्या शेवटच्या पानावरचं वाक्य :- Driving is a privilege not a right. अमेरिकेतही "रस्त्यावर पहिला हक्क पादचार्‍याचा, मग वाहनचालकांचा" हे तत्व पाळतात.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 08/28/2011 - 13:04 नवीन
अमेरिकेतही "रस्त्यावर पहिला हक्क पादचार्‍याचा, मग वाहनचालकांचा" हे तत्व पाळतात.
आपल्याकडे वाहनचालक पादचार्‍याला "घरपे बताके आया क्या भो***" असं म्हणत आपल्या संस्कृतीची ओळख करुन देत असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
व
विजुभाऊ Fri, 08/26/2011 - 14:19 नवीन
पुण्याबद्दलच्या कोणत्याही धाग्यावर सध्या मौन पाळायचे ठरवलय. (त्यानंतर मांजर पाळायचे आहे)
  • Log in or register to post comments
P
pramanik Fri, 08/26/2011 - 14:31 नवीन
अशा कविता मी तिसरीत आसताना करायचो.पण एकदाही बक्षीस नाही मिळाले.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 08/26/2011 - 14:38 नवीन
हीडीस आणि हिणकस "प्रामाणीक" प्रतीक्रिया.. पण मिपाच्या नविन धोरणानुसार संयम पाळल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pramanik
५
५० फक्त Sat, 08/27/2011 - 03:58 नवीन
''फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील'' नळ स्टॉपच्या सिग्नलला या शिवाय पर्याय नसतो. @ विजुभाउ - मांजर पुणेरी का दुसरं कुठलं पा़ळणार. अवांतर - या तिन्ही रुपात पुण्यात वावरत असल्याने आता एवढा सराव झाला आहे की युद्धभुमिवर रणगाडे, वरुन विमानं आणि मधुन येणारी क्षेपणास्त्रे या सगळ्यामधुन जनलोकपाल पास करुन आणेन याचा विश्वास आला आहे.
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sat, 08/27/2011 - 16:42 नवीन
नुकताच पुण्याची वारी करुन आलो. नि प्रत्यय आला...
  • Log in or register to post comments
प
प्रास Sat, 08/27/2011 - 18:05 नवीन
साधं, सरळ आणि भावस्पर्शी काव्य.
आपलंच साधन पुढे रेटून आपापल्या स्थळी पोचा
अधोरेखित शब्दामुळे आमच्या लहानपणी क्रिकेटचे चेंडू लागून चारचाकी गाड्यांच्या पत्रांना आलेले पोचे आठवले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा