Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा..!!

प — प्रकाश१११, Sun, 08/28/2011 - 06:49
[परदेशात आल्यावर काही मराठी मुलांशी ओळखी झाल्या .भाषेवरून गमती जमती झाल्या. त्यावरून हे सुचले ] येथे आल्यावर एक झाले मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा थोडी थोडी लाज होती पण लवकरच निर्लज्ज झालो तोंडातल्या तोंडात घोळत मी पण बोलू लागलो नुसते लिहिता येत होते बोलणे म्हणजे गणित होते प्रमेया पेक्षा रायडर कठीण असते [!!] तसेच बोलणे अवघड होते असेच शप्पत मला वाटत होते सरळ सरळ शब्द त्याना समजत नव्हते नि लुळे पांगळे शब्द मला बम्पर टाकीत होते राजू रामुशी बोलणे जरा अवघड होते माझ्या बोलण्यातले The किंवा An शोधीत होते माझ्या देशी भावंडाशी बोलणे जरा अवघड होते परदेशी बॉब बरोबर बोलणे मला तरी सोपे वाटत होते हाय बॉब केले की बॉब मस्त हसायचा माझ्या शब्दातील The किंवा An न शोधता हात मिळवायचा ...! मी माझे शब्द लुळे पांगळे करून ओठाच्या चम्बुतून सोडायचो बॉब हाय करून हसायचा आणि माझी तारीफ करायचा बॉब आणि रोंनीचे शब्द मी उचलले आहेत मस्त शब्द लुळे करून मी बोलतो आहे बायको बरोबर फिरताना कधी बॉब भेटतो कधी ..रॉनी .! मी मस्त शब्द लुळे पांगळे करून त्यांच्याशी बोलत असतो माझे लुळे शब्द बायको बघत असते बोबच्या चेहऱ्यावरचे स्मित बघून बायको नवलाने माझ्याकडे बघत बसते ........! येथे आल्यावर एक झाले मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा थोडी थोडी लाज होती पण लवकरच निर्लज्ज झालो . नि मस्त बम्पर टाकू लागलो ..!!

प्रतिक्रिया द्या
1710 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मदनबाण Sun, 08/28/2011 - 08:49 नवीन
छानच ! :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 08/28/2011 - 12:52 नवीन
छान कविता... नविन असताना हे अनुभव सार्‍यांनाच येतात... आपल्याकडे भ ची भाषा असते, तर त्यांच्याकडे फ ची ;)
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 08/29/2011 - 20:45 नवीन
कविता आवडली. तर्खडकरी व्याकरणाचा विचार न करता फाडफाड बिंधास्त बोला.
  • Log in or register to post comments
च
चाल क बि.एन Sat, 09/03/2011 - 10:48 नवीन
कविता आवडलि अचुक विश्लेशन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा