Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षण एक पुरे जगण्यास खरा

ग — गंगाधर मुटे, Tue, 08/30/2011 - 17:48
क्षण एक पुरे जगण्यास खरा जगणे कसले शतवर्ष नरा? क्षण एक पुरे जगण्यास खरा लपवून व्यथा रडतोय मनी दिसतोच सदा मुखडा हसरा जगणेच नको असले तसले परसात पडून जणू कचरा मरणास इथे नच घाबरतो असते जगणेच कठीण जरा श्रमतो, दमतो, शिणतो पुरता परिहार जणू जुळता नजरा दिसतात इथे जन सज्जन हे अपुलाच स्वभाव नसेल बरा रुळताच मनी भलतेसलते पुसतात कशास हवा नवरा वरदान मिळो "अभया"त जगा दररोज घरात जणू दसरा                    - गंगाधर मुटे ---------------------------------- वृत्त :तोटक रदीफ : गैरमुरद्दफ ----------------------------------

प्रतिक्रिया द्या
1617 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मदनबाण Tue, 08/30/2011 - 18:12 नवीन
मरणास इथे नच घाबरतो असते जगणेच कठीण जरा सुरेख... :)
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Tue, 08/30/2011 - 22:54 नवीन
सुन्दर विचार सुरेख गुम्फले आहेत. पण रदीफ : गैरमुरद्दफ म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 08/31/2011 - 13:38 नवीन
गैरमुरद्दफ म्हणजे रदीफ नसलेली गझल. :) रदीफ म्हणजे पहिल्या व्दिपदीतील दोन्ही ओळीच्या शेवटी व त्यानंतर प्रत्येक व्दीपदीच्या खालच्या ओळीत शेवटी हमखास येणारा शब्द किंवा शब्दसमुह. जसे की, गायीस अभय देण्या, वाघास दात नाही रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळीची एका स्वरात गाणे, साथीत गात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगोचर
व
विदेश Wed, 08/31/2011 - 12:27 नवीन
दिसतात इथे जन सज्जन हे अपुलाच स्वभाव नसेल बरा द्विपदी आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 08/31/2011 - 18:52 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 11/11/2011 - 11:38 नवीन
---------------------------------- पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
Image removed.

ही गझल प्रकाशित झाली आहे. ----------------------------------
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा