Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाचा दरोडा

प — पाषाणभेद, Wed, 08/31/2011 - 02:13
पावसाचा दरोडा आला सोसाट्याचा वारा उठलं धुळीचं रिंगण झाडझाडोरे हालता गेल सारं रान पिंजून || बांधावर आम्ही उभे आधार एकमेकांना दोघे तवाच ढग आले दाटून गेलं आभाळ फाटून || थेंब पावसाचे मोठे द्वाड अंगावर बसे वादीचा चाबूक जवा पाहिजे तवा नाही जवा नको तवा यायची खोड || विजा चमकून भिती घालती काही आगाव भुईला टेकती वंगाळ भिती मनाला खायी जिवासाठी आसरा शोधू पाही || उघडा सारा रानमाळ नव्हतं कुणाचं छप्पर ठिपक्यावानी झाड लिंबांच सावली देत उभं र्‍हातं || तेवढा तोच आधार तेचा आडोसा घेतला त्याखाली वल्ले होतो थेंब जोराचे चुकवत || एकाएकी आक्रीत झालं सन्नकन आला जाळं डरकाळीच्या आवाजानं सारं रान हादरलं || मघापासून जणू चाटीत होती जिभल्या तू तुझ्या विजबाई माझ्यावर आभाळ कोसळलं कुणाकडे मी पाहू बाई || मोठी उलथापालथ झाली नजरंसमोर घरधनी पडला एकाएकी प्राण त्याचे गेले कोळशावानी काळाठिक्कर झाला || कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई || - पाषाणभेद (दगडफोड्या) ३१/०८/२०११

प्रतिक्रिया द्या
2045 वाचन

💬 प्रतिसाद (11)
श
शुचि Wed, 08/31/2011 - 02:19 नवीन
ही कविता खूप छान आहे. >> कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई || >> भवाने शब्दाने कडव्याला आगळे वजन आले आहे. आवचिंदी शब्ददेखील नवा आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 08/31/2011 - 03:14 नवीन
शेवट फारच भिडणारा आहे... पण कविता चांगली बांधलेली नाही. कडव्यांची लांबी कमी जास्त होत जाते आहे. कविता जरा पिकायला हवी होती का अजून? मुक्तक असेल तर ठीक.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 08/31/2011 - 03:19 नवीन
लिंबारा अर्थात लिंबाच झाड विज प्रवाही मानतात. घराजवळचा लिंबारा घरावर विज आकर्षित करतो. पाभे चित्र दर्शक काव्य. अगदी डोळ्यासमोर उभ राहिल धुंवाधार पावसात उभ असलेल शेतकरी जोडप. वाडाच्या बरोबरीन आहे ही कविता.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 08/31/2011 - 04:10 नवीन
खूप चित्रदर्शी कविता!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/31/2011 - 04:19 नवीन
चित्रदर्शी कविता, असेच म्हणते. पण शेवट नाही आवडला. अंगावर आला. जरा धक्कादायकच झाला. अर्थात तीच अपेक्षा असली तर पूर्ण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ध
धन्या Wed, 08/31/2011 - 05:35 नवीन
झक्कास कविता... चित्र नजरेसमोर उभं राहीलं... कारे आवचिंदी पावसा तू ग भवाने विजबाई दोघं आले दरोड्याला नशीब माझं लुटून जाई हा क्लायमॅक्स तर भारीच...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/31/2011 - 06:05 नवीन
शेवट आवडला नाही. :( पण कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/31/2011 - 06:17 नवीन
अरे काय झोल आहे ? प्रतिसाद होलसेल मधे पडले आहेत ! संपादक मंडळींपैकी कोणी तरी हे डिलिटवा.
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 08/31/2011 - 12:22 नवीन
छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 08/31/2011 - 13:53 नवीन
किती सुंदर कविता सचिन जी, एकदम बेस्ट खुप खुप आवडली.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी ... मागे एकदा तुम्ही शेतकर्‍याची एक कविता लिहिली होती.. त्यांनी म्हणलेलीच ही कविता वाटत आहे.. --- अवांतर : मदनबाणाच्या भात्यातील सगळे बाण एकदमच सुटले वाटते...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/31/2011 - 19:59 नवीन
तुंम्ही म्हणजे प्रसंग जसाच्या तसा उभा केलात.... पढने के बाद, आँखे नम हो गई,और दील खामोश हो गया...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा