पाककृती

आंबाड्याचे रायते.

Primary tabs

साहित्यः- ५-६ आंबाडे. लाल तिखट. गूळ. मिठ. मोहरी. एक वाटी खवलेले खोबरे. फोडणीसाठी तेल. कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी. हे आंबाडे. Image removed. Image removed.

आंबाड्याचं रायतं छान दिसतंय, तसं खाण्यासाठीही छान लागत असावं.
मी असं रायतं कधी खाल्ल्याचं आठवत नाही. :(

-दिलीप बिरुटे

खल्लास डिश आहे प्रा.डॉ.
अस्सल कोकणी.
रायत्याचे एक डेरीवेटीव.
आंबाड्याची आमटी(आंबट).
गरम भाताबरोबर.
ही आमटी ओरपताना कोकणी बरोबर ओळखता येउ शकतो.

नव-वधू

आंबाडे एकदम कैरी सारखे दिसतात. नक्किच छान लागत असेल.