पाककृती

बाप्पाचा प्रसाद्-पंचखाद्य.

Primary tabs

कोकणात सध्या गणपतीची धामधूम सुरु आहे.रोज वेगवेगळा नैवेद्य.बाप्पाच्या आगमनाने घर भरलेलं आहे. पंचखाद्य हा बाप्पाचा खास प्रसाद्.आज त्याची रेसीपी. आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा. Image removed. साहित्यः-ज्वारीच्या लाह्या. गूळ, भाजलेले शेंगदाणे. फुटाण्याची डाळ. काजुचे तुकडे. भाजलेली मुगाची डाळ. सुक्या खोबर्‍याचे तुकडे. तूप. कृती :- ज्वारीच्या लाह्या. Image removed. गूळ सोडून बाकी साहित्य एकत्र करावे Image removed. कढईत एक चमचा तूप घालून त्यात गूळ घालावा व त्याचा एकतारी पाक करावा. Image removed. पाक तयार झाल्यावर त्यात एकत्र केलेले साहित्य व लाह्या घालाव्या. Image removed. पंच्खाद्य तयार. Image removed.