पाककृती

गौरीपूजेचा नैवेद्य- घावन-घाटले

Primary tabs

Image removed. साहित्य घाटले: एका नारळाचे घट्ट् दुध एक वाटीभर चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून तांदुळपिठी कोरडीच भाजून १/२ टीस्पून जायफळपूड १ टीस्पून वेलचीपूड Image removed. पाकृ: मंद गॅसवर भांडयात नारळाचे दुध घालून ढवळावे. त्यात चिरलेला गुळ घालून एकत्र गुळ विरघळेपर्यंत ढवळावे. Image removed. गुळ विरघळला की त्यात कोरडी भाजलेली तांदुळपिठी घालून एकत्र करणे. Image removed. घट्ट्सर झाले की त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालणे. Image removed. साहित्य घावनः २ वाटया तांदुळपिठी दुध लागेल तसे चवीपुरतं मीठ Image removed. पाकृ: तांदुळपिठीत लागेल तसे दुध घालणे व मीठ घालणे व सरसरीत भिजवावे. Image removed. नॉन-स्टीक तवा तापवून , थोडे तेल सोडून डावाने घावन घालावे. Image removed. झाकून शिजवणे, झाले की घडी घालून काढणे. गरमा-गरम घाटल्यासोबत घावने सर्व्ह करावेत. Image removed.
पिंगू

सध्या मोदक चापतोय.. घावन घाटले फुरसतीने करण्यात येईल.
बाकी पाककृती जबरा आहे...

- पिंगू

Mrunalini

मस्तय गं.... मला ते घाटले बघुन, पुरणपोळी सोबत गुळवणी करतात, त्याची आठवण झाली.

जाई.

घावने पाहून तोँपासु

सुनील

व्वा! कोकणात गेल्यासारखे वाटले!

(काही ठिकाणी गौरीला तिखटाचा नैवेद्य करतात बर्र्का! तेव्हा त्याचीही पाकृ येउदे! )

रेवती

आज गौरींच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळी असते. ती केलिये.
पुढच्या विकांताला घावन घाटल्याचा घाट घालते.
मी हा पदार्थ एकदाच खाल्लाय पण फोटू पाहून मस्त वाटलं!

प्रचेतस

तो कुठेच दिसत नाहीये, खरोखरच तिजोरीत प्याक करून ठेवला असेल. :)

हो असेच समजा...कारण तो बिचारा आता वापरण्याच्या लायकीचा राहीलेला नाही ओ...तुटला बिचारा (तरी मी त्याला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावत असे)...म्हणून त्याला आठवण म्हणून जपून ठेवला आहे :)

Mrunalini

अरेरेरे.... खुप वाईट झालं... चांगला होता बिचारा..
किती जणांच्या मनात भरला होता...
@५० फक्त - शोकसभेला कधी जायचं???

Mrunalini

अरेरेरे.... खुप वाईट झालं... चांगला होता बिचारा..
किती जणांच्या मनात भरला होता...
@५० फक्त - शोकसभेला कधी जायचं???

हो ना माझ्यापेक्षा ५० फक्त ह्यांना खुप वाईट वाटेल ...
असो मी अगदी तसाच आणेन हा लवकरच म्हणजे त्याची उणीव भासणार नाही ;)

शुचि

प्रतिसाद्कर्त्यांनी फक्त तो हे सर्वनाम वापरून नक्की कोण याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या पाकृमधील प्रतिसादांचे एक मोठं शक्तीस्थान आहे.

दीपा माने

फोटोवरुनच पदार्थ किती सात्विक वाटतो नैवेद्यासाठी! चवीलाही छानच लागत असेल.

५० फक्त

मालवणात घावन अन नारळाची चटणी खाल्ली होती त्याची आठवण झालि, अगदि घरी चुलीवर केलेली घावनं जाम भारी होती, ही पण तशीच असतील, पाह्तो करुन कधितरी.

रेवती

का गं?
क्यानमधे मिळते ना!
ते चालेल नाही का गं सानिका?
निदान मी तरी क्यान आणीन असा विचार करत होते.

स्वाती२

अहाहा! नुसतं नैवेद्याचे ताट बघूनच मन भरलं.

कच्ची कैरी

व्वा पाकृ.तर छान आहेच पण ताटाखालचा तो मोत्यांचा रुमालही सह्हीच आहे !!