पाककृती
जवसाची खमंग चटणी
Primary tabs
साहित्यः
१/२ वाटी जवस/ अळशी/ Flax Seeds
१२-१५ कढीपत्ता
३ टीस्पून तीळ
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून जिरेपूड
मीठ व साखर चवीपुरतं
तेल
पा़कृ:
पॅनमध्ये थोडया तेलात (साधारण १/२ टीस्पून) कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा.
त्याच तेलात जवस परतून घेणे.
थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून परतणे.(करपवु नये)
थोडे गार झाले की त्यात मीठ, साखर, लाल तिखट, जिरेपूड व तळलेला कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे.
खमंग जवसाची चटणी तयार.
जवस अतिशय पौष्टीक आहे त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते :)
जवसाची चटणी अन भाकरी...तोंडाला पाणी सुटले नुसत्या आठवणीनेच..
अशी चटणी करुन बघते. आधीची हल्लीच संपलीये.
आजच करते...
जवस तेलकट असतात ना? मग ते तेलावर परत्ण्या ऐवजी नुसते कोरडे भाजले तर चालतील का?
पण चटणी आवडली हो!
हो जवस तेलकट असतात पण कढीपत्ता तळून झाल्यावर जे काही थोडे बहुत तेल उरते त्यात परतायचे म्हण्जे चटणी खमंग होते :)
आणी तेलाचा वापरही फार नाही आहे गं...फक्त १/२ टीस्पून ;)
करुन बघायला पाहिजे.
>>जवस अतिशय पौष्टीक आहे त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते
कोणी "ओमेगा-३ फॅटी अॅसिड" चे फायदे सांगु शकेल का ?
ही चटणी जबरी टेस्टी असते. पाकृबद्दल धन्यवाद..
मला वाटतं यात काळं मीठ वापरतात का? जास्त चटकदार लागते त्यामुळे.
वा फोटो आणि चटणी दोन्ही मस्तच.
पाकृ आणि फटु बेश्ट.
पण एक दुरूस्ती सुचवतो. "खमंग जवसाची चटणी" ऐवजी " जवसाची खमंग चटणी" हे जास्त योग्य वाटते.
धन्यवाद :)
:) :-) :smile:
मस्त पाकृ व फोटो
मस्त
खमंग झालेली दिसते आहे चटणी!
आळशी म्हणजे जवस हेच माहित नव्हते. मी फक्त फ्लॅक्स सीड्स् शोधायचे.
भारतीय दुकानात चिक्कारवेळा आळशी बघत होते. याआधी एकसारख्या दिसणार्या म्हणून चुकीच्या आणलेल्या गोष्टींमुळे धीर झाला नव्हता आणि मी जवसाच्या चटणीला मुकले होते.;) नेमके फ्लॅक्स सीडस् सोडून सगळ्या गोष्टी आधीच्या हिरव्या ग्रोसरीत मिळायच्या. अब मुझे जवस चटणी बनानेसे कोई नही रोक सकता| ;)
आधी तीळ खोबरे चटणी केली होती. ती संपल्याने तीन दिवसांपूर्वीच लसूण, शेंगदाणे आणि तीळ केलीये. ती संपली की जवस नक्की! थंडी आली की तेलबियांच्या चटण्या हव्यातच.
वा. एकदम मस्त. कारळ्याची चटणी पण अशीच करतात का???
साहित्य - निवडून धुवून वाळविलेले कारळे १ वाटी, अर्धी वाटी निवडलेले पांढरे तीळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, ४-५ लसणीच्या सोललेल्या पाकळया.
कृती - प्रथम तीळ व कारळे वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. ते एकत्र करून त्यात तिखट, मीठ व लसूण पाकळया घालाव्यात. सर्व खलबत्यात एकत्र करून जाडसर कुटावेत*, ही चटणी पुष्कळ दिवस टिकते. भाकरीबरोबर तेल घालून विशेष चांगली लागते.
(जालावरून साभार. जालावरून घेतली असल्याने फटु नाही.)
* मिक्सरमधून काढली तरी चालते. पण कुटलेल्या (कुठल्याही) चटणीची चव मिक्सरमधून काढलेल्या चणणी पेक्षा वेगळी (म्हणजेच चांगली लागते.)
कारळे धुवून घेतात हे नव्याने समजले. आमच्याकडे तीळ घालून/ न घालता याच कृतीने चटणी केली जाते.
फक्त फरक असा की उन्हात खडखडीत वाळवलेली आमसुले/ कोकम चटणी बारीक करताना घालतात. ऐनवेळी चटणीत घालावयाला सुकलेली कोकमे नसल्यास गरम तव्यावर/ कढईत मंद आचेवर ठेवल्यास चालते.
कारळ्याच्या चटणीच्या पाकृ साठी धन्यवाद. :)
मेरेकू कायकू धन्यवाद?
चिंतुकाकाने ये रेशिपी लिख्खी हय|
१ वाटी कारळे कोरडेच भाजून घ्यावे, १/२ वाटी कोरडेच भाजलेले तीळ, १/२ वाटी दाण्याचा कूट, पाव वाटी सुके खोबरे कीस, वाटीभर कढीपत्ता, ६-७ लाल सुक्या मिरच्या, मीठ, हिंग, तेल थोडे जास्त :)
तेलात हिंग, सुके खोबरे घालून परतून बाजुला काढून ठेवणे. त्यातच लाल मिरच्या तळून (शॅलो फ्राय) बाजुला काढून ठेवणे, मग कढीपत्ता तळून बाजुला काढून ठेवणे.
सगळे साहित्य एकत्र करुन मिक्सरवर वाटून घेणे.
चटणी तयार :)
असे सगळेच म्हणत आहेत. पण "खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत" असे म्हणणारा ५० फक्त उर्फ हर्शदभाउ कुठे आहेत?:O :-O :shock
(स्वगत- यावेळी सानीकाने चमचे वापरले नसल्याने पाठ फिरवली असावी;) ;-) :wink:)
आलो आलो काका , काल जरा बाहेर गेलो होतो, कुठे ते पण सांगतोच आज रात्री.
असो, सास्व यांनी सदर चमचा माझ्यासाठी काढुन तिजोरीत ठेवल्याचे ड ढॉन मध्ये वाचल्यापासुन मि त्याबद्दल निश्चिंत आहे.
आता चटणीबद्दल म्हणाल तर, ही चटणी मी ब-याच वर्षापुर्वी माझ्या मावशीकडे खाल्लेली आहे, घोळसगाव तिचं गाव होतं अक्कलकोट मध्ये, त्यांच्याकडे देवघरात एक सोवळ्यातलं उखळ होतं, मावशीची मोठी जाउ ही चटणी त्यात कुटायची आणि मग आम्हाला लोणी न काढलेल्या ताकात कालवुन द्यायची भाकरीबरोबर. शहरातुन जात असल्यानं मला आवडायची नाहीच पण घरच्या धाकट्या सुनेच्या माहेरचे पाहुणे असल्याने..... असो.
''जवस अतिशय पौष्टीक आहे त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असत'''' - यात इनोसारखा परिणाम करणारे काही घटक असतात का ओ, उद्या काहीजणांना गरज पडेल अशा कशाची तरी.
असो. चिंतामणीकाका, ते वैद्य आठवण काढत होते आपली, म्हणाले १०० वर्षे हाटेल चालवतोय तुम्ही यावं म्हणुन, त्यांना सांगु काय, या रविवारी येतो सकाळी असं.
असो, सास्व यांनी सदर चमचा माझ्यासाठी काढुन तिजोरीत ठेवल्याचे ड ढॉन मध्ये वाचल्यापासुन मि त्याबद्दल निश्चिंत आहे.
हा तुमचा गैरसमज आहे बरं का हर्षदराव! तुमची त्या चमच्याला नजर लागू नये म्हणून तिने तो काळ्या कापडात लपेटून तिजोरीत सुरक्षित ठेवलाय ;)
बाकी चटणी छानच गं सानिका!
म्हंजे थोडक्यात, जहां तेरी ये नजर है , असं आहे म्हणायचं.
असो, म्रुणालिनतै, एफ१ एफ१ एफ१, आपल्या चमच्यांच्या फॅक्टरीचं काय झालं ओ,
आणि अरेरे, काय हे दिवस आले ड ढॉन सारख्या पेपराने गैरसमज पसरवणा-या बातम्या छापव्यात हे एकंदर जगबुडीचे लक्षण आहे असे मानावे काय, या बद्दल एक पत्र लिहिन म्हणतो, ड ढॉनला.
अरेरे, काय हे दिवस आले ड ढॉन सारख्या पेपराने गैरसमज पसरवणा-या बातम्या छापव्यात हे एकंदर जगबुडीचे लक्षण आहे असे मानावे काय, या बद्दल एक पत्र लिहिन म्हणतो, ड ढॉनला.
नक्की नक्की. तुम्ही असं पत्र लिहाच आणि ते आमच्यासाठी इथेही प्रकाशित करायला विसरू नका!
पण बाकी कंपनीला (लाल) तर्री नसलेली मिसळ आवडेल की नाही याची शंका असल्याने जाहीर कार्यक्रम न करण्याचा विचार केला होता.
आपण दोघेतरी नक्कीच जाउ.
काका, तुम्ही फक्त कुठं जमायचं सांगा, माणसं जमवणं माझ्याकडं लागलं. पार पहाटे चार वाजता घरुन माणसं नेउन दुस-या दिवशी पहाटे दोन ला घरी सोडलेली आहेत.
तुमचे ठरले की मलाही सांगा. हजेरी लावण्यात यैल अगदी पहाटे 4:00 वाजता सुद्धा!
- (सकाळी 9 वाजता उठणारा) सोकाजी
सही !!
एकदम मस्त. पाकृ व फोटो आवडला. तोंडाला पाणी सुटले धन्यवाद !!!!!!!!!
शेवटच्या फटुतली सांडामांड हा पाकृचा भाग की सजावटीचा....?
जवसाची टचणी आणि गरम भाकरी.
अथवा शिळी भाकरी आणि टचणी,तेल.
आहाहाहा.....!
ओ तो सजावटीचा भाग आहे प्यारेभौ :)
ओ तो सजावटीचा भाग आहे प्यारेभौ :)
काल चटणी केली. मस्त.
कळण्याची भाकरीसह खाल्ली. (कळण्याच्या भाकरीबाबतही मिसळपावावरच शिकलो. मिसलपावाला दुहेरी धन्यवाद.)
सानिका, आत्ताच चटणी केली.
अगदी तू दिलेल्या प्रमाणानुसारच............माझा आवडता अधिकपणा ;) म्हणून एक छोटे कोकम जवसाबरोबर परतून घातले. अगदी मस्त! कढीपत्ता परतून उरलेल्या तेलात जवस परतल्याने चवीत फरक पडला. जास्त खमंगपणा आला.
मी आधी कोरडे परतत होते. त्यामुळे चटणी कोरडी होत असे तशी झाली नाही. आता हीच रेसिपी फॉलो करणार.
वरती कुंदनने विचारले आहे ओमेगा थ्री फॅटी अॅसिडसबद्दल - हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ही फॅटी अॅसिड्स अत्यावश्यक असतात आणि एकूणच शरीराच्या निरोगीपणासाठी ह्यांचे योगदान आहे. सर्वसाधारणपणे मासेखाऊंना ही अॅसिड्स मिळतात परंतु शाकाहारींसाठी ही मिळवणे अवघड असते. जवसात हे भरपूर प्रमाणात आढळते. तसेच आक्रोड, पेकन्स आणि हेझलनटमध्ये सुद्धा मिळते. परंतु जवस हे चटणीस्वरुपात रोजच्या आहारात समाविष्ट करणे सोयीचे ठरते.
(जवसचटणीप्रेमी) रंगा