रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १)
Primary tabs
हा रविवार रानफुलांच्या शोधात घालवू असे ठरवले आणि सकाळी नणंदेला घेउन रानफुलांच्या वाटेने निघाले. आमच्या एरीयात मी पहीलीच असेन अशी रस्त्यात फोटो काढणारी. जर लाजले तर मुळ हेतू दुर राहील आणी मनसोक्त फोटो काढता येणार नाही. म्हणून रस्त्याला कोण येत जात तिथे पाहीलच नाही. नणंदेला स्कूटीवर ड्रायव्हिंग करायच होत म्हणून तिने तिची वेगळी आणि माझी वेगळी अश्या दोन गाड्या घेउन आम्ही दोघी हम दो शेर चले प्रमाणे निघालो. सुरुवातीलाच एका ओसाड जागी जाऊन दोघी थांबलो. ती फक्त जाण्या येण्याची वाट आहे. दुचाकी तिथे जात येत होत्या. मला कॅमेरा अॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा. अस वाटत होत मी फोटोग्राफीचा कोर्स करायला हवा होता. इतकी सुंदर फुले आणि मला चांगले फोटो काढता येत नाहीत ह्याच दु:ख मनात ठेवुन शेवटी मी सगळे फोटो ऑटो मोडवर काढले. उनही मध्ये मध्ये येत होत.
त्या ओसाड वाटेवर एक दुचाकी परत फिरुन आली आणि आम्हाला विचारल मॅडम काही प्रॉब्लेम आहे का ? त्यांना वाटल आमची गाडी वगैरे बिघडली असेल म्हणून आम्ही तिथे थांबलोय. मग फोटो काढतोय म्हटल्यावर मनातल्या मनात आमच्या नावाने त्यांनी शंख फोडले असतील. :हहा: येणारे जाणारे सगळेच आमच्याकडे काय वेड्या कसले फोटो काढताहेत ह्या हावभावाने पाहत होते अगदी मान वळवून. पण मी कोणाकडे पहायचच नाही हे पथ्य पाळून फोटो काढत होते. मला नणंदेचीही काही फुल शोधून देण्यात मदत झाली. जवळ जवळ २ तास आम्ही फुलांचे फोटो काढत होतो.
ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे. सध्या कामगार ही झुडपे कचरा म्हणून उपटून टाकत आहेत. मला खुप राग येतो त्यांचा पण त्यांच ते कामच आहे. इच्छा एवढीच आहे की त्यांनी ही झाडे सुकल्यावर ती काढावीत.
फोटो काढताना जाणवले की आपण जी मुबलक प्रमाणात फुलतात तिच फुले पाहण्यात येतात. पण सुक्श्म नजर ठेउन पाहील तर पुष्कळ रानफुले आपल्या आसपास असतात. मला जशी टिपता आली तशी खाली देत आहे. ह्या काही रानफुलांची नावेही मला माहीत नाहीत जाणकारांनी ती द्यावीत.
११) हे इतके छोटूकल आणि सुंदर फुल होत की बघतच बसावस वाटत होत.

अजुन खुप रानफुले आहेत. आता पुढच्या भागात.































सगळे फोटो खुप मस्त आहेत.. :) धन्यवाद जागुताई
अप्रतिम
मस्त फोटो
जागुतै तुझ्या चिकाटीला _/\_
खुपच अप्रतिम, एकदम खेडेगावातल्या माळरानातल्या पायवाटांवरून चालल्या सारखं वाटलं. खरच, हे रानफुलं किती दुर्लक्षीत असतात पण तुम्ही त्यांच खरं सौंदर्य आणि ऐश्वर्य तुमच्या फोटोज मधुन दाखवुन दिलं त्यासाठी शतशः -^-
तुमचे सर्व जुने धागे बघता एकच म्हणेन ... जागुतै - A true LIVELY Indian :)
विशाखा, जाई, उदय धन्यवाद.
मस्तच ग जागुतै.
गोकर्णाची फुल पाहुन जमाना लोटला. :)
जागू स्पेशल. प्रकाशचित्रे आवडली.
छान. +१.
खूपच छान फुलं आहेत गं जागुताई. काही पाहिलेली तर काही नवीनच...
जागु , सर्वच फोटो छान आलेत :)
गणपा, श्रावण, स्मिता, प्राजक्ता धन्यवाद.
मष्ट ! :)
भाग २ ची वाट पाहतो. :)
जमल्यास मी पण फुलवाला धागा टाकतो...
(गुलाब प्रेमी) :)
निव्वळ अप्रतिम ..
जबरदस्तच ,
जागुताय.. मस्त फुले आहेत. ह्यातील काही फुले कासला बघितली आहेत.
- पिंगू
वॉव.......! सगळ्यात मस्त असेल तर तो नं-१८..... फिदा... खल्लास... मार डाला.... एटिन टिल आय डा...य....! :-)
वा, जागु, खूपच छान!
गणेशा, ५०,पराग, पिंगु धन्यवाद.
लय भारी फोटोज बघा.... ते १६ नंबर वेगळंच वाटलं....
अरेच्चा हा धागा कसा बघायचा राहिला ?
हे कुठे आहे ? मला येथे फोटो काढायला यायचे आहे. मदत होईल का ?
काही फुले अगदीच नवीन आहेत मला. १६ वे बहूदा रान पडवळाचे असावे. शास्त्रीय नाव बहूदा Cucurbitaceae. (Flowers of Sahyadri मधून).
थांबा ! मी आलोच :-)
ट्रायपॉड नी कॅमेरा घेऊ द्या की रं
मला बी फोटोला येऊ द्या की रं
फुल एकदम छान आहेत पन जंगली झुडपांचे फोटो टाकन्याचे प्रयोजन नाही कळले
जागुताई,
फोटो पाहून कोकणातले दिवस राहून राहून आठवत आहेत.
उत्कृष्ट छायाचित्रण.
क्यामेरा कोणता आहे तुजपाशी ?
खूप छान आहेत छायाचित्रे. जरा संकलीत (एडीट) केली असती तर अजून मजा आली असती.
>>> ठिकाण मुद्दामच लिहत नाही कारण कास सारखी परिस्थिती ह्या रानफुलांची होऊ नये. त्यांनी मुक्तपणे रुजावे फुलावे हिच इच्छा आहे.
हे वाक्य तर प्रचंड आवडलं!
आपल्या साधनेला प्रणाम.
१८ अ आणि १८ ब बहुतेक इंग्लिश झेंडू असावेत.
बाकी फोटो सुंदर आले.
क ह र!!
अप्रतिम!
ते छोटुकलं पांढरं फूल कसलं सुंदर आहे.. पाकळ्यांना तुरे आहेत.. :)
मस्त फुलं!
काही पाहिलेली तर काही न पाहिलेली.
१६ नंबराचं फूल एक नंबरी आहे.;)
असं असू शकेल याची कल्पना केली नव्हती.
प्रास, जयंत, नावसेना प्रमुख, प्रभाकर, पाषाणभेद, बद्दू, प्राजु, रेवती, जयंत कुलकर्णी धन्यवाद.
इरसाल कॅमेरा कॅनॉनचा आहे.
जबरदस्त छायाचित्रे....... मस्त
भारी ! भारी !! भारी !!!!!!!
डोळे तृप्त झाले !
जाईन विचारीत रानफुला ....
भेटेल तिथे गं, सजण मला
भग्न शिवालय परिसर निर्जन,
पळस तरुंचे दाट पुढे बन,
तरुवेली करीतील गर्द झुला,
भेटेल तिथे गं, सजण मला !
उंच पुकारील, मोर काननी,
निळया ढगांतून भरेल पाणी,
लहरेल विजेची सोनसळा,
भेटेल तिथे गं, सजण मला !
वाहत येईल पूर अनावर ,
बुडतील वाटा आणि जुने घर,
जाईल बुडून हा प्राण खुळा,
भेटेल तिथे गं, सजण मला !
गीतकार :शांता शेळके
सुंदर फोटो, शार्प फोकसिंग आणि फुलांना जपण्याच्या तुमच्या भावनांना सलाम. आणि मानल तुम्हाला काय काय करता तुम्ही.
फोटो काढायला जाताना १ व्हाइट कार्डबोर्ड जवळ असावा ज्याचा वापर रिफ्लेक्टर सारखा करता येतो वा विषयावर पडणारे थेट उन टाळण्यास देखिल होतो.
मत्त मत्त फोटो!
आडौले. :) (शब्द वप्याकडून साभा... कशाला? तसाच घेतला आहे. ;) )
१६ क्रमांकाचा फटु तर लैच आडौला गेला आहे....
त्याचं नाव सांगितल्यास वुत्तम....
छान आहेत फोटो. यातली बरीचशी फुले कधी पाहिलीही नाही तुमच्या मूळे पहावयास मिळाली त्या बद्दल धन्यवाद !
आणि दंडवत तुमच्या हौशिपानाला --- /\ ---
सविता, पल्लवी, अंकल, प्यारे१, वडापाव, दिप्स धन्यवाद.
वहिदा एकदम मस्त वाटल.