सोडुनी गेलास जिथे....

सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी!
परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!!

मी वेडी पाहते तुला.. जागे असुनी स्वप्नी!
शब्दहि ना पोह्चे तिथे..तु जवळ उभा दिसुनी!!

जाणते व्यथा मी तुझी रे..मज जाणुन घे तुही!
एकच प्रश्न उरी जाहला..एकच प्रश्न उरी जाहला...
तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??

सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी!
परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!!

खुप छान लिहीलं आहे... पुढ्च्या काव्याची वाट पाह्तोय...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मस्त कविता.
त्यातही
तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??
हे सर्वात मस्त.

आपलाच,
मनोबा