पाककृती
नक्षिदार पराठे
Primary tabs
साहित्यः
पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी)
अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट
१ किसलेला गाजर
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
गोडा मसाला १ चमचा
मिठ
साजूक तुप
गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या
पाककृती:
तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:)
आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)
चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.
सॉस, चटणी कशाही बरोबर खा.
अधिक टिपा:
ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.
चम चमीत आहेत हो ..
लंच टाइम ला धागा उघडला ..आता पराठा हाउस ल जावे लगेल
पराठा मस्तच..... पण
यात नक्षीकाम कुठे आहे.........
वा वा.. चहासोबतही मस्त लागेलसे वाटते.. झक्कास.
:)
मटाराची पेस्ट घातल्यास चोथट होण्याची शक्यता नाही ना?
धन्यवाद.
;मटाराची पेस्ट घातल्यास चोथट होण्याची शक्यता नाही ना;; - शाजिकडे हरि मिर्च पराठा खाउन पहा, त्यात मिरच्या कुठल्या अन मटार कुठले तेच कळत नाही, आणि चोथट होत नाही, फक्त पराठ्याची जाडी जास्त हवी अजुन.
आभार..
आता यायलाच हवं वेळ काढून त्या शाजीकडे...
मस्तच... माझा आवडता खाद्य प्रकार. हे नक्की ट्राय करायला आवडेल :) :)
शाहिर, गवि धन्स.
मनराव ती गाजर आणि कोथिंबिरची लाटलेल्या चपातीत स्पष्ट नक्षी दिसत आहे. पराठा भाजल्यावर ती पुसटशी दिसते.
हेल्दी पराठे. :)
उगा भुक चाळवली. :(
अवांतर :- नक्षी थोडी अजून नाजूक व कलाकूसरीने भरलेली बनवता येइल काय, दूल्हनची मेंदीच जणू ? तसच त्यात ब्याचलर नक्षि, नववधू नक्षी असे काही सब-प्रकारही इनव्हेंट करावेत. तेव्हडच वेरीएशन...
रंगीत पराठे /तिरंगी पराठे असं नावही चालेल.
झकास !!
गवि तिरंगी पराठे वेगळे असतात म्हणून मला हेच नाव द्यावे लागले. साजेस वाटत नाही का ? तसे असेल तर बदलते.
आत्मशुन्य आता एवढी कला कुसर करण्यासाठी मला गाजराचे आणि कोथिंबिरचे धागेच करावे लागतील.
गणपा धन्स.
नाही नाही. नाव अगदी योग्य आहे. मी आपले आल्टर्नेट सुचवले इतकेच.
बाकी आशूचा प्रतिसाद वाचून एखादी सुगरण पालकाची पेस्ट प्लॅस्टिक कोनमधे भरुन नुकत्याच तयार झालेल्या पराठ्यावर कुयर्या आणि नक्षीवाली मेंदी काढतेय असं चित्र डोळ्यासमोर आलं. :)
जागुताई, पराठे छानच दिसत आहेत आणि चवीलाही मस्तच असतील.
या दुव्यावर पराठ्यांची आणखी एक पद्धत दिलेली आहे. त्या पद्धतीने पराठे बनवल्यावर त्यावर पालकाच्या बारीक-बारीक तुकड्यांची एकात एक गोलाकार (कॉन्सेन्ट्रिक सर्कल्स) अशी नक्षी तयार होते. वरील साहित्य तसेच वापरून फक्त लाटण्याकरता दुव्यावरची पद्धत वापरल्यास आणखी सुबक नक्षी मिळू शकते.
स्वानुभवः पालक वाफवल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट न बनवता सुरीने बारीक कापून पीठात मळल्यास गोलाकार पॅटर्न आणखी सुंदर दिसतो.
मस्त झाले आहेत नक्षीदार पराठे :)
पाककृती एकदम जबरदस्त आणि तोंपासू.
थेट शाजीचे पराठेच डोळ्यांसमोर तरळले,
मस्त झालेत
तोँपासु
मस्त!!!
स्मिता, विशाखा, वल्ली, जाई, मोहनराव धन्यवाद.
गवी तश्या कोनातून सॉसची डिझाईन करायला हरकत नाही. (काय डोक चालल वा वा )
मस्तच ह .....आता करुनच पहाते..
गाजर + बीट असे केलेत आज. मिरच्या बारीक चिरून घालणे, आले आणि जिरे. तेही छान लागतात.
तुझ्या पराठ्यातली नक्षी खरच बांगड्यांच्या तुकड्यांसारखी वाटतिये. म्हणजे मांसाहारींसाठी बांगड्यांच्या तुकड्यांची पाकृ तशी शाकाहारींसाठी ही पाकृ!;)
बांगड्याचे पराठे.... ! :)
कसं वाटतंय नाव??
बाय द वे.. पालक किंचित वाफवून त्याचे तुकडे, पेस्ट वगैरे काहीही न करता.. त्यातच कणिक मळावी.. पालक आपोआप कणकेत एकजीव होतो. आणि लाटताना गोलाकार नक्षी उमटते..
कधी कधी मी एका बशीत कांदा आणि हिरव्या मिरच्या बारिक चिरून पसरून ठेवते.. आणि पालकाच्या कणकेचा छोटा गोळा लाटण्या आधी त्या बशीत किंचित घोळवून घेते... आणि मग लाटून, तूपावर भाजून पराठे शेकते. खूप सह्ही सह्ही लागतात.
कांदा मिरचीची कल्पना छान!
भारी!!
प्राजू मस्त आहे तू सांगितलेला प्रकार. करून बघेन.
रेवती अगदी बरोबर.
प्रभो धन्यवाद.
मस्तच गं, चांगली आहे पाकृ.. :)
मस्त. मटारसुद्धा टाकुन करुन बघते. तेवढंच लेकीच्या पोटात भाज्या जातील अन माझ्यावरचे तिचे उपकार वाढतील.
व्वा !!नक्षीकाम तर मस्तच जमुन आले आहे ,आवडले!
मृणाल, कच्ची कैरी धन्स.
शिल्पा माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच आहे. मलाही तिला भाज्या अश्या पराठे, थालिपिठाच्या रुपात द्याव्या लागतात.
खरचं एकदम पौष्टिक पराठे :)
नेमकं ह्याच वेळी यायचं होतं का समोर....
जागु ताई एकदम सहि दिसतोय डोळ्याला...[खायला कधी बोलवताय?]
मस्तच ग जागुताई.
तिरंगी पराठे पण छान लागतात आणि दिसतात.
मूठभर पिठाचा एक गोळा पालक पेस्ट, दुसरा बीट पेस्ट , तिसरा नुसते पीठ असे मळून मग साधारण पुरी एवढे वेगवेगळे लाटून घ्यायचे . त्यांना एकमेकांवर ठेवून सुरळी बनवायची परत त्याच्या लाट्या काढून मोठ्या आकारात लाटून घ्यायचे मस्त तिरंगी पराठे किंवा पुरी तयार.
हे शोर्ट कट आहे (मीठ, मिरची, तेल, तळणे इ. ह्या गोष्टी समजून घेणे.)
इरसाल तसेही करुन बघते.
डावखुरा कधी येताय बोला?
वा... :)