पाककृती
सोप्पा लेमन केक
Primary tabs
साहित्य:
१ वाटी मैदा
१२ टेस्पून साखर
२ अंडी (फ्रिजमधून थोडे आधी काढून ठेवावी)
४ टेस्पून तेल
४ टेस्पून दुध
११/२ टेस्पून लिंबाचे किसलेले साल (फक्त पिवळा भाग, पांढरा नको नाहीतर कडवट होईल)
१ टेस्पून लिंबाचा रस
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टेस्पून व्हॅनिला इसेन्स
मीठ जरासे चवीपुरते
पाकृ:
प्रथम मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन-तीनदा चाळून घेणे.
एका भांडयात अंडी व साखर इलेक्ट्रीक बीटर किंवा वायर-व्हिस्कने घट्ट होईपर्यंत फेटणे.
त्यात थोडे-थोडे करून तेल घालून चांगले फेटणे.
मग त्यात चाळून घेतलेला मैदा थोडा-थोडा करुन घालणे व एकत्र करणे.
मैदा अगदी चांगला मिसळला की त्यात दुध घालावे व फेटावे.
आता त्यात व्हॅनिला इसेन्स, लिंबाचे किसलेले साल व लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकत्र करणे. (फोल्ड करणे)
तुप लावलेल्या केकच्या भांडयात हे मिश्रण ओतून, प्री-हिट केलेल्या ओव्हन मधे १८० डिग्रीला ३५-४० मिनिटे बेक करणे.केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून गार करायला ठेवणे.
त्याचे स्लाईसेस करणे व खायला सुरुवात करणे.
नोटः
ह्या केकवर तुम्ही कुठले ही फ्रॉस्टींग लावू शकता, आईसिंग शुगर भुरभुरु शकता....मला ह्याचा सिट्रस फ्लेव्हर खुप जास्त आवडतो, म्हणून मी त्यावर कसलचं ग्लेज किंवा फ्रॉस्टींग लावत नाही.
भारी आहे.
फोटू मस्त!
एक शंका, लिंबाच्या सालीचा फ्रेश वास असताना व्हॅनिला एसेंन्स वापरल्याने काही चांगला फरक पडतो का?
स्वातीताईची आठवण आली.
हो व्हॅनिला एसेंन्स घातल्यामुळे अंड्याचा वास येत नाही आणी लिंबाच्या सालीचा फ्रेश वास खुपचं स्ट्राँग असल्यामुळे चवीत फरक पडत नाही :)
रेसेपी मस्त आहे ,ओव्हन घेतल्यानंतर नक्की ट्राय करेल.
झक्कास केकृ.. आवडले गेले आहे.
- पिंगू
वा...मस्त. चाखुन पाहिला पाहिजे...:)
हल्लीच डच चॉकलेट केक चाखला होता,त्यो बी लय झॅक लागतो. :)
(केक प्रेमी) :)
वाह वाह... स्पोप्पी पाककृती...धन्स !! :) :)
जबरा, लई भारी केकृ.
खालुन तिसरा फोटो तो पुर्ण झालेल्या केकचा, अपसाईड डाउन करुन लावता का मस्त स्माईलिंग केक दिसेल.
वा... मस्त्च गं..... मला हा फोटो बघुन माँजिनिज मधे स्लाइस केक मिळायचे, त्याची आठवण झाली. खुप आवडतात मला ते. :)
मस्त झालेला दिसतोय केक. :)
मस्तच. ग्रॅन्ट रोडला मावाकेक सोबत हे लेमन केक ही खूप छान मिळतात.
ज ह ब ह रा!!!!
करेन मी नक्कीच!
मस्तच ह
सोप्पी पाकृ. मी माझ्या मुलीला हा केक करायला लावणार आहे.
खल्लास पाकृ!