कलादालन

एक रम्य संध्याकाळ!!

Primary tabs

नमस्कार मिपाकरहो!! मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती. तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन. आमच्या कॉलनीमागे एक मस्त ओल्पर नावाचे तळे आहे. त्याच्या बाजुनेच जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. खुप लोक सकाळ संध्याकाळ जॉगिंग करत असतात. मी सुद्धा जॉगिंगचे प्रयत्न केलेत पण आजतागायत कायमपणा ठेवता आलेला नाही. असो. पण फिरायला जातो. तर जरा या रम्य संध्याकाळचे फोटो काढले आहेत. ते इथे चिकटवतो. ही जाण्याची वाट... Image removed. कानात मस्त आयपॉड लावुन जगजीत साहेबांच्या गझल ऐकत निघालो होतो... Image removed. मध्येच आकाशात एक चॅटर प्लेन चाल्ले होते.. एक क्लिक मारला जाता जाता.. Image removed. एक जोडपे फिरायला निघालेले चिरंजिवांबरोबर... Image removed. Image removed. Image removed. मग दिसला तो राजहंस... याच्याबद्द्ल शब्दात काय वर्णन करणार? Image removed. Image removed. Image removed. Image removed. बाकी थोडे चालु झालेल्या फॉलचे फोटोज.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. हे ते नयनरम्य तळे... Image removed. Image removed. Image removed. Image removed. सुर्व्या आला तळपुन गेला.. मावळतीच्या खळगालीला...(पण जास्त तळपत नाहीये आजकाल :( .... ) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. हे जोडपेपण मस्त मजा लुटत आहे.. Image removed. नंतर काय झाले काय माहित... भांडले कदाचीत... ती त्याला सोडुन पळाली... :( Image removed. आणि मग आम्हीसुद्धा घराकडे पळालो...काय करणार थंडी वाढत होती... (कॅमेरा साधाच डिजीट्ल आहे.. आणि मी शिकाऊ छायाचित्रकार आहे.. :) एसलआर घ्यायचा इरादा आहे.. कृपया चांगला कॅमेरा जाणकार लोकांनी सुचवणे..)
रेवती

फोटो आवडले. हे ठिकाण तुमच्या घरापासून जवळ असेल तर असेच फोटू बर्फ पडल्यावर (याच ठिकाणांचे) घेतले तर फरक लक्षात येईल. सहज गंमत म्हणून एक अ‍ॅक्टीव्हिटी.

मोहनराव

ही कल्पना आहे माझ्या डोक्यात!! धन्यवाद!!

पैसा

पहिल्यांदाच लिहिलय म्हणताय , पण सोबत टिप्पण्याही आवडल्या!

बहुगुणी

अप्रतिम फोटो आणि तितकीच सुंदर स्थळांची आणी वेळेची निवड. (लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटला नाही :-)) आणखी येऊ द्यात.

आत्मशून्य

.

मी-सौरभ

या मलिकेचा पुढचा भाग बघण्यास उत्सुक आहे...

पु.फो.शु.

शिल्पा ब

छान लिहिलंय आणि फोटोही मस्त आहेत. पण काय हो, ती सोडुन गेलेली बदकीणच कशावरुन?

शाहिर

मोहन रावांचे अनुभवाचे बोल असतील ते :)

यकु

पण काय हो, ती सोडुन गेलेली बदकीणच कशावरुन?

ढिश्कँव्व!!!!!! ==== >!!!!!!

बदक असावे (मान खाली, खांदे पडलेले). बहुतेक, भाजी आणायला निघाले असावे.

सुंदर फोटो. असे ठिकाण आपल्या घराच्या मागे आहे हे बघून आपला हेवा वाटला आणि आपण तेथे दररोज चालायला जात नाही हे वाचून वाईट वाटले.

किसन शिंदे

छान!! विशेषतः वरून ४था आणी तो एक राजहंस...हे दोन जास्त आवडले.

सुर्व्या आला तळपुन गेला.. मावळतीच्या खळगालीला...

ते खळगालीला नाहीये हो, मावळतीचा खळगा ल्याला... असं आहे.

दीप्स

पहिलाच प्रयत्न आहे म्हणताय पण छानच लिहिलेकी तुम्ही. फोटो पण छान आहेत आणि रेवती ताई बोलल्याना त्या प्रमाणे फोटो काढा मस्त आणि टाका पुन्हा या धाग्यावर. काय हो एक विचारू का ?? जाऊ द्या विचारते लगेच कारण तुमचे उत्तर यायला बराच अवकाश जाणार ना ?? तो पर्यंत खूप उशीर होईल हो म्हणून विचारते आहे - तुमच्या कॉलनीमागेच आहे ना हि सुंदर जागा मग जात का नाही तुम्ही जॉगिंगला?? अहो एवढे सुंदर, निसर्गरम्य ठिकाण असतांना तुमचे पाय घरात राहतात तरी कसे ??

मोहनराव

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

जयंत कुलकर्णी आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे मी जातो हो कधीकधी फिरायला.. माझे ते सर्वात आवडते ठिकाण आहे. पण कामाच्या रगाड्यातुन व कधीकधी आळसामुळे नाही जमत...
या जर्मन लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो..उन पाऊस थंडी काहीही असुदे रोज जॉगिंग करतात. तो जॉगिंग ट्रॅक साधारण १.५ किमीचा वर्तुळाकार पट्टा आहे. एक फेरी मी कशीबशी जॉगिंग करत पुरी करतो. हे लोक ४-४ फेर्‍या (न थांबता) आरामात मारतात. आणि आपण कसे जरा तब्येतीबद्दल जागरुक झालो की व्यायाम चालु करतो. पण इथे फिट लोकसुद्धा रोज व्यायाम करुन घाम गाळतात. ( पाश्चात्यांचे म्हणुन कौतुक करत नाही पण शिकण्यासारखे जरुर आहे..) मी नियमितपणे जाण्याचे प्रयत्न चालु ठेवलेत..

(अवांतर: आळसावरुन आठवले..माझा एक आळशी मित्र नेहमी म्हणायचा.. "आळस हा माणसाचा शत्रु आहे, म्हणुन मी त्याला मित्र बनवला आहे.. ;) )

वपाडाव

"आळस हा माणसाचा शत्रु आहे, म्हणुन मी त्याला मित्र बनवला आहे..

तसेच, गरज ही शोधाची जननी आहे अन आळस हा त्याचा बाप आहे हे वाक्य आम्ही म्हणायचो....

Nile

जर्मनीचे?

जर्मनीचे असूनही एकाही फोटोत तुमचे दर्शन नसल्याने फाऊल धरण्यात येत आहे. ;-)

मोहनराव

स्वताचे फोटु काय काढायचे हो.. ते तर नेहमी काढतोच की!!
आता त्या राजहंसासमोर आमचं ते ध्यान म्हणजे काय दिसणार? ;)

वपाडाव

प्रत्येक फटु डेस्कटॉपवर लावण्याजोगा आलाय.....
किसन म्हणतोय त्या प्रमाणे ४ था अन राजहंस यांचा ब्येष्ट.....
कौशल्य हे क्यामेरात नाही तर तर चित्र बंदिस्त करणाराच्या हाता-डोळ्यात असते......
एनिवेज....
कॅरी ऑन....

गणेशा

अप्रतिम फोटो आहेत सगळे ...
मस्त एकदम ...

जोडप्याचा अआणि त्यांच्या सायकल वरील मुलाचा फोटो अप्रतिम ....

तुमच्या घरा जवळ इतकी सुंदर जागा आहे याचा हेवा वाटला...

सर्वसाक्षी

निसर्ग चित्रण आवडले. काही चित्रांत सावल्यांचा वापर सुरेख केला आहे.

स्मिता.

मोहनराव, रम्य संध्याकाळीचे फोटो खूपच सुरेख आहेत. तुमच्या घराच्या मागेच एवढी सुंदर जागा आहे म्हणजे तुम्ही खरंच फार नशिबवान आहात!
रेवतीताईंनी दिलेली आयडिया मस्तच आहे.

गणपा

सगळेच फोटो सुरेख 'काढलेत'.
लिहायचा पहिलाच प्रयत्न असला तरी मिपावर मुरलेले वाचक दिसताय. :)

पुलेशु. :)

सचिन राव

अप्रतिम फोटो आहेत सगळे ...छान मस्त....................

५० फक्त

जबरदस्त फोटो काढलेत, कालच प्रभोच्या धाग्यातुन एक फोटो उचलला होता वॉलपेपरसाठि आता इथुन पण एक दोन उचलतो.

धन्यवाद.

सर्व छायाचित्रे मस्त आहेत.

छायाचित्र शास्त्रातील एक मुलभूत विधान वाचलं आहे की Nature never deceives. अर्थात, निसर्ग कधी फसवत नाही. त्या मुळे हे शास्त्र शिकताना निसर्गाची छायाचित्रे काढत सुरुवात केली की उत्साह वाढत जातो.

शुभेच्छा..!