Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिपावली विशेष !!!

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 10/19/2011 - 21:15  ·  विशेष
विशेष
नमस्कार मंडळी, बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता. दिवसभराच्या कामातून सवड काढून जेंव्हा या धाग्यावर याल तेंव्हा इथे नवीन मजेदार आठवण, आज कोणी काय केलं यासारख्या बातम्या नक्कीच मनोरंजन करतील आणि चेहर्‍यावर हसू आणतील. शुभ दिपावली!

प्रतिक्रिया द्या
22598 वाचन

💬 प्रतिसाद (65)
क
कुंदन Wed, 10/19/2011 - 21:39 नवीन
२५ रात्रीचे तिकिट आहे. नक्की तारखा सांगा राव कोणी तरी.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 10/19/2011 - 21:50 नवीन
आमच्या कडे दारू विकेंडला दोन्ही दिवस उडवणार आहोत, या बाटल्या घेऊन तुम्ही पण. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
न
नावातकायआहे गुरुवार, 10/20/2011 - 09:46 नवीन
दारु 'शोभेची' आणु का 'आवाजाची'?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रभो Wed, 10/19/2011 - 21:43 नवीन
नवीन विभागासाठी शुभेच्छा!!! मस्त मस्त अनुभव वाचायला मिळोत.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/19/2011 - 21:56 नवीन
मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा केलाय. करंजीचे सारणही आजच करून ठेवणार आहे.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 10/19/2011 - 21:58 नवीन
पा कृ द्या. विकांताला करुन ठेवीन म्हणजे ऐन वेळी धावपळ नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 10/19/2011 - 22:37 नवीन
तुम्हाला भाजके पोहे मिळालेत का? नाहीतर साध्या पोह्यांचा तळून किंवा पातळ पोह्यांचा केला तरी चालेल. धणे पावडर, जिरे पावडर, शेंगदाणे, भाजके डाळे, कढिपत्ता, खोबर्‍याचे काप, पिठीसाखर, मीठ, फोडणीचं सामान तयार आहे ना? पातळ पोह्यांचा चिवडा असेल तर थोडे तीळ असले तर बरे. कोणते पोहे आहेत ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
ग
गणपा Wed, 10/19/2011 - 22:58 नवीन
या विकांती बेसनाचे आणि खोबऱ्याचे लाडू करावे म्हणतो. लेकीला फार आवडतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/20/2011 - 06:36 नवीन
मस्त कल्पना, मस्त विभाग निर्मीती ! :) मला तर बॉ कडबोळी फार फार आवडतात... खायची इच्छा झाली आहे. ;) अनारसेही आवडतात... तेही चापायला मिळायला हवे अशी सुद्धा इच्छा झाली आहे... ;) (नानकटाई प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 10/20/2011 - 08:41 नवीन
कालच चकली झाली. आज शंकरपाळी करायच्या विचारात आहे.
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Fri, 10/21/2011 - 11:59 नवीन
बोलावण्याच्या विचारात असशीलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ग
गवि गुरुवार, 10/20/2011 - 08:46 नवीन
करंज्या बनता बनताच त्या पळवायच्या आणि मटकवायच्या अशी माझी पद्धत होती. काही वर्षांनी मला सर्व पदार्थ बनेपर्यंत फिरकू न देण्याचं धोरण निघालं. मग सर्व करंज्या झाल्यावर मी एक तोंडात टाकली. प्रत्येक चाव्यासोबत दात जबडा यात कचक कचक असे आवाज येऊ लागले. पुन्हापुन्हा वेगवेगळे नमुने घेऊन पाहिले तरी किचकिचाट चालूच. कान वाजायला लागले. मग मी कामधाम सोडून फोरेन्सिक तपासणी केली. आजीने चुकून (वयोमानानुसार दृष्टीवर परिणाम) करंज्यांच्या सारणात पिठीसाखरेऐवजी रांगोळी पूड घातली होती. सर्व फेकून द्यावे लागले. मला वेळीच खाऊ दिले असते तर??
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/20/2011 - 09:18 नवीन
हा हा हा. जबर्‍या किस्सा गवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सोत्रि Fri, 10/21/2011 - 06:02 नवीन
मस्त किस्सा! :)
मला वेळीच खाऊ दिले असते तर??
हे तर एकदम मस्त. - (करंजीप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/25/2011 - 15:33 नवीन
=)) लै भारी... माझ्या आजीने एकदा बेसनाच्या लाडवात पिठीसाखर म्हणून सोडा घातला होता. आणि काकाला, तो नको नको म्हणत असतानाही प्रेमाने आग्रहाने खायला घातला. पहिल्याच घासात तो आडवा झाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वपाडाव गुरुवार, 10/20/2011 - 09:14 नवीन
मला अनारसे खुप आवडतात अन तेही शुद्ध तुपातले.... थंड झालेल्या अनारशांना जर डालड्यात तळलेले असल्यास टाळुला चिकटण्याचा आण्भव आहे.... (टार्‍या तुझी आठौण येउ घातली आहे) आमच्या घरी पुरणाचा घाट असतो.... पाच दिस खंप्लिट पुरण एके पुरणच.... कुणी साध्या चपातीचे नावही काढायचे नाही.... आणी लक्ष्मीपुजनाच्या दिशी सकसक्काळी महावीर निर्वाण चढवुन मग सिताफळाच्या डालीवर ताव मारण्याचा प्रोग्राम असतो.... ही डाली २००-२५० सीताफळांची असते.... त्यानंतर वर्षभर काही सीताफळांकडॅ ढुंकुन पहायचे नाही..... माझी काकु अन आज्जी चकल्या एक नं बनौतात.... आई अन आत्या (वर रेवतीआज्जींनी सांगितलेला) पोह्याचा चिवडा खसखशीचे दाणे अन दाळ्वं टाकुन बनौतात.... एक वैदर्भीय प्रकार आहे गुण्या.... कुणाला माहिती आहे का? (कॉलिंग मी ॠचा ).... हा गुळाचा अन कणकीचा मिक्स बनतो....
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 10/20/2011 - 09:37 नवीन
चिरोटे हा सर्वोत्तम फराळप्रकारांपैकी एक आहे याविषयी बरेचजण एकमत होतील. सांगली मिरज मधल्या आपटे यांचे चिरोटे आत्तापर्यंत खाल्लेल्यांत सर्वात उत्कृष्ट आहेत. एक्सीड्स एस्क्पेक्टेशन टाईपचे. सर्वांना सांगली मिरजला जाणे शक्य नाही पण आपल्या आसपास कुठे मिळतात का पहा कारण हे सांगली मिरजेहून अन्यत्रही डिस्ट्रिब्यूट होतात. चांगले ब्रँडेड आहेत. सील्ड बॅग आणि वरुन बॉक्स अशा पॅकिंगमधे असल्याने खुसखुशीत आणि अखंड (चुरा न होता) राहतात. पुण्याकडून मुंबईकडे येतानाचा पहिला सोडून दुसरा फूडमॉल, जिथे दत्त स्नॅक्स म्हणून खाण्याची जागा आहे. त्याच दत्त स्नॅक्सच्या आत एक दुकान आहे तिथे हे वर उल्लेखलेले आपटे यांचे चिरोटे मिळतात. गुलाबी रंगाचे बॉक्स.. एकदम रेकमेंडेड. आमच्याकडे सर्वजण त्याचे अ‍ॅडिक्टच झालेत. बादवे .. दत्त स्नॅक्सचे सर्व पदार्थही झकास चविष्ट असतात...
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 10/21/2011 - 05:55 नवीन
अरेच्चा २५ वर्षे सांगलीत गेली. पण हे आपट्यांचे चिरोटे पहिल्यांदाच ऐकत आहे. नुकतेच चालू झले असावेत का? का पिकते तिथे खपत नाही ?? :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 10/23/2011 - 17:12 नवीन
हे पहा. आत्ताच आणले आहेत. मला घंटाळी रोड ठाणे इथल्या दुकानात मिळाले. ए १ असतात. ठाणे, पुणे, सांगली, मिरज आणि मुख्य शहरांत लोकांनी जरुर आणून खावेत. अमोल खाली आत्ता आणलेल्या बॉक्सचा ताजा फोटो आहे. बॉक्सवरचा निर्मात्याचा पत्ता बघः आपटे फूड्स विनायक बिल्डिंग शंकर तत्वज्ञान मंदिरामागे १ क्रमांक शालेजवळ, मिरज पिन ४१६४१० जिल्हा सांगली. फोन ०२३३ २२२२५२१ / २२२२२२१ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
र
रेवती Sun, 10/23/2011 - 19:22 नवीन
आता हे चिरोटे आम्हाला (कोल्हा असल्याने) आंबट वाटणार म्हणून एक दुरुस्ती आहे. शांकर तत्वज्ञान मंदीरामागे असे आहे. अनेकजण शंकर लिहितात तरी पत्ता सापडतो पण हे आपलं उगाच!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मिसळ Tue, 10/25/2011 - 18:37 नवीन
गवि, ठाण्यातल्या त्या दुकानाचा पत्ता देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 10/25/2011 - 18:53 नवीन
श्रद्धा सर्व्हिसेस. 2,Radha, Ghantali Mandir Road, Ghantali, Thane - 400602, Maharashtra , India फोन 25395351
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळ
प
पाषाणभेद गुरुवार, 10/20/2011 - 11:28 नवीन
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये फुलझाड (अनार किंवा कोठी) हा प्रकार असतो. एके दिवाळी आम्ही सारे भावडं गावी गेलो होतो. तेव्हा चुलत्यांनी फटाके आणले होते. त्यात फुलझाडाचा नविन प्रकार होता. नेहमीचे फुलझाड हे शंकूच्या आकाराचे असते. हे फुलझाड सिलींड्रिकल आकारात होते. त्यातच ते निमूळतेही होते. (बेस कमी होता.) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुलझाड संपत आले की त्याचा बार होवून तो अ‍ॅटमबॉम्बसारखा फुटत असे. तसेच नेहमीप्रमाणे वरील बाजूस वात नव्हती तर ती मधल्या भागात होती. व्हायचे काय की हि असली फुलझाडे संपायच्या वेळी त्यातील बिल्टइन फटाक्यामुळे कलंडत असे. पहिल्या दिवशी एखाद दोन लावल्यानंतर लगेचच तसे समजले. दुसर्‍या दिवशी मात्र पहिल्याच फुलझाडाने दगा दिला. फुटण्याच्या वेळी ते कलंडले व त्याचा बार व त्यातील जाळ शेजारच्या लहान मुलीच्या अंगावर आदळला. त्यातील आगीमुळे तिचा फ्रॉक जळू लागला. लगेचच आम्ही धावलो व ती आग विझवली. थोडे भाजले पण निभावले. आम्ही सरळ उरलेले असले फुलझाडे कचर्‍यात फेकून दिली. नंतर कानाला खडा लावला की आपले पारंपरिक फटाकेच आणायचे म्हणून. आगगाडीचे ही तसेच. दोरा तुटला की सरळ कुठेतरी घुसत असे. अग्निबाणाचे किस्से तर बर्‍याच जणांच्या बाबतीत घडतात. त्यामुळे लिहीत नाही. आम्ही अग्निबाण आणतच नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/20/2011 - 12:24 नवीन
लहानपणी फुलबाज्या,भुईचक्र्,पाउस्,लवंग्यांची माळ,साप /नाग (जे काय असेल ते) इं प्रकार त्यावर भर असायचा! जसा मोठा झालो तशी शिंग फुटली आणि चॉईस बदलला... ;) फक्त सुतळी बॉम्ब फोडायचा बाकी काय बी नाय ! पहाटे पहाटे एका हातातल्या पिशवीत बरेचसे सुतळी बॉम्ब घेउन दुसर्‍या हातात उदबत्ती धरुन लोकांना जागे करण्याचा माझ्या उद्योग चालु व्ह्यायचा ! ;) थोड्या थोड्या अंतराने सुतळी बॉम्ब ठेवायचे आणि एक एक करत पेटवत जायचे... गाढ झोपलेली लोक लयं वैतागायची च्यामारी...आणि माझ्या सारख्या अतरंगी कार्ट्याला याची लयं मज्जा वाटायची ! ;) इतर सुद्धा अनेक प्रकार मी सुतळी बॉम्ब ने केले ते इथे टंकत नाही... ;) पण गेली काही वर्षे मी फटाके अजीबात उडवत नाहीये... कारण ? शिंपल ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचा इचार ! इतर आकाशात धुर सोडुन मजा लुटत आहे... मी त्यात भर न घालण्याचे ठरवले ! फटाके वाजवायचे सोडले ते सोडलेच्.सध्या इतरांनी फटाके उडवताने ते टिपण्याचा प्रयत्न करतोय... मागच्या वर्षी एक असाच प्रयोग केला होता. पण या वर्षी फटाके उडवावेच लागणार ! ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/20/2011 - 14:49 नवीन
फोटू देण्यासाठी वेगळा धागा सुरु केलाय रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 10/22/2011 - 11:05 नवीन
ओक्के...आज्जी बाई ;) काय गं आज्जे यंदा तुझा इस्पेश्यल पदार्थ काय हाय बरं ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sat, 10/22/2011 - 18:07 नवीन
आमच्याकडे नेहमिचेच पदार्थ आहेत. पण तुला कश्याला पडलिये आमचे काळजी? तुमचा दिवाळसण आणि कौतुक यातच रमलायस ते दिसतय की!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गणपा गुरुवार, 10/20/2011 - 12:46 नवीन
सुतळी बाँबची वात काढुन त्यात उदबत्ती पेटवून त्याचा टाईम बाँब बनवणे. सुतळी बाँब अंगणातल्या एखाद्या रिकाम्या (लोखंडी) पिंपात टाकणे. पींप मिळाल नाही तर पत्र्याचा चौकोनी डबा अगदी तोही नाही तर गेला बाजार डालड्याचा डबा असायचाच. पेटुन गेलेल्या किंवा फुसक्या निघालेल्या सगळ्या फटाक्यांतली दारु एखाद्या कागदावर गोळाकरुन मग अनेकांचे डोळे 'दिपवणे'. केपा/टिकल्या फोडायला दंबुक किंवा रॉकेट मिळायच अस नाही त्यामुळे हातोडी, तिही नसेल तर सरळ दगड घेउन केपा/टिकल्या फोडता फोडता फरश्यासुद्धा फोडणे. (नंतर चामडी लोळत असे ते वेगळ.) नागाच्या/सापाच्या गोळ्यांनी अंगणातल्या फरशीवर 'नक्षी' उमटवुन आई बहीणीला रांगोळीत मदत करणे. असे नानाविध उपद्व्याप करुनच लहानपणी आमची दिवाळी साजरी होत असे. हे सगळ करत असताना काही गमती जमती, करामती पण केल्यात त्यापण नंतर येतीलच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/20/2011 - 13:15 नवीन
सुतळी बाँबची वात काढुन त्यात उदबत्ती पेटवून त्याचा टाईम बाँब बनवणे. सुतळी बाँब अंगणातल्या एखाद्या रिकाम्या (लोखंडी) पिंपात टाकणे. वरच्या प्रतिसाद जे टंकले नव्हते ते गणपासेठच्या या प्रतिसाद वाचल्याने बाहेर येत आहे... कॄपया सांभाळुन घेणे ! ;) तर... १)सुतळी बाँम्ब घ्यावा,त्याच्यावर वाण्याकडुन / घरातुन आणलेले पीठ टाकावे,वात पेटवली की मस्त आगीचा लोळ दिसतो. २)प्लास्टीकचा,पत्र्याचा आयटम गणपासेठ ने सांगितला आहेच ! ३)हल्ली नविन इमारतीचे डक्ट बंद असतात,म्हणजे आतल्या बाजुला असतात ! चौकोनी किंवा तत्सम आकाराचा डक्ट (टॉलेट्/बाथरुमची बाहेरची जागा) असतो...भरपुर जागाही असते... मग माझ्यातली अचाट कल्पना शक्ती ने नविन उद्योग केला ! ;) डक्ट मधे आवाज झाल्यास घुमतो... गच्चीवरुन तो डक्ट पाहता येतो. मग काय गच्चीत जाउन सुतळी बॉब्म डक्टच्या कट्यावर पेटवुन ठेवायचा आणि कलटी मारायची (किंवा तिथेच राहुन गंमत ऐकायची) ! जितके लोक टमरेल घेउन गहन अश्या चिंतनात बसलेले असायचे त्यांच्या चिंतन साधनेत मी सुतळी बाँम्बच्या आवाजाने विघ्न आणायचो ! ए कोन है बे? साला इधर भी शांतीसे बैठने नय देगा क्या ?... तेरी तो ! असा आवाज कुठल्याश्या खिडकीतुन आला की लगेच माझी जिन्यावरुन खाली कलटी !!! ;) (सु त ळी बॉ म्ब प्रे मी. . .) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
व
वपाडाव गुरुवार, 10/20/2011 - 13:22 नवीन
गणपा अन मदनबाणाच्या प्रतिसादाने हुरळुन झाल्या गेले आहे.... लै चिक्कार आठौणी ताज्या झाल्या आहेत..... धन्यवाद संमं.... असा धागा काढल्याबद्दल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सोत्रि Fri, 10/21/2011 - 06:30 नवीन
चिक्कार आणी बेक्कार सहमत ! - (सुतळ'बॉम्ब'प्रेमी ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
म
मराठे गुरुवार, 10/20/2011 - 15:22 नवीन
बाण हे माझं दिवाळीतलं अत्यंत आवडतं आयुध होतं/आहे. मग एकाच वेळी दोन तीन बाण सोडणे, बाणाखाली इतर आवाजाचे फटाके लाउन टू-इन-वन फटाका बनवणे इ. चिक्कार उद्योग आमची गल्लीतली गँग करायची. कालांतराने आजूबाजूला उंच इमारती उभ्या राहिल्या आणि आमच्या आनंदाला मुकावं लागलं. काही महिन्यांनी मग त्या इमारतींमधे राहणारी नविन मुलं आमच्या ग्यांगमधे सामिल झाली. त्यांच्या गच्चीवरून बाण उडवायला परवानगी मिळाली. फटाके उडवून झाल्यानंतर मग कोणाच्यातरी गच्चीवर सगळी जणं भेंड्या किंवा डम्ब-शराड्स सारखे खेळ खेळायचे.... सगळं सगळं आठवलं... नोकरी लागल्यापासून हळू हळू सगळे मित्र दूर गेले.. गेल्या दहा बारा वर्षांमधे मी दिवाळी साजरी केलीच नाही..:( मात्र गेल्या वर्षी (आणि ह्या वर्षी सुद्धा) पोराला घेऊन मस्त फटाके उडवण्याचा आनंद घेतला.. पण इथे परक्या देशात 'ती' मजा नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/20/2011 - 16:10 नवीन
>>>>>पेटुन गेलेल्या किंवा फुसक्या निघालेल्या सगळ्या फटाक्यांतली दारु एखाद्या कागदावर गोळाकरुन मग अनेकांचे डोळे 'दिपवणे' गंपा काय आठवण काढली राव. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळीच लोकांच्या दारासमोर फुसके फटाके आम्ही शोधायचो. आम्ही दोघा तिघांनी एका दिवाळीला असेच फुसके फटाके जमा केले. संध्याकाळचा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे मोठ्यांच्या नजरा चुकवून कागदावर फटाक्यातील दारु ओतली. मी आणि माझा मित्र अजूनही फूसके फटाक्यातील दारु ओतत होतो तेव्हाच एकाने लावली ना भो काडी. असा मोठा जाळ झाला. आमचे दोघांचे डोळे दिपलेच. डोळ्यासमोरचा अंधार संपून थोडे थोडे दिसायला लागल्यावर पाहतो तर एकही जाग्यावर नाही सर्व पसार. मी आणि माझ्या मित्रानं हाताचे अंगठे भाजून घेतले. तात्पूर्ता उपाय म्हणून मीठपाणी एकत्र करुन लावल्याचे आठवते. च्यायला, काय काय प्रताप करुन ठेवल्याचे आठवले. धन्स रे गणपा. माझे वडीलही फटाके वाजवायचे शौकीन. अनार हातात धरुन उडवायच्या नादात एक अनार त्यांच्या हातातच फूटला होता. किरकोळ जखम झाली होती. मात्र धसका कायम आहे. आता फटाके फोडायला लागल्यावर. दूर व्हा. वात शिलून घ्या. मोठ्या आवाजाचे फटाके आणू नका. अशा सुचना दर दिवाळीला असतात. अर्थात सुचना चांगल्याच असतात यात काही वाद नाही. आता फॅन्सी फटाके उडवत असलो तरी वडील मला हळू आवाजात आजही तीच सुचना देतात आणि आता तीच सुचना मी माझ्या लेकरांना देतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मोहनराव गुरुवार, 10/20/2011 - 16:47 नवीन
आम्ही पण हे सगळे उद्योग करत असु. माझ्या दादाचा हातखंडा मोठा असायचा यामधे. पण एकदा काय झाले आम्ही सगळे टीव्हीवर दिवाळीचे कार्यक्रम बघत बसलो होतो आणी दादा गॅलरीमध्ये जमवलेल्या फटाकाच्या दारुचा उद्योग करत बसला होता.. दारुच्या ढिगाला त्याने वात लावली आणि पेटवले पण ते काही पेटत नव्हते..मग तो तोंड जवळ नेत बघु लागला..तोपर्यंत दारुने एकदम पेट घेतला.. आणि तो पळत हॉलमधे आला तेव्हा त्याचा चेहरा पुर्ण दारुने चमकत होता. पुर्ण निग्रो दिसु लागला होता..त्याला भाजले नव्हते पण श्वास घेता येत नव्हता...त्या ध्यानामधे तो जोरात ओरडु लागला.. ते पाहुन आम्हाला हसावे कि रडावे तेच कळत नव्हते..पण डॉक्टरकडे नेल्यावर जरा बरे वाटु लागले त्याला.. वडिलांचा मार बसला तो वेगळाच!! त्यानंतर तसले उद्योग बंद करुन टाकले.. शाळेतपण दिवाळीच्या सुट्टीनंतर कोणाचा हात कोणाचा पाय भाजलेली पोरं दरवर्षी दिसायचीच!! दिवाळी साजरी करा पण जरा जपुन.. दिपावलीच्या सर्वांना शुभेछ्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वपाडाव Fri, 10/21/2011 - 07:02 नवीन
अशाच एका प्रक्रियेत एकदा आम्ही काही जणांनी दारु गोळा करुन आणली.... आणी शांततेत तिला जाळ लावला... तेवढ्यात एका कार्यकर्त्याच्या पायाला मुंगळा चावला त्याने मान खाली वाकवली.... अन त्याचे केस तांबुस-तपकिरी-सोनेरी अन काय काय नि काय काय.... अन तो केस जळाल्याचा वास येउन बाकीचे आम्ही बेशुद्ध.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/20/2011 - 13:00 नवीन
वा! हा प्रतिसाद शंकरपाळे खात खात देत आहे! :)
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/20/2011 - 15:06 नवीन
मला शिल्लक ठेव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती गुरुवार, 10/20/2011 - 14:47 नवीन
बापरे! मी फुलबाज्या किंवा भूईनळे यांच्याशिवाय काही दारूकाम करत नसे.;) एकदा काका काकूकडे दिवाळीत जायचे ठरले होते. त्यांच्याकडे नवीन कुत्रा पाळला होता. आम्ही पहाटे पोहोचल्या पोहोचल्या काकूनं मोठ्यासाठी चहा तर मुलांसाठी दूध दिले. बशीत ओतून पिताना बाहेर फटाका वाजला की श्वानमहाराज भूंकत असत आणि दचकून थोडं थोडं दूध बशीतून सांडत असे. आणि हे सगळं तालासुरात चाललं होतं. ते पाहून सगळेजण हसायला लागले होते. याशिवाय काही गंमत नाही बुवा आठवत.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 10/20/2011 - 15:00 नवीन
दिवाळीशी निगडीत लहानपणाच्या बर्‍याचश्या आठवणी आहेत. :) दिवाळी सुरू होण्याच्या आसपास मला आणी मोठ्या भावाला टिकल्या वाजवण्यासाठी एक एक बंदुक मिळत असे, त्या घेऊन मित्रमंडळीसोबत दुपारच्या वेळी आमचा चोर-पोलीसाचा खेळ जोरात रंगायचा. ट्रक किंवा तसल्याच मोठ्या वाहनासाठी लागणारे मोठे मोठे नट बोल्ट आम्ही गोळा करायचो आणी या नटामध्ये दोन बोल्टच्या मध्ये टिकली ठेऊन त्याचा उपयोग ग्रेनेड बाँम्ब म्हणून करत असू. दाताने क्लिप काढायची अ‍ॅक्शन करत तो ग्रेनेड चोरावर फेकायचा कि लागलीच ते दोन नट एकमेकांवर आपटून ती टिकली फुटत असे आणी आम्हालाही बाँम्ब फोडल्याचा आंनद मिळत असे. :) अशाच एका दिवाळीला केलेला उद्योग चांगलाच अंगाशी आला. मित्र मिळून एकत्रितपणे सुतळी बॉंम्ब फोडायचा कार्यक्रम सुरू होता. तिथे न फुटलेला सुतळी बाँम्ब मित्राला "ऐ ऐ ऐ उल्हासनगरचा माल, उल्हासनगरचा माल" ;) असे चिडवत तिथुन उचलून सरळ घरी आणला आणी दाराजवळ असलेल्या दिव्यावर त्याला उपडा करून डोळे दिपवण्याचं काम चालु केलं त्याच वेळेला त्या अचानक झालेल्या जाळाने हातात धरलेला सुतळी बॉम्ब मोठ्याने ठोssss!! करून हातातच फुटला आणी जे काय हाताची आग व्हायला लागली कि ज्याचं नाव तेच..! डोळ्यातुन घळाघळा अश्रु वाहू लागलेले!! मग तसाच भाजलेला हात घेऊन घरात शिरल्यावर आईबरोबर बहिणीचाही जोरदार ओरडा मिळाला. या आमच्या गेल्या दिवाळीच्या काही आठवणी... Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 10/20/2011 - 15:14 नवीन
दमदार प्रतिसाद रे किसना.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/20/2011 - 16:17 नवीन
मस्त रे किसना. चला मिपावर दमदार दिवाळी सुरु झाली. मस्त किस्से. अवांतर : सहजराव, दिवाळीचे किस्से सांगा बरं काही तरी !!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
पैसा गुरुवार, 10/20/2011 - 19:54 नवीन
गेल्या वर्षी फराळाचे बाकीचे पदार्थ करून झाल्यावर मी सगळ्यात शेवट बेसन लाडू करूया म्हणून बेसन भाजायला ठेवलं. एकीकडे मिसळपाववर काहीतरी टैमपास करत होते बहुतेक, कारण बेसन भाजल्याचा वास आला म्हणून घाईघाईने गॅस बंद केला आणि ते थंड होताहोता पिठीसाखर घातली, एक लाडू वळताना लक्षात आलं, हरे राम बेसन कच्चं राहिलं होतं. मग मी आणखी एक गोंधळ केला, मिश्रण परत गॅसवर ठेवलं. बर्‍यापैकी भाजलं, पण आता त्यातल्या पिठीसाखरेने सूड घ्यायचा ठरवला. साखरेचा बहुधा पक्का पाक झाला. पुढे काय झालं ते कोणाला सांगायला नकोच. कसेतरी २/४ लाडू केले. ते खटखट्या लाडूंपेक्षा घट्ट्मुट्ट तब्ब्येतीचे झाले. उरलेलं रासायनिक मिश्रण कढईसकट फ्रीजमधे ठेवून दिलं, आणि नवर्‍याला यातलं काही न सांगता बाजारात जाऊन पुरोहितकडचे लाडू आणले. बेसनलाडूंबद्दल खरं तर असं म्हणतात की "ज्याला दात कमी त्याला बेसन लाडू नामी." पण दिवाळीच्या दिवशी मी केलेले लाडू खाताना दात गळून पडतात की काय असं वाटायला लागलं. शेवटच्या अध्यायात कढईला चिकटलेलं रसायन निघायचं नाव काढीना. आमची मोलकरीण ८ दिवस त्या कढईकडे काणाडोळा करत होती. आता कढईचा बळी जातो की काय अशी परिस्थिती उद्भवली. पण चिकाटीने रोज थोडी थोडी घासून ती कढई मी कशीबशी रिकव्हर केली. यंदा पक्क्या पाकाचे लाडू करणार आहे, येताय ना सगळे?
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/20/2011 - 20:33 नवीन
दिवाळीचा नाही पण लाडवांशी संबंधीत आहे म्हणुन हा एक किस्सा. लहान पणी गोरेगावच्या चाळवजा ईमारतीत रहात होतो. संक्रांतीचे दिवस होते. आमच्या समोरच्या कुळकर्णी काकुंनी तीळाचे लाडू केले होते. त्यांनी कुठेली शिक्रेट रेशीपी वापरली माहित नाही. रीती-भाती नुसार सगळ्यांच्या घरचे लाडू जमा झाले होते. एके संध्याकळी कुळकर्णी काकांच्या घरातुन ठोका ठोकीचे आवाज येत होते. चाळच ती अडीनडीला लोकं तेव्हा धावुन जायची. कसल काम काढल म्हणुन सहज काकांच्या घरात डोकावुन पाहिलं. काका हातात हातोडी घेउन काकूंनी केलेल्या लाडवावर नेम धरत होते. तो लाडू पण कसला बिलंदर हातोडी पडली की निसटुन समोरच्या भिंतीवर आपटुन परत काकांकडे रीबाउंड व्हायचा. =)) आमच गुडलक बलवत्तर होत बहुतेक की त्या प्रसंगा पुर्वी त्यांनी दिलेले लाडू आमच्या घरात कुणीच तोंडी लावले नव्हते. 'सबसे तेज' वाहिनी सारख धावत जाऊन घरी झाल्या प्रसंगाच घरी रिपोर्टींग दिल. आणि बाबांचा दंतवैद्याचा खर्च वाचवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वपाडाव Fri, 10/21/2011 - 07:16 नवीन
म्हणुन सहज काकांच्या घरात डोकावुन पाहिलं.
कळालं का बिरुटे सहेब 'सहज'काका दिवाळीचे किस्से का नाही सांगत आहेत ते???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ज
जाई. Fri, 10/21/2011 - 06:02 नवीन
त्या लाडवात कँलरीच प्रमाण किती असेल पैसातै ;) शंकरपाळ्या करंज्या हे माझे फेवरीट पदार्थ आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चित्रा गुरुवार, 10/20/2011 - 21:20 नवीन
आठवणी आवडत आहेत. दिवाळीची तयारी उद्या ऑफिशियली सुरु करेन असे म्हणते आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/20/2011 - 21:37 नवीन
वर पैसाताईनी आठवण सांगितली आहेत त्याच्याशी जुळणारी आठवण म्हणजे, माझ्या जाऊबाईंनी एका दिवाळीला नवीन नॉनस्टीक कढई हौसेनं विकत आणली (त्यावेळी बाजारात तो नवीन प्रकार आला होता). त्यावेळप्रमाणे ३०० रूपये म्हणजे जास्त किमतीला आणली होती. कामाच्या बाईनं काम संपल्यावर वहिनींना सांगितलं की आज दिवाळीची लई भांडी होती. ती कढई तर लई कळकट झाल्याली, आज थोडी निघालिये, उद्या बाकीची स्वच्छ करते. गडबडीनं जाऊन बघितलं तर बाईनं ती जळकट समजून जोरजोरात घासलेली आणि एका बाजूनं नॉनस्टीक थर निघालेला. तसंच एका मैत्रिणीनं बरेच वर्षापूर्वी दिवाळीला वॉशिंग मशीन घ्यायचं ठरवलं तर तिच्या कामाच्या बाईनं अट सांगितली की अमूक एका कंपनीचं घ्या, नाहीतर कामाला येणार नाही.;)
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 10/20/2011 - 22:31 नवीन
दिवाळी म्हटले की की आठवते .दिवाळी पहाट. नरकचतुर्दशीला पहाटे डोंबिवली मधील फडके रोड वर जत्रा भरली असते. माझी दिवाळीची आठवण इथलीच आहे. ग्रामदेवतेच्या भव्य मंदिरातून देवांचे दर्शन घेऊन रस्त्यावर घोळका करून हिंडणे हा आवडता उद्योग. दहावी नंतर मुंबईत आलो . आणी डोंबिवालीशी संपर्क साफ सुटला. आणी ३ वर्षात मुंबईने मला पार बदलुने टाकले. मराठी भाषा आणी संस्कृती माझ्याभोवती दुर्मिळ झाली होती. मग चौथ्या वर्षी मनाचा हिय्या करून डोंबिवलीत गेलो. गेल्या ३ वषात गर्दी वाढली होती .माझ्यासाठी अनेक अनोळखी चेहरे होते. मी माझ्यात जन्म भूमीत परक्या सारखा फिरत होतो. (मनात शान चे तनहा दिल ,तनहा सफर गाण्याच्या ओळी रुंजी घालायला लागल्या होत्या.) अचानक गर्दीतून खांद्यावर हात पडला. शाळेतील मित्र अवचित भेटल्याने अवर्णनीय आनंद झाला.त्याने मला गर्दीतून वाट काढत एका घोळक्यात नेले .आणी माझ्या वर्गातील आमचा कंपू पाहून मला जो आनंद झाला .......... मग थोडक्यात कोण काय करतो ह्याची उकल झाली आणी मग ''अरे ती ...... वर्गातील ,साडीत काय .... कुठे आहे ? अरे देवळात शिरतांना पहिले. मग वर्ग मैत्रिणींना भेटण्याचा सोहळा पार पडला. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या वर्गातील ३२ व आमच्या इतर वर्गातील किमान २० जण आम्ही संपर्कात आहोत. ओर्कुट वर आमच्या वर्गाची कम्युनिटी आहे .( आता सगळे चेपुवर आले आहेत आणी जवळ जवळ सर्व वर्ग चेपुवर आहे.) ज्याला जमते तो फडके रोड वर दिवाळी ला नक्की जातो ( मग इतरांजी जळवतो) आता गुगल + वर आमच्या( १० अ १९९६ ) च्या वर्गाचे इ - स्नेह संमेलन ह्याच दिवशी करण्याचा घाट घालत आहोत.( ह्या आधी सुद्धा शाळेत त्याच वर्षी आम्ही संपूर्ण वर्गाचे संमेलन केले होते.) दिवाळीचा तो दिवस आणी ती दिवाळी माझ्यासाठी अस्मरणीय होती.
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Tue, 11/05/2013 - 16:52 नवीन
अगदी असंच फीलिंग असतं आजकाल कुरणेश्वराच्या मंदिरात गेलं की.. कॉलेजात असताना जेव्हा पहिली आंघोळ झाली की जायचो तेव्हा बोगद्यापासूनच मित्र भेटायला लागायचे.. आताशा फक्त रस्ता अन देव ओळखीचा राहिला आहे.. आता नजर ओळखीचे चेहेरे शोधत असते..त्यातपण आमच्या सारखे भुलेबिसरे दिसतातच दिसतात.. ओळखी पटतात.. एक खूप जुना मित्र भेटल्याचं समाधान चेहर्‍यावरून ओसंडत असतं.. यंदातर जाताही नाही आलं.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
शाहिर Fri, 10/21/2011 - 06:10 नवीन
आमचा छोटे शहर असल्याने दगड - माती भरपूर असते... त्यामुळे छान छान किल्ले तयार करायचो ..त्यावर हळीव, मेथि, धने पेरून जंगल बनवायचो.. आमच्या शाळेने किल्ले बनवा स्पर्धा ठेवली .. वेगळे कहीतरी करयचे म्हणुन आम्ही "बुरूज आणि तट्बंदी " करायची ठरवली.. त्या साठी अर्धवर्तुळाकार कौले हवी होती... शोधता शोधता ती शाळेवरच मिळाली... मग मी आणली... मी आणली म्हणून पक्याने ..संत्याने ...अशी आमची शाळा भुंडी झाली.. सुट्टीमधे शाळेची कौले चोरीला गेली असा बोभाटा झाला.. पण बच्चे कंपनीला याचा पत्ताच नव्हता... मुख्याध्यापक आणि एक गुरुजी जेव्हा परीक्षणासाठी घरी आले तेव्हा त्यांना कौलांचा पत्ता लागला.. पुढे काय ...नुसते बार् !!!!!! फोटो : आंतर जाला वरून साभार Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा