दिपावली विशेष !!!
नमस्कार मंडळी,
बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता. दिवसभराच्या कामातून सवड काढून जेंव्हा या धाग्यावर याल तेंव्हा इथे नवीन मजेदार आठवण, आज कोणी काय केलं यासारख्या बातम्या नक्कीच मनोरंजन करतील आणि चेहर्यावर हसू आणतील.
शुभ दिपावली!
💬 प्रतिसाद
(65)
क
किसन शिंदे
Fri, 10/21/2011 - 06:43
नवीन
दिवाळी म्हटलं कि नविन कपडे, फटाके, दिव्यांची आरास, रांगोळ्या, गोड फराळ या सर्वांसोबत आणखी एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे मातीचा किल्ला!! लहानपणापासून दिवाळीच्या दरम्यान आजुबाजूला बरेच मातीचे किल्ले मावळे न वापरता लष्करातील सोल्जरच्या सहाय्याने सजवलेले पाहिलेत. पण तेव्हापासून ते आजतागयत मला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे दिवाळीला मातीचे किल्ले बनवण्याची प्रथा केव्हापासून आणी कशी सुरू झाली असावी??
मिपावरील जुनी-जाणती मंडळी यावर अधिक प्रकाश टाकतील काय??
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 10/21/2011 - 13:16
नवीन
फार पुरातन काळातली गोष्ट आहे. दिवाळीचे दिवस होते. यशोदामाता दिवाळसणाचे पदार्थ बनवत होती. किसनदेवांनी तेव्हा एके दिवशी लोणी चोरले. यशोदेने त्याला एका खोलीत कोंडले व त्या खोलीला कुलूप लावले व ती कामाला गेली.
नंतर किसनदेवाने खिडकीतून चोरून पेंद्या वैगेरेंना आवाज दिला व ओरडले की, 'अरे ए पेंद्या अरे कि ला' , 'अरे ए पेंद्या अरे कि ला', 'अरे ए पेंद्या अरे कि ला', 'अरे भाग, कि ला'. पण बाकीची पोरे त्या आरोळीने हरकली. आधीच दिवाळीच्या सुट्या अन त्यात किसनदेव कि ला कि ला ओरडतो. झाले. सगळी पोरे एकत्र आली व त्यांनी किसनाच्या घराच्या अंगणात एक किल्ला बनविला. तिकडे किसनदेवाने डोक्याला हात लावला. नंतर बाहेर आल्यानंतर त्याने त्या किल्याचे उद्घाटन यथोचित केले. पण तेव्हापासून दिवाळीच्या सुट्यांत किल्ला बनवणे जे चालू झाले ते आजतागायत.
चला आता झोपायची तयारी करा बरं मुलांनो.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Fri, 10/21/2011 - 06:41
नवीन
प्र.का.टा.आ
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Fri, 10/21/2011 - 14:23
नवीन
लहानपणी गावाकडे असताना आमच्या गल्लीत आम्ही एकत्र मोठा किल्ला करायचो. सगळे मिळुन सैन्य आणी बाकी लागणारा माल विकत आणायचो. एका वर्षी आम्ही एक मस्त देखणी शिवाजी महाराजांची मुर्ती आणली होती. लगतच्या गल्लीच्या पोरांची नजर पडली त्यावर!! आणी एका दुपारी त्यांनी तो पळवला!! नंतर आम्हाला कळाल्यावर शेजारच्या गल्लीच्या पोरांवर आपसुकच डाउट घेतला गेला. हे आमच्या घरच्यांना कळाल्यावर सगळे आमच्यावरच ओरडु लागले. बस्स मग मावळे खवळुन शेजारच्या गल्लीच्या पोरांवर हल्ला पुकारला व शिवाजी महाराजांना परत किल्यावर स्थानापन्न केले. त्यानंतर मातीच्या मावळांबरोबर आमचे काही मावळे पहारा द्यायला असायचे. ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/21/2011 - 13:36
नवीन
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी किल्ल्यातील भुयारात लावण्यासाठी म्हणून सुतळी अॅटमबाँब शिल्लक ठेवायचो.
गल्लीतील सर्व मुले एकत्र येवून प्रत्येकाकडे किल्ल्याचे पाडकाम उत्साहाने करायचो
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 10/21/2011 - 14:51
नवीन
पूर्वीच्याकाळी पितळ्याची बॉलपेन्स मिळायची तीचा वापर बंदूकीची नळी व सायकलच्या चेनची एक कडी, व स्प्रिंग याचा वापर त्याच्या खटक्यासाठीकरून (मूलांची) छर्यांची गावठी बंदूक तयार करायचो (आजही करता येते). फटाक्यांतील दारू नळीत अत्यंत ठासून भरायची त्यावरती छर्रा ठासायचा... आणी बास खटका सोढला भ्ट्ट असा अवाज करून सूसाट वेगाने छर्रा ४-६ फूटावरील लक्षाच्या आरपार व्हायचा आणी बंदूक चटका बसेल इतकावेळ गरम रहायची. पून्हा ३-४ मिनटे नवीन गोळी भरायला व शिकार हूडकायला... वरती आपणच जखमी केलेल्या चिमणीला पून्हा दया दाखवून पाणी पाजायचे.... व भूतदयेचा आव आणायचा.. शौर्य शौर्य म्हणतात ते हेच समजायचो... मलाच लांब पल्याची बंदूक तयार करता यायची म्हणून फार भाव मारायचो, स्वतःला न्यूटन समजायचो.... सगळाच गाढवपणा....
बाकी किल्ला तोडणे वगैरे मज्या असायची. लाल मातीच्या मोठ्या व खर्याखूर्या पैलवान लोकांत वात पेटवलेला लक्ष्मी बॉम्ब हाताच्या मूठीत दाबून धरून त्यातच फोडायची जी मस्ती चालायची ती फार कूतूहूल व विस्मयचकीत नजरेने बघत रहायचो.... व हे कधीतरी मलाही जमेल अशी अशा वाटत रहायची... गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 10/21/2011 - 15:44
नवीन
आम्ही केलेला किल्ला तोडताना त्याच्या आत सापाने कात टाकलेली दिसली. त्यादिवसापासून मी किल्ला करणे बंद केले. तसेही मला काही जमायचे नाही. उगीच मोहरी नाहीतर अळीव पेरत बसायचे.
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Fri, 10/21/2011 - 15:45
नवीन
सगळ्यांची दिवाळीची तयारी आणि गमतीदार किस्से वाचून छान वाटत आहे.
मीसुद्धा आजाच सगळा किराणा करून आणलाय आणि या विकांतात फराळ बनवणार आहे. प्रिया ब यांनी दिलेला आकाशकंदिलही बनवायला घेतलाय.
दिवाळीचे वेध लागल्यापासून माझ्या मनात हुरहूर चालू आहे. पहिल्यांदाच परदेशात, घरच्यांपासून दूर दिवाळी करणार आहे. त्यामुळे रोजच दिवाळीच्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत.
दिवाळीची खरेदी म्हणजे बारिकसारीक पण भरपूर गोष्टी. नवीन कपडे, फटाके, पणत्या, रांगोळीचे वेगवेगळे रंग, मेंदी अश्या कितीतरी गोष्टींची तयारी व्हायची. मी लहान होते तेव्हा आई, आजी फराळ बनवत असताना आणि आई रांगोळी काढत असताना तिच्या हाताखाली लुडबूड करायचे. नंतर मी जरा मोठी झाल्यावर रांगोळीचं खातं माझ्याकडे आलं. दिवाळीच्या दिवसात रोज कोणती रांगोळी काढायची हे ठरवणं, त्यातली रंगसंगती ठरवणं आणि भावाला माझ्या रांगोळीजवळ फिरकू न देणं, हे करता करताच संध्याकाळ व्हायची. मग घाईघाईत आवरून देवासमोर दिवा आणि अंगणात पणत्या लावायच्या.
रात्री पुजा झाली की माझ्या आणि भावाच्या फटाक्यांची वाटणी व्हायची. मग त्या दिवसाचा वाटा संपेपर्यंत आम्ही धूम फटाके फोडायचो. तेव्हाचे फटाके म्हणजे अनार, चक्र, फुलबाज्या, टॉर्च, अग्निबाण, सुटे लवंगी फटाके, त्यांच्या लळी आणि सुतळी बॉम्ब.
एकदा मी एका खोक्यात काही सुटे लवंगी फटाके घेवून अगरबत्तीवर पेटवून घराच्या दारासमोर फेकून फोडत होते. एक फटाका फेकायच्या आधीच हातात फुटला आणि तो माझ्या हातातून खाली खोक्यात पडला. त्याने खोक्यातले बरेच फटाके पेटले आणि ते दारासमोरच असल्याने बरेच घरात उडून गेले. घरात सगळ्या फटाक्यांची एक टोपली होती. पण त्यातले सगळे फटाके खोक्यांमध्ये असल्याने घरात आतिष्बाजी व्हायची राहिली.
माझा लहान भाऊ ३ वर्षांचा असताना आमच्या नकळत दोन्ही हातात १-१ सुतळी बॉम्ब घेवून समोरच्या काकांच्या अंगणातल्या पणतीवर पेटवत होता. तेव्हा नशीब की त्या काकांचं वेळेवर लक्ष गेलं आणि त्यांनी त्याच्याकडून ते बॉम्ब काढून घेतलेत.
आठवणी तर भरपूर आहेत. आणखी आठवतील तशी भर घालत जाईन.
- Log in or register to post comments
व
विवेक वि
Sat, 10/22/2011 - 09:42
नवीन
नवीन विभागासाठी शुभेच्छा!!!
मस्त मस्त अनुभव वाचायला मिळोत.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 10/23/2011 - 16:20
नवीन
ऐन दिवाळीच्या तोंडावर कामवाल्या म्याडम कालपासून गायब झाल्या आहेत. :( बहुतेक दिवाळी करूनच येणार. त्यामुळे मी अजून काहीच केलं नाही. उद्या परवा हापिसला दांडी मारून काही फराळाचं करायला जमतय का पहाते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 10/26/2011 - 02:29
नवीन
काय गं, आली का बाई?
उद्यापर्यंत आली नाही म्हणजे आता दिवाळी झाल्यावरच!
आणि फराळाचं आण विकत, एकटी किती करणार?
तसेही लाडू तुम्हाला पुरोहितचे आवडतात ना?;)
तुझी कढईही घाबरून थरथर कापतिये.;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/26/2011 - 03:29
नवीन
आली आली!! यावेळेला मी बेसनाचे लाडू यशस्वीरीत्या केलेत, सोबत शंकरपाळे. बाकी विकतचं आणण्यापेक्षा गोव्याच्या पद्धतीचं, म्हणजे पोह्यांचे २/३ प्रकार करणार आता, अंबाड्याचं सासव (रायतं एक प्रकारचं). बस. मुख्य खाणारा मेंबर माझा मुलगा काश्मिरला गेलाय, आणि आम्हीही थोड्या वेळाने सांगलीला जायला निघतोय, त्यामुळे एवढंच!
सर्वाना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Tue, 10/25/2011 - 13:56
नवीन
आमच्या प्रतिक्रिया अजुन दोन दिवसांनी.. नरकासुर दहन आणी पोहे खाउन झाल्यावर ;)
- Log in or register to post comments
स
साबु
Tue, 10/25/2011 - 14:32
नवीन
लहान असताना.. सुतळी/चौकोनी वाजवायची खुप हौस.. पण आवाज सहन नाहि व्हायचा..मग वात पेटवुन उदबत्ती धरलेल्या हातानेच कान झाकायचो... आणि नवीन शर्टाला भोक पडायची उद्बत्तीने...
:)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/31/2013 - 12:25
नवीन
हे उगा आपलं धागा वर काढायला. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहूच !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2