Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिपावली २०११ : आवाहन.

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 10/19/2011 - 21:15  ·  विशेष
विशेष
नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो! दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्‍यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्‍या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल. तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ केलेत? आजूबाजूचे दिवाळीचे वातावरण कसे आहे? कोणत्या आठवणी कॅमेर्‍यात बंदीस्त केल्यात ते आपल्या मिपा परिवाराला पाहू द्या. आपल्याकडे बरेच सदस्य हे हौशी फोटोग्राफर आहेत. त्यांनी (आणि इतरांनीही) छायाचित्रांचा खजिना उघडा केला तर त्याची मजा सगळ्यांना लुटता येईल. सर्वांना यात भाग घेता यावा म्हणून आपल्याला आवडलेली एक किंवा दोन छायाचित्रे आपण मिपावर चढवू शकता. धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
18665 वाचन

💬 प्रतिसाद (56)
प
पियुशा गुरुवार, 10/20/2011 - 12:51 नवीन
अरे व्वा ! मस्त मजा येइल मग तर उपक्रमात नक्की सहभागी होउ :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/21/2011 - 18:48 नवीन
Image removed. [विजेच्या पणत्या] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मयुरपिंपळे Sat, 10/22/2011 - 07:51 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कुंदन Sat, 10/22/2011 - 08:17 नवीन
१२-१२-२०१२ पर्यंत महाराष्ट्र भार नियमन मुक्त होणारे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/22/2011 - 08:43 नवीन
>>> १२-१२-२०१२ पर्यंत महाराष्ट्र भार नियमन मुक्त होणारे हे नक्की. नैच भारनियमनापासून मुक्ती मिळाली तर सौर उर्जेवर आम्ही पणत्या पेटवू तुम्ही कल्जी करु नये. काही दिवाली-बिवालीचं फोटू बिटु डकवा ना. किती ओव्हर टैम करणार. पाहा आमच्या करंज्या. :) Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
व
विजुभाऊ Mon, 10/24/2011 - 09:05 नवीन
विजेच्या पणत्यांसारख्याच विजेच्या करंज्या ............... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वपाडाव Tue, 11/01/2011 - 10:36 नवीन
विजेच्या पणत्यांसारख्याच विजेच्या करंज्या
विजुच्या पणत्यांसारख्याच विजुच्या करंज्या.... वायफळ लोकांनी या कमेंटला काही-बाही वाचु नये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आशु जोग Fri, 10/21/2011 - 19:24 नवीन
>> विजेच्या पणत्या वा छानच आहेत. न सांगितल्यास नेहमीच्या पणत्या वाटताहेत
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/23/2011 - 17:32 नवीन
ही आमची गेल्या वर्षीची पणती. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Sun, 10/23/2011 - 18:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sun, 10/23/2011 - 19:52 नवीन
आणि यासाठी वेगळा धागा न काढता याच धाग्यावर फोटू टाक्ल्याबद्द्ल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वपाडाव Tue, 11/01/2011 - 10:39 नवीन
आभार नाय काय हबिणंदण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
र
रेवती Sun, 10/23/2011 - 19:19 नवीन
सगळे फोटू मस्त आहेत. दोन वर्षांपूर्वी मिपाकर शाल्मलीनं भेटल्यावर सुंदर पणत्या दिल्यात. मागल्या वर्षीची दिवाळी जरा अशीतशी झाली म्हणून त्या वापरल्या गेल्या नाहीत. या वर्षी नक्की लावणार आणि फोटू काढणार.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 10/23/2011 - 21:41 नवीन
Image removed.Image removed. हे चापत चापत प्रतिसाद देत आहे! ;) (चकली आणि बेसनलाडू प्रेमी) रंग ली
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sun, 10/23/2011 - 22:23 नवीन
रेवतीताई, चकल्या एकदम मस्त दिसत आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 10/24/2011 - 10:55 नवीन
चतुरंग आणि रेवती हे दोन्ही एकाच व्यक्तिचे आयडि आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
प
पैसा Mon, 10/24/2011 - 10:58 नवीन
चतुरंग आणि रेवती हे आयडी असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न केलेलं आहे. तेव्हा 'चतुरंग' यानी त्यांच्या घरी केलेल्या चकल्या आणि लाडूंचे फोटो दिले ते 'रेवती'ने केलेले असणार हे ओघाने आलंच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 10/24/2011 - 11:21 नवीन
मला याची आयडियाच नव्हती तरी मी विचार करत होतो की एकाच्या मेहनतीचं दुसर्‍याला का देत आहेत? खुलाशाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
दादा कोंडके Mon, 10/24/2011 - 11:27 नवीन
वरच्या प्रतिसादात "श्रेय" राहिलं बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 10/24/2011 - 11:33 नवीन
मला तेच म्हणायचं होतं. राहून गेलं. पण ही चूक दादा कोंडकेंच्याच नजरेला सापडणे हा खचितच योगायोग नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 12:15 नवीन
तरी मी विचार करत होतो की एकाच्या मेहनतीचं श्रेय दुसर्‍याला का देत आहेत? नाही हो. उलट ज्या व्यक्तीची मेहनत असावी तिलाच श्रेय देण्याचा प्रयत्न होता. असो. पैसाताईंनी खुलासा दिलेलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चतुरंग Mon, 10/24/2011 - 16:17 नवीन
मी चकल्या तळायला केली आहे मदत आणि हो मी 'चवप्रमुख' म्हणूनही काम केलं आहे! ;) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 16:25 नवीन
रंगा भाऊजी, चकल्या एकदम मस्त तळल्या आहेत हो! एकसारख्या रंगाच्या, खुसखुशीत चकल्या तळायलाही कौशल्य लागतंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रशांत Mon, 10/24/2011 - 18:53 नवीन
म्हंजे तुमची भुमिका महत्वाची होती.... १००% मी हि तेच काम करत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रेवती Mon, 10/24/2011 - 15:57 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Sun, 10/23/2011 - 22:21 नवीन
गेल्या वर्षी मी काढलेली रांगोळी: रंग भरायच्या आधी Image removed. रंग भरल्यानंतर Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/24/2011 - 01:12 नवीन
सुरेख. रंगसंगतीही मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/24/2011 - 06:08 नवीन
मला अशाच ठीपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. पण आमच्या घरी फ्री हँड किंवा त्या पाचबोटाच्या रांगोळ्यावर लै भर. ठीपके वाकडे तिकडे पडतात म्हणून असावं. ;) मागच्या वर्षी दीपावलीला आमच्या अंगणात काढलेली रांगोळी ( कुठं सेव्ह करुन ठेवली आहे कोणास ठाऊक) सापडली तर इथे डकवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 10:50 नवीन
@ बिरुटेसर आणि गणपा, धन्यवाद! ठीपके वाकडे तिकडे पडतात म्हणून असावं. ते ठिपके काहीही साधनाशिवाय सरळ पडणे फारच अवघड आहे. त्याकरता मी एका मोठ्या जाड कागदावर आधी पट्टीने मोजमापं घेवून चौकट आखून घेतली आणि त्या चौकटीच्या प्रत्येक छेदनबिंदूवर अगरबत्तीने भोकं पाडून घेतली. आता प्रत्येक वेळी हा कागद जमिनीवर पसरून त्यावरच्या भोकांवर तेवढी पटापट रांगोळी सोडली की काम होतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा Mon, 10/24/2011 - 11:50 नवीन
एका मोठ्या जाड कागदावर आधी पट्टीने मोजमापं घेवून चौकट आखून घेतली आणि त्या चौकटीच्या प्रत्येक छेदनबिंदूवर अगरबत्तीने भोकं पाडून घेतली.
लहान असताना आम्ही पण अश्याच पद्धतीने 'ठिप कागद' बनवायचो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
र
रेवती Mon, 10/24/2011 - 16:02 नवीन
स्मिता, रांगोळी अतिषय सुरेख आलेली आहे. त्यावर चकमक तू टाकलेली आहेस की मिळणार्‍या रंगांमधूनच आली आहे? ठिपक्यांची रांगोळी पाहून किती मस्त वाटलं सांगू शकत नाही. या वर्षीही काढणार आहेस काय? माझ्याकडे पूर्वी ठिपके काढलेला कागद होता. ठिपके काढून झाल्यावर तो काढताना भोकांमधून रांगोळी सांडून राडा व्हायचा. तो कसा टाळावा?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 16:20 नवीन
रांगोळीवरची चमक मी वरून टाकली आहे. आजकाल रांगोळी विकणार्‍याकडेच अशी चमकीची पूड मिळते म्हणे. (आईने घेवून ठेवली होती) ठिपक्यांची रांगोळी माझ्याप्रमाणेच बर्‍याच लोकांना अजूनही आवडते हे बघून बरे वाटले. आजकाल सगळीकडे संस्कार भारती किंवा मुक्तहस्त रांगोळीच दिसते त्यामुळे मला फारच 'ओल्ड फॅशन' वाटायचं! ठिपक्यांच्या कागदावर ठिपके टाकून झाल्यावर त्याला अलगद जसाच्या तसा (घडी न पाडता) उचलून बाजूला केल्यास रांगोळी सांडून राडा होत नाही ;) या वर्षी परदेशात असल्याने अंगण नाही की रांगोळी नाही :( प्रिया ब ताईंनी सांगितलेला आकाशकंदिल केलाय. फोटो काढला की टाकते इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Mon, 10/24/2011 - 16:30 नवीन
ओक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
म
मराठमोळा Mon, 10/24/2011 - 08:09 नवीन
वीकांताला गाजराचा हलवा आणि पेढे बनवले होते.. काहीच शिल्लक आहेत. घ्या. तोंड गोड करा. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/24/2011 - 11:20 नवीन
पण हलवा आणि पेढे दोन्ही एक्दम केलेत तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
र
रेवती Mon, 10/24/2011 - 16:03 नवीन
छान फोटू. मीही मायक्रोवेव्ह पेढे करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मोहनराव Mon, 10/24/2011 - 16:26 नवीन
तोंपासु!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ग
गणपा Mon, 10/24/2011 - 09:39 नवीन
कुछ मीठा हो जाए !!! Image removed. बेला आणि खोला (बेसन आणि खोबर्‍याचे लाडू.)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/24/2011 - 11:16 नवीन
वेळ मिळेल तेव्हा पाकृ देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 12:22 नवीन
ते साखर पेरलेले बेसनाचे लाडू फारच टेम्टींग दिसत आहेत. जमेल तेव्हा पाकृ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रेवती Mon, 10/24/2011 - 16:04 नवीन
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/24/2011 - 16:26 नवीन
रांगोळ्यांचे फोटो सुरेखच आहेत. पदार्थांचे फोटो बघितले नाहीत! ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/24/2011 - 16:59 नवीन
Image removed. नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ नरका सुराच्या वधाचे प्रतिक म्हणुन पायाखाली फोडले जाते. :) काय बरं याचे नाव ?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 10/24/2011 - 17:03 नवीन
आजच सकाळी हे वाचले. मला तरी हा प्रकार माहिती नाही. आम्ही नरकासुराच्या वधाचे प्रतिक म्हणून पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून सुतळी बॉम्ब फोडत असू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पैसा Mon, 10/24/2011 - 17:05 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे 'कारिट' म्हणतात, 'कार्टं' नव्हे. कार्टं हे नाव दुसर्‍या काही मंडळींसाठी राखीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/02/2011 - 10:38 नवीन
काय बरं याचे नाव ? च्यायला, आम्ही खेडवळ लोक याला 'चिभडं' म्हणतो. थोडे सुशिक्षित लोकांना याला मी 'शेरनी' असं म्हणतांना पाहिलंय. काही ठिकाणी 'कारटं' 'कर्टुले' असं म्हणतांना वाचलंय. वरीजनल याचं नाव काय आहे, कोणी सांगू शकेल काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ज
जयंत कुलकर्णी Mon, 10/24/2011 - 17:37 नवीन
उद्या फोटो काढायला जाणार आहे. बघू काही चांगले फोटॉ मिळतात का ते ! Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 10/24/2011 - 17:55 नवीन
कृपया दिवाळीचे ,रोषणाई चे भरपूर फोटो येथे अडकवा . तेवढीच दुधाची तहान ताकावर फोटो प्रेमी मुक्काम पोस्ट जर्मनी
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 10/24/2011 - 19:00 नवीन
मागील वर्षी माझ्या बहिणीने काढलेली रांगोळी.. Image removed. माझे काम फोटो काढायचे.. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/24/2011 - 19:01 नवीन
मस्त दिसतिये! श्री लिहिलेला भाग हीसुद्धा रांगोळी आहे की काही छापील चित्र ठेवलय? चित्र असलं तर आयडीया भारीये. चित्र नसलं तर कला उच्च दर्जाची आहे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा