दिपावली २०११ : आवाहन.
नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो!
दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल. तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ केलेत? आजूबाजूचे दिवाळीचे वातावरण कसे आहे? कोणत्या आठवणी कॅमेर्यात बंदीस्त केल्यात ते आपल्या मिपा परिवाराला पाहू द्या. आपल्याकडे बरेच सदस्य हे हौशी फोटोग्राफर आहेत. त्यांनी (आणि इतरांनीही) छायाचित्रांचा खजिना उघडा केला तर त्याची मजा सगळ्यांना लुटता येईल. सर्वांना यात भाग घेता यावा म्हणून आपल्याला आवडलेली एक किंवा दोन छायाचित्रे आपण मिपावर चढवू शकता.
धन्यवाद!
💬 प्रतिसाद
(56)
म
मोहनराव
Mon, 10/24/2011 - 19:09
नवीन
मधले चित्रच आहे. माझ्या बहिणीला संस्कार भारती रांगोळी हा प्रकार मस्तपैकी येतो. फोटो अजुन असतील तर डकवतो.
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Tue, 10/25/2011 - 17:27
नवीन
रांगोळी अतिसुंदर !
पण वरून फोटो काढणार्याचेही कसब कौतुकास्पद
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Mon, 10/24/2011 - 19:06
नवीन
छान धागा आहे. फोटो, रांगोळ्या, पाककॄती,पणत्या पाहून लय भारी वाटतंय .
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/31/2011 - 14:48
नवीन
दिवाळीत सांगलीला गेले होते. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला भेट देऊन येताना रस्त्यात गौळणी दिसल्या. मस्त कलंदरच्या "गौळणींची" आठवण ताजी झाली.
लगेच फोटो काढायला धावले,
परवानगी विचारायला एक छोटा ६/७ वर्षाचा मुलगा फक्त होता, त्याला विचारलं "फोटो काढू कारे?"
तो जाम खूष झाला, आणि त्याच्या अक्काला हाका मारायला लागला, "ए अक्का, फोटो काढायलाल्यात ग!" पण जास्त वेळ नव्हता, त्यामुळे त्याच्या अक्काची वाट न बघता तिथून निघाले.
- Log in or register to post comments
द
दादा कोंडके
Mon, 10/31/2011 - 15:01
नवीन
कित्ती वर्षांनी बघतोय ह्या गौळणी! आणि तो झोपलेला पेंद्याच आहे ना?
लहान असताना पेंद्याच्या बेंबीत फटाके ठेउन उडवायला मजा यायची! :)
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 11/01/2011 - 10:26
नवीन
आमची दिवाळी
अजून टाकेन फोटो ,
तूर्तास एवढेच आहेत

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2