कलादालन

आकाशकंदिल!!!

Primary tabs

नमस्कार! आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (http://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे! हे तर भारीच सोप्प प्रकरण आहे :) त्यात मनासारखं साहित्यंहि मिळालं मग अजुनच हुरुप आला अणि बनवला आकाशकंदिल :) Image removed. Image removed. धन्यवाद प्रियाताई :) सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! :) (मराठी टंकलेखनात काहि चुका झाल्या असल्यास (चुकिचा काना, मात्रा, वेलांटी इ.) माफ करावे. मोकळेपणाने निदर्शनास अणाव्यात, त्याची मनापासुन दखल घेतली जाईल व चुका सुधारल्या जातील :) )
प्रचेतस

सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल

त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.

उदय के'सागर

धन्यवाद वल्ली :)

अहो, त्या झिरमळ्याचा पेपर ऐनवेळेस कमी पडला (माझ्या अगाऊपणा मुळे) म्हणुन आहे त्यात भागवावं लागलं :(

:)

गणेशा

मस्त जमलाय.. आवडला.

मी पण मागील धाग्यावरुन कालच एक आकाश कंदिल बनवला...

रेवती

आकाशकंदील छानच झालाय.
नक्षिदार कागद भारी मिळालाय.
आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले.
घरी होते त्यात असाच बनवलाय.
प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!

उदय के'सागर

वल्ली, गणेशा, पियुशा, रेवती आणि प्रिया तुम्हा सर्वांना मनापसुन धन्यवाद :)