जे न देखे रवी...

आल्यावर असा येशील की...

Primary tabs

कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या
कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या
आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा

तू इथे नाहीस तरीही तू सोबत आहेस असंच वाटतं मला
माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जणू तूच आहेस रे लपलेला
जेव्हापासून तुला ओळखते, आपलं मानलं आहे मी तुला
माझं भोवताल, माझा देह सारं काही तूच व्यापून उरलेला

आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा
कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या
कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या

रात्र अन् दिवसाचे श्वास माझे, जणू तुझेच आहेत सारे
शपथ आयुष्याची, माझं आयुष्य आहे तुझी देणगी रे
या एकाकी वाटचालीमध्ये तूच आहेस रे वाटाडया माझा
कितीही असला दुरावा तरी तू आहेस बाहुपाशात माझ्या

आल्यावर असा येशील की तू परत जावू नकोस राजा
कधी सांज ढळत असताना ह्रदयात उतर तू माझ्या
कधी चांदणं फुलत असताना ह्रदयात उतर तू माझ्या

(लेखन हे न माझे, हे त्याचे गाणे आहे... 'सुर' या हिन्दी चित्रपटातील ' 'कभी शाम ढले तो मेरे दिलमे आ जाना' या गीताचा भावानुवाद...)