कलादालन

रंगीत माती पासून बनवलेले संगीतमय गणपती बाप्पा !!

Primary tabs

रंगीत मातीपासून बनवलेले हे संगीतमय गणपती बाप्पा तुम्हा सर्वाना नक्कीच आवडतील अशी आशा आहे.. गणपती बाप्पा मोरया !! Image removed. Image removed.
पूनम ब

धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल !!

विकास

फक्त एकच शब्द सुचतोयः Cute! :-)

हे तुम्हीच बनवलेत असे गृहीत धरून त्याबद्दल अधिक लिहावेत अशी विनंती करतो!

पूनम ब

मी हे गणपती बाप्पा एयर ड्राय क्ले पासून बनवले आहेत. हि माती खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. बाप्पा ची मूर्ती बनवल्या नंतर मी त्याला काळ्या रंगाच्या मार्कर ने डिझाईन बनवले आहे. गव्हाच्या कणके पासून पंचारती बनवली होती या दिवाळी ला.त्या सेट वर एक गणपती ठेवला. त्याची शोभा आणखीच वाढली. इथे त्याचा फोटो सदर करत आहे. तुम्हाला नक्की आवडेल. :)

मदनबाण

बाप्पाचे बाल रुप किती सुंदर दिसते... :)

पूनम ब

खूप खूप धन्यवाद रेवती आणि चित्रा ताई !!

प्रचेतस

अहो पूनमतै.
प्रत्येक प्रतिसादानंतर धन्यवाद मानत बसू नका हो.

किसन शिंदे

व्वा!!

छानच आहेत गणपती, खुप आवडले.

अंवातरः तुमचही आडनाव बोरकर का? :)

छोटा डॉन

बाप्पा अत्यंत सुंदर दिसत आहेत, सुरेख कलाकृती.
हे सर्व हाताने बनवले आहे की मोल्ड्स वगैरे वापरले आहेत (अर्थात ती शक्यता कमीच दिसत आहे, पण तरीही सुबकता पाहुन हा प्रश्न विचारण्याच्या मोह आवरला नाही ) ?

आधीच्या एका धाग्यातल्या पणत्याही आवडल्या :)

- छोटा डॉन

पूनम ब

धन्यवाद प्रतीकीये बद्दल..सर्व बाप्पा हाताने च बनवले आहेत :) एयर ड्राय क्ले पासून मूर्ती ला पाहिजे तसा आकार देणे सोपे जाते..त्यामुळे सुबक दिसत आहेत बाप्पा :)

आत्मशून्य

आवडतील अशी आशा आहे ?

फक्त आशा ? आहो आवडतील अशी खात्री आहे लिहायचे ना.

सूरेख.

पिंगू

एकदम मस्त शिल्पे आहेत..

- पिंगू