कलादालन

क्रेयोन आणि मार्कर आर्ट!!

Primary tabs

क्रेयोन आणि मार्कर वापरून बनवलेली चित्रे.. बांगडी चा वापर करून विविध रंगाच्या क्रेयोन ने वर्तुळे काढून घेतली आणि मार्कर ने त्यावर गणपती बाप्पा चे स्केच बनवले. काळ्या रंगाचा मार्कर वापरल्यामुळे गणपती उठावदार दिसत आहे. :) Image removed. अरेबिक मेहंदी शैली मधील मोर Image removed. Image removed. Image removed.
पूनम ब

हो.. नक्की..:) रोज रोज नवीन कलाकृती येतील मिपाव वर :)

प्रचेतस

अहो ताई,
रोज नको हो, निदान २/३ दिवसांचे तरी अंतर ठेवत जा,
बाकीच्या धाग्यांनाही वर जागा राहू द्या की.

उदय के'सागर

केवळ अप्रतिम!!!

गणपती आणि मोर हे तुमचे विशेष फेव्हरेट दिसतायत :)

येउ द्या अजुन, ये दिल मांगे "मोर" (More) :D :)

अतिशय सुंदर कला-अविष्कार , तुम्हाला ही कला येण म्हणजे दैवी देणगी समजा ! :)

Mrunalini

खुपच सुंदर गं..... एकदम वेगळे आहे... मस्त. :)

पिंगू

लई भारी.. हे पण आवडले. पोतडीतील आणखी काही असेल तर येऊ द्या.

- पिंगू

नितिन थत्ते

यातले काही गणपती डाव्या आणि काही उजव्या सोंडेचे आहेत. कल्जि घेने.

टीप: कोणता डाव्या सोंडेचा आणि कोणता उजव्या सोंडेचा हे सांगता येणार नाही (कारण त्यातलं काही कळत नाही).

प्राजु

वाह!! तू गुणी कलाकार आहेस गं!! मस्त आहेत सगळीच चित्रे!

चित्र क्र. २ आणि ३ विशेष आवडली. त्या दोन्हींमध्ये निव्वळ कलाकुसरीपेक्षा रंग आणि आकारांची मांडणी छान झालेली आहे.

पहिल्या चित्रात प्रयोग अभिनव आहे, पण मागे काढलेली वर्तुळं थोडी गिचमिड करणारी वाटली. विशेषतः गणपतीचं चित्र 'पारदर्शक' असल्यामुळे.

अशीच चित्रं काढत रहा. अरेबिक मेहंदी शैलीबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. काही उदाहरणं असतील तर दाखवावीत.