जे न देखे रवी...
पूर आठवणींचा
Primary tabs
आठवणी साचलेल्या
काळजात ओथंबलेल्या
आठवणी पेटलेल्या
होरपळून निघालेल्या
आठवणी भरजरी
मखमली पेटीत जपलेल्या
आठवणी हळूवार
अलगद हातांनी वेचलेल्या
आठवणी पहिल्या स्पर्शाच्या
नकळत लाजलेल्या
आठवणी मीलनाच्या
हृदयात साठलेल्या
आठवणी पावसाच्या
मनात कोसळणार्या
आठवणी सरींच्या
चिंब चिंब भिजवणार्या
आठवणी थंडीतल्या
उबदार कुशीतल्या
आठवणी पहाटेच्या
गार गार वार्यातल्या
आठवणी विरहाच्या
पिळवटून निघालेल्या
आठवणी भेटीच्या
मोहरून निघालेल्या
आठवणींचे मोहळ
भावनांचा कल्लोळ
आठवणींचे वादळ
अनावर तो कोसळ
आठवणींचा वावर
ओला गहिवर
आठवणींचा आसरा
मनाचा गाभारा
जयश्री अंबासकर
आठवणींचे मोहळ
भावनांचा कल्लोळ
आठवणींचे वादळ
अनावर तो कोसळ
कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले !
सुंदर आठवणींच्या आठवणी.
आठवणींचे मोहळ
भावनांचा कल्लोळ
आठवणींचे वादळ
अनावर तो कोसळ
आठवणींचा वावर
ओला गहिवर
आठवणींचा आसरा
मनाचा गाभारा
सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते.
आठवणींचा पूर
भावनांचं वहाणं..
आठवणींचा धूर
हृदयाचं जळणं...
आठवणींचं आभाळ
पापणीत दडलेलं
आठवणींचं पाखरू
गवतावर पहुडलेलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:)
सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू?
नेहमी सारखी सु॑दर कविता.
तुमच्या कविता मला खुप आवडतात.
आठवणी पहिल्या स्पर्शाच्या
नकळत लाजलेल्या
आठवणी मीलनाच्या
हृदयात साठलेल्या
खुप सुंदर....
(आठवणीत बुडुन गेलेली)
वरदा
आवडली !!!
जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:)
स्वाती
सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे.
ईश्वरी
कविता एकंदर आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
कविता आवडली.
क्या बात है जयू!
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...!
आठवणी पावसाच्या
मनात कोसळणार्या
आठवणी सरींच्या
चिंब चिंब भिजवणार्या
हे कडवं सर्वाधिक आवडलं! :)
आपला,
(पावसाच्या आठवणींतला) तात्या.
मनापासून आभार !
अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :)
प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :)
आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :)
चतुरंग