पाककृती

पार्ले जी बिस्कीट चॉकलेट केक

Primary tabs

कालच एक जमा केलेल्या पाककृती मधिल एक पाककृती सापडली. पार्ले जी बिस्कीट चॉकलेट केकची. सुटटी होति म्हणुन करायची ठरवली. आई ने सगळे सामान आणुन दिले. तेव्हा बनवली. साहित्यः पार्ले जी बिस्कीटचा १०रु चा पुडा २ चमचे कोको पावडर १ १\२ कप दुध १\२ वाटी साखर ५ रु. चे ईनो (साधा) पाकिट कृती : प्रथम बिस्कीटचा मिक्सर मधे बारीक चुरा करुन घ्या. त्यात साखर आणि कोको पावडर घाला. या मधे दुध घालुन सरबरीत भिजवा. Baking tray ला आतुन तुप लावून घ्या. वरील batter मधे इनो घालुन फेटुन घ्या. आता हे batter Baking tray मध्ये ओतुन बेक करा.
धन्या

भलतीच सोपी आहे पाकॄ.

आता पुण्यात पारले जी बिस्कीट शोधणं आलं. ;)

या पाकृला इनो कशाला लागतो? इनोचा उपयोग जळजळ थांबवण्यासाठी होतो असे ऐकून आहे. ;)

पियुशा

फोटु कुठाय ?
रेसेपि सोपि आहे पण ही पा.क्रु अन्डी घालुन करता येइल का ? ;)

rupali.gaikwad11

मी अन्डी घालुन try नाही केला कधि next time try करेन.

आणि फोटु काधायला विसरले. Sorry

यकु

फोटो नाही?
मग ही पा.कृ. फाऊल धरण्यात आली आहे.

दादा कोंडके

फोटु नाहीत, पण पाकृ जरा हटकेच दिसतीय. आणि साहित्य ही अगदी "ऑफ द शेल्फ" आहे. उगाच यंव चीज अन त्यंव पनीर वगैरे कुठुन आणायचं? :)

इनो बेकींग पावडर ऐवजी घातला आहे काय?

मोहनराव

फोटु टाका हो.. (अलिखीत नियम आहे पाककृती धागा काढण्याबाबत)

पाषाणभेद

फारच छान पाकृ.

१. कृपया पाकृ विस्ताराने टाका.

>>>> कृती : प्रथम बिस्कीटचा मिक्सर मधे बारीक चुरा करुन घ्या. त्यात साखर आणि कोको पावडर घाला. या मधे दुध घालुन सरबरीत भिजवा. Baking tray ला आतुन तुप लावून घ्या. वरील batter मधे इनो घालुन फेटुन घ्या. आता हे batter Baking tray मध्ये ओतुन बेक करा

२. आपण मायक्रोवेव्ह ओवन वापरला आहे काय?
३. मायक्रोवेव्ह मध्ये Baking tray विकत मिळतो काय? आमच्या मायक्रोवेव्ह सोबत आलेला नाही.
४. हे batter म्हणजे 'वरील मिश्रण' असे तुम्हाला म्हणायचे होते काय?
५. किती वेळ बेक करायचे?
६. तापमान किती ठेवायचे?
कृपया आपण (किंवा इतर कुणीतरी वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शाळेच्या डब्याचा प्रश्न आहे.)

दादा कोंडके

१. वरील प्रमाणेच.
२. नसावा. केक कन्वेक्शन अवन मध्येच छान होतात असा (माझ्या बायकोचा) अनुभव आहे.
३. फक्त मायक्रोवेव्ह असेल तर मिळणार नाही. पण कॉम्बी असेल तर कन्वेक्शन मोडवर ट्रे ठेउन करता येइल.
४. हो
५ आणि ६. १८० डिग्री वर २५ मिनिटात व्हावा.

शाळेच्या डब्याचा प्रश्न आहे.)

हा हा हा..

पाषाणभेद

ओ दादा तुमच्यावालं पटलं आमाला. तसंच करू म्हंतो.
मुळ लेखीकेलाबी उत्तर दे म्हनावं म्हंजी शंका र्‍हानार न्हायी.

कोम्बीमदी लय झोंबाझोंबी व्हती. ह्ये बटन दाबा त्ये बटन दाबा, काय खरं नाय बाबा. साधासिंपल ओवनच बरा.

हॅ हॅ हॅ आता थंडी लय पडाया लागली तवा मायक्रोवेव्ह बंद करूनशान हिटर लावावा म्हंतो!

rupali.gaikwad11

अहो मी मिसळपाववर नवीन आहे.
१. मराठीत type करायला खुप अवघड वाटत होते म्ह्णुन पाककृती विस्ताराने नाही टाकली.
I will keep in mind to write विस्तारीत पाकृ.
२.हो आम्हि मायक्रोवेव्ह ओवन वापरला आहे.
३.मायक्रोवेव्ह मध्ये Baking tray विकत मिळत नाही पण बाजारात मिळतो.
४. हो, batter म्हणजे 'मिश्रण'. (हे तुमचे 'मिश्रण' type करता नाही आले. या ओळी मध्ये तुमचे 'मिश्रण' copy paste केले आहे) :)
५. baking time and temperature मी अंदाजाने करते.bcoz our microwave is international. :)

तुम्ही शाळेचे डब्बे बनवता का?

पूनम ब

छान सोपी पाककृती आहे.. करून पाहीन :)

बहुगुणी

जालावर थोडा शोध घेतला तर बर्‍याच ठिकाणी ही पाककृती सापडली:

प्रेशर कूकर मध्ये केलेला केक:

काजू वगैरे घालून केलेली थोडीशी अशीच पाककृती इथे सापडली, तिथलाच फोटो:

ओव्हन मध्ये केलेला केक:

१. या दुव्यावर:

२. आणखी एक इथे:

रुपाली ताई: तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये केलेला केक यांपैकी कशासारखा दिसतो?

शेवटी, हा फ्रीझरमधला केक.

rupali.gaikwad11

माझा केक पहिल्या फोटो सारखा होता पण without cashew nuts.