कलादालन

दवबिंदु १ - पानांवरचे

Primary tabs

नमस्कार मंडळी! गेल्या आठवड्यात आमच्या विभागाच्या वार्षिक परिषदेनिमित्त कर्नाळा येथे जायचा योग आला. तेथे दोन दिवस दोन रात्री मुक्काम होता. दुसर्‍या दिवशी सकाळी समोरच्या हिरवळीवर नजर गेली आणि त्या लुसलुशीत हिरवळीवर अनवाणी चालायचा मोह अनावर झाला. पावलांचे मनसोक्त लाड होत असताना नजर गवतावर चमचमणार्‍या दवबिंदुंवर गेली. ताबडतोब खोलीवर येउन कॅमेरा उचलला आणि मग एक तास कसा गेला ते समजलेच नाही. गवताच्या पात्यावरचे टपोरे थेंब, पानावरचे नाजुक थेंब, मोठ्या पानांवरचे स्तब्ध थेंब, इवल्याश्या दुरंगी गवत पातीवर हीर्‍यासारखे लखलखणारे थेंब... किती चित्रे टिपली तरी कमीच होती. त्यात मला बरी वाटलेली ही चित्रे. कॅमेरा निकॉन डी ६०, भिंग - टॅमरॉन १:१ मॅक्रो ९० एमेम. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
५० फक्त

जबरदस्त फोटोच, शेवटचा जास्त आवडला.

गवि

आहा... सुंदर... थेंबात दिसणार्‍या आजूबाजूच्या प्रतिमा मस्त..

वरतून चवथ्या लंबरचा आणि शेवटच्या लंबरचा फोटो आवडला. :)

बाकीच्या फोटोत दवबिंदू भारी आले आहेत पण त्याचं ब्याग्राउंड ठळक नाही की दवबिंदू ज्या पानांना लटकून आहेत ते पान स्पष्ट नाही किंवा काही तरी अस्पष्ट, धुसर, असं छायाचित्र पाहतांना वाटतंय. पण कदाचित छायाचित्र कलेच्या दृष्टीने ते चित्र सुंदरही असू शकते पण मला काही झेपेना राव.

पण मस्त हं. अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

गणेशा

फोटो दिसले नाहित ............ ...... ... .. .

मला वाटते जर थोडे क्रॉप केले असते तर डॉ. बिरूटे यांना जे वाटले असते तसे कदाचित वाटले नसते. मी एडिट करायचा प्रयत्न केला आणि शार्पही करायचा प्रयत्न केला पण लो रेझोल्यूशनची इमेज असल्यामुळे जमली नाही.

पण भारी प्रकाश आणि मॅक्रो.

Nile

फोटो पाहून असे दिसते की कमी "डेप्थ ऑफ फिल्ड" वापरून फोटो काढले आहेत. असे असल्यामुळे अगदी जवळच्याही गोष्टींवर फोकस नाहीए. मॅक्रोफोटोग्राफीत असा ब्लर अनेकदा वापरतात.

मला बर्‍याच फोटोंत लक्ष्य चुकल्या सारखे वाटते आहे. जे लक्ष्य होते (फोकस मधील थेंब) ते अजून मोठे, फोटोचा मुख्य विषय वाटतील असे यायला हवे होते असे वाटते. फिक्स्ड फोकल लेंथ ची लेन्स वापरली आहे का?

सर्वसाक्षी

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

डॉ. साहेब, जयंतराव, नाईल - हे फोटो ९० एम एम फिक्स्ड फोकल लेंग्थ मॅक्रो लेन्स वापरून काढले आहेत. मॅक्रोमध्ये मूलतः डेप्थ ऑफ फिल्ड कमी असते आणि ते विषयाला साधक व पूरक ठरते. जर थेंब व संपूर्ण पात स्पष्ट आले तर चित्र सपाट होईल, त्यातील प्रभाव कमी होईल. ही चित्रे अगदी जवळुन म्हणजे काही इंचांवरुन प्रसंगी जमिनीवर पार आडवे पडुन अशा प्रकारे घ्यायचा प्रयत्न केला की मूळ विषय स्पष्ट व परिसर धूसर व्हावा. पोर्ट्रेट घेतानाही चेहर्‍याच्या पलिकडचे सर्व प्रकर्षाने धूसर केले जाते. मॅक्रो मध्ये प्रयत्न पूर्वक डेप्थ ऑफ फिल्ड वाढविली जाते ती फूले टिपताना ज्या योगे संपूर्ण फूल स्पष्ट दिसेल, अन्यथा काही पाकळ्या स्पष्ट व काही अस्पष्ट होतात. अर्थात याचा कलात्मक वापर केला तर चित्र सुंदर दिसते.

शेवटच्या चित्रात बारकेसे थेंब व पाने एकाच प्रतलावर असल्याने व थेंब हे पानाच्या मानाने खूपच लहान असल्याने सर्व काही बर्‍यापैकी स्पष्ट आहे या उलट इवल्याश्या पात्यावर टपोरा थेंब टिपताना तो स्पष्ट साधला तर पाते अस्पष्ट होते व ते तसे झाल्याने थेंब खुलतो.

या निमित्ताने झालेली चर्चा पाहता खूप आनंद झाला. मिपावर अनेक प्रतिभावंत आहेत आणि ते कलाकृति बारकाईने पाहतात, अभ्यास करतात व उत्तम सूचनाही देतात हे मोठेच आहे. एक प्रस्ताव असा की सर्व चित्रण प्रेमींनी आपल्याला आवडलेले एखादे चित्र इथे द्यावे व त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया व त्यांचे आकलन इतरांनी द्यावे ज्यायोगे चित्राच्या प्रभावी बाजु तसेच सुधारणांच्या जागा यावर चर्चा होईल व त्यानिमित्ताने माझ्यासारख्या हौशी माणसाला काही शिकायला मिळेल व चित्रणकलेत सुधारणा करता येईल.

धन्यवाद.

मदनबाण

या उलट इवल्याश्या पात्यावर टपोरा थेंब टिपताना तो स्पष्ट साधला तर पाते अस्पष्ट होते व ते तसे झाल्याने थेंब खुलतो.

हे करताना तुम्ही Spot किंवा Center-Weighted मिटर सेटींग वापरली होती का ?

छायाचित्रणकलेवर लिहिणारी मिपावर बरीच सिद्धहस्त मंडळी आहेत. श्री शरद सर, श्री रानडे साहेब, आमचा मित्र मदणबाण, आणि आपण. तेव्हा आपणच कधीतरी या छायाचित्रांवर लेखन केले पाहिजे असे वाटते. नेमकं आपलं चित्र आल्यावर मी कोणत्या तरी दैनिकात फोटोग्राफीवरील लेखन वाचले होते त्यात म्हटलं होतं की 'फोटोग्राफी म्हणजे भावना व्यक्त करणारी भावनात्मक द्र्श्ये' नवरसांचे सर्वोत्त्कृष्ट उदाहरण म्हणजे छायाचित्रे. छायाचित्र म्हणजे सृजनशिलता, छायाचित्र म्हणजे द्र्ष्टीतलं सौंदर्य, छायाचित्र म्हणजे वगैरे वगैरे.

फोटोग्राफीच्या विविध प्रकारांवर एकदा मिपावर काथ्याकूट झाला पाहिजे. एकेकाने आपल्या कॅमे-यातील काही छायाचित्र मिपावर डकवली पाहिजेत. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र,स्थीर चित्र, खरवडलेले चित्र, छायाचित्रांचे जितके प्रकार असतील तितक्या प्रकारांची ओळख झाली पाहिजे त्याचबरोबर त्यातली कुशलता, घ्यावयाची काळजी वगैरे यावरही चर्चा झाली पाहिजे. आम्हीही मोबाईलने चिमण्या, कावळे, व्यक्ती, क्लीक करतो पण ते केवळ हौस म्हणून पण आम्हाला काही अशा चित्रातून शिकता आलं तर शिकायला आनंदच वाटेल.

saalunki
[आमचीही फोटोग्राफी : गॅलरीत पडल्या पडल्या काढलेलं छायाचित्र]

-दिलीप बिरुटे

स्मिता.

सगळे फोटो आवडले... काही फोटो ज्यात दवबिंदूत आजूबाजूच्या प्रतिमा आल्या आहेत ते जास्त आवडले.

सर्वसाक्षीजी,

१,२,५,६,८ मस्त आहेत. मायक्रो लेन्सची करामत खुलून आली आहे. थेंबावरील फोकस अत्यंत शार्प आहे त्यामुळेच थेंबावरील प्रतिबिंबित प्रतिमाही स्पष्ट दिसत आहेत. अभिनंदन.

वपाडाव

अप्रतिमही कमी वाटतंय असे फोटो.....

रम्या

झकास, फार आवडले फोटोग्राफ्स!

Shreyas Joshi

क्यामेराची माहीती देणे काही जरुरीचे वाट्त नाही !!!!!!!!!

बाकि फटू सुंदर आलेत !

सारे आव्डले !

मायक्रो लेन्स म्हण्जे काय रे भाऊ ????????????????????????

फक्त तिसर्या फटूतील दवव्बिंदू ब ना व ट वटतात? हाहाहाहाहा हाहाहाहाहा हाहाहाहाहा हाहाहाहाहा हाहाहाहाहा हाहाहाहाहा हाहाहाहाहा !!!!!

सन्जोप राव

सुरेख फोटो.
'देव तरी कुणाच्या हातात काय घालून ठेवतो बघा!' - चितळे मास्तर

चतुरंग

थेंब मोत्यांच्या लडीसारखे दिसताहेत. शेवटला पानांचा तर त्रिमित आलाय, चटकन हात लावून बघावा इतका जिवंत.

-रंगा