पाककृती

भरली कारली.

Primary tabs

साहित्यः-४ कोवळी लहान कारली.व तळण्यासाठी तेल. सारणासाठी साहित्यः-२ चमचे भाजलेले तीळ, २ चमचे भाजलेले बेसन्(एक चमचा तेलावर भाजवे.) २ चमचे भाजलेले सुके खोबरे. १ चमचा धणेपूड. १ चमचा जिरेपूड. अर्धा चमचा आमचुर पावडर. अर्धा चमचा लाल तिखट. चिमूटभर हिंग. पाव चमचा हळद. १ चमचा बदिशेप. चवीपुरती साखर. १ चमचा खसखस. मिठ. Image removed. Image removed. कृती :-कारली धुवून घ्यावी.पाठ किसणीने किसून प्लेन करून घ्यावी.प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा. आणि आतील बिया काढून साफ करावे.आतल्या बाजुने मिठ चोळून ठेवावे.तीळ,खोबरं एकत्र कुटून घ्यावे.त्यात धणेजिरे पूड्,तिखट्,साखर्,भाजून कुटलेली खसखस्,तेलावर भाजलेले बेसन व मिठ घालून मिश्रण एकत्र करावे.मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा. व कारली कुरकुरीत तळावी. वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा. Image removed.
प्राजु

पाकृ छान.. पण फोटो :(
प्रेझेंटेशन बहोत जरूरी है !! (संजीव कपूर कडून साभार!!) :)

पैसा

यांच्या पाकृ छान असतात, पण फोटोत गडबड होते.

गवि

झकास आवडती पाकृ... जियो...

:)

पिंगू

पाककृती चविष्ट असणार यात काही शंका नाही. बाकी मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढतान जरा काळजी घेतली की असे धुरकट फोटो येणार नाहीत.

- पिंगू

मदनबाण

वा... :)
चिंचेचा कोळ+कांदा यांचे सारण करुन केलेली भरली कारली सुद्धा मस्त लागतात. :)

JAGOMOHANPYARE

छान

५० फक्त

+१००० टु सविता००१

तुमची पण नजर जबरा आहे, मला हे वल्लीनं पण सांगितलेलं होतं. काही शब्दांचा फरक सोडला तर सेम टु सेम आहे, अगदी सामानाची यादी पण तशीच्या तशी आहे. म्हणजे दोन चित्रातले १२ फरक ओळखा असतं ना तसं आहे हे.

साहित्य रे कृतीच्या तिस-या पॉईंटातल्या पहिल्या ओळिपर्यंत तेच आहे सगळं. ही खावी कशाबरोबर आणि खालच्या दोन टिपा द्यायच्या राहिल्यात.

पण याबद्दल काय सांगतं मिपाचं धोरण माहित नाही याबद्दल कुणी काही सांगेल का ?

प्रचेतस

तिकडचे फोटो मात्र राइट क्लिक प्रोटेक्डेड दिसतात.