Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग ३

म
मदनबाण यांनी
Tue, 11/15/2011 - 17:27  ·  विशेष
विशेष

Book traversal links for रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग ३

  • ‹ रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग २
  • Up
(इथे हा वरचा दिवा काही मला चुकवता आला नाही. :( ) माझे प्रेरणा स्थान. माझे मनोगतः ---अनेक वेळा मी पाहिले आहे की...रस्त्यावर कोळशाने /खडुने एखादा चित्रकार साईबाबा,शंकर इं चित्र काढतो,त्यात रांगोळी किंवा रंगाने ते चित्र जिंवंत करतो ! काय जादु आहे अश्या कलाकारांच्या हातात नाही का ? कसे जमते यांना इतकी सुंदर रेखीव चित्रे काढायला ? अत्यंत चिकाटीने साध्य होणारी ही कला विविध विषयांचा सहज वेध घेते,बघणार्‍याला भारावुन टाकण्याची एक अनोखी शक्ती या कलेत आणि कलाकाराच्या हातात असते... अजुनही ही रांगोळीची कला या मेहनती कलाकारांच्या अथक परिश्रमामुळे जिंवत आहे याचा मला आनंद आहे,आणि असे अनेक कलाकार निर्माण व्हावे अशी माझ्या मनाची इच्छा आहे... दिवाळीत या कला प्रदर्शनाचा जो आनंद मला उपभोगता आला,तोच आनंद मिपाकर वाचकांना घेता यावा यासाठीच मी हे फोटो काढले. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो... प्रदर्शन स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७ गिरगांव रंगावली ग्रुप. (हौशी फोटुग्राफर) :) मदनबाण..... भाग १ भाग २

प्रतिक्रिया द्या
18589 वाचन

💬 प्रतिसाद (17)
व
विलासराव Tue, 11/15/2011 - 17:42 नवीन
तिन्ही भाग आवडले. आम्हाला गिरगावात राहुनही खबर नाही लागली. पुढच्या वेळेस असा काही कार्यक्रम इकडे असेल आनी तुम्हाला शक्य झाले तर मलाही कळवा. आमच्या़कडचे चहापाणी घ्यायलाही या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/16/2011 - 04:30 नवीन
धन्यवाद... :) नक्की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ग
गणपा Tue, 11/15/2011 - 18:14 नवीन
काही रांगोळ्या तर इतक्या जिवंत वाटताय की आता आपल्याशी हितगुज साधतील की काय असा भास होत आहे. ग्रेट.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/16/2011 - 06:28 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रेवती Tue, 11/15/2011 - 18:17 नवीन
जय द्वारकेशवाल्या रांगोळीत काळा आणि राखाडी रंग भरण्याची कमाल केली आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 11/15/2011 - 18:29 नवीन
हा पण भाग मस्त रे, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 11/15/2011 - 19:23 नवीन
सुंदर रे बाणा ... !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 11/15/2011 - 22:43 नवीन
झकास. कलाकारांची कदर करावी तेवढी थोडीच आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 11/16/2011 - 06:40 नवीन
तिनही भागात अनेक उत्तमोत्तम रांगोळ्या आहेत. त्या कलाकारांना अभिवादन! त्या आमच्यापर्यंत अत्यंत सुंदर छायाचित्रांतून पोहोचवल्याबद्दल मदनबाणाचे आभार! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 11/16/2011 - 07:18 नवीन
गौतम राजाध्यक्षांची रांगोळी विशेष आवडली. क्यामेरा अगदी थ्रीडीगत बाहेर आल्यासारखा वाटतोय.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/16/2011 - 07:39 नवीन
रांगोळी काढणार्‍या कलाकाराना आपला सलाम. :) बाणा आमच्याशी सुंदर रांगोळ्या शेअर केल्याबद्दल धन्यवाद रे मित्रा. :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 11/23/2011 - 23:53 नवीन
बाणा अतिशय छान धागा काढला आहेस.. - पिंगू
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 11/24/2011 - 10:09 नवीन
द्वारकेश अन राजाध्यक्षांची रांगोळी लैच आवडली..... द्वारकेशवाली थोडी लांबट की काय तशी वाटते आहे.... म्हणजे चेहर्‍यावर फोकस नाही आला.... अवांतर :: स्पावड्या सारख्या एखाद्या हडकुळ्या माणसाला कडेवर उचलुन मग रांगोळीचा फोटो काढल्यास चांगली दिसेल असे वाटते........
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 11/24/2011 - 11:03 नवीन
काल अशीच एक अप्रतिम रांगोळी फेसबुकच्या कृपेने पहायला मिळाली. इच्छुकांनी इथे भेट द्यावी.
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Mon, 11/28/2011 - 07:39 नवीन
अप्रतिम ! speechless यार
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/29/2011 - 19:59 नवीन
हा भाग---मंजे रांगोळ्या- ठिकठाक आहेत :-)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/29/2011 - 21:59 नवीन
तिन्ही भागांतील रांगोळ्या अप्रतिम आहेत. कलाकारांचे अभिनंदन! आणि त्या इथे दाखवल्याबद्दल बाणाचेही अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा