Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असा मी तसा मी भाग-२

अ — अविनाश खेडकर, Tue, 11/15/2011 - 21:51
सत्तेच्या त्या खुर्चीसाठी सगळेच कसे खेळ खेळतात शेंडीवाले ब्राम्हणही आता सुंथेवाल्याच्या पायी लोळतात ............................................................ तु निघुन गेल्यावर नेहमिच असं घडणार डोळे कोरडे ठेवतांना मन मात्र रडणार .............................................................. आठवतय मला अजून झुल्यावर आपण झुललेलं तुझ्या अधरावर होतं प्रेमगीत खुललेलं ............................................................... गावकुसाच्या वडाची पाने असतात झडलेली जशी गावातील माणसचं म्हसणवाट्यात गाडलेली ............................................................... ध्येय आणि प्रयात्नासोबत दिशा जेंव्हा ठरवतो एक शुद्र कासव मग सशालाही हरवतो .............................................................. कोणीतरी ओळखावं म्हणून आपण सगळ करत असतो किर्तीच्या मोहापायी रात्रन् दिवस झुरत असतो ............................................................ पोर्णीमेच्या रात्री तुला गच्चीवरून पाहिली माझ्या मनाची फुले तुला त्या क्षणी वाहिली. ............................................................. रोजगार हमीच्या कामात शासनाने कहर केला तरुणपणी काम केलं म्हातारपणी पगार झाला ............................................................... माझं तुझ्यावर प्रेम जडलं यात काय गैर आहे? तरी तुला तसं वाटलचं तर ते गैर नाही तुझे प्रेमाशी वैर आहे. ................................................................ आपण लावलेले आंबे यंदा खूप मोहरले पण तु दुखावलेले मन आणखी नाही सावरले ............................................................... आपल्या पहिल्या भेटिचा प्रसंग अजुन मनात लपलाय तु चुकून दिलेला गुलाब मी आत्तापर्यंत जपलाय ..............................................................

Book traversal links for असा मी तसा मी भाग-२

  • ‹ असा मी तसा मी-१
  • Up
  • असा मी तसा मी भाग-३ ›

प्रतिक्रिया द्या
1962 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गार्गी_नचिकेत Wed, 11/16/2011 - 05:40 नवीन
"आपल्या पहिल्या भेटिचा प्रसंग अजुन मनात लपलाय तु चुकून दिलेला गुलाब मी आत्तापर्यंत जपलाय" खूप छान.......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/16/2011 - 05:42 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/16/2011 - 12:25 नवीन
असा मी, तसा मी च्या ह्या चारोळ्याही अतिशय सुंदर. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/16/2011 - 17:09 नवीन
सुंदर .. परंतु भाग १ जास्त छान होता... असेच लिहित रहा... वाचत आहे.....
  • Log in or register to post comments
अ
अविनाश खेडकर Wed, 11/16/2011 - 18:39 नवीन
गुलाबांच्या ताटव्यातून चालताना निवडुंगाकडे लक्ष दिल्याबद्ल धन्यवाद तुमचा लोभ आहे तोपर्यंत लिहीत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
द
दि ग्रेट मराठा गुरुवार, 11/17/2011 - 09:07 नवीन
अप्रतिम... खूप छान धन्यवाद...
  • Log in or register to post comments
अ
अविनाश खेडकर Fri, 11/18/2011 - 07:43 नवीन
दि ग्रत मराठा प्रतिक्रियेबद्ल आभारी आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा