पाककृती

सोया-पालक टिक्की

Primary tabs

Image removed. साहित्यः २ बटाटे उकडून कुस्करून घेणे साधारण १ वाटी पालक उकडून व पाणी निथळून घेणे १ वाटी सोया ग्रान्युल्स गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवून, हाताने दाबून पाणी काढून घेणे २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून १ टीस्पून लसुण बारीक चिरून १ टीस्पून आले बारीक चिरून २ टेस्पून पंढरपुरी डाळ कोरडीच भाजून घेणे २-३ टेस्पून ब्रेड क्रम्बस १/२ टीस्पून चाट-मसाला १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार तेल Image removed. पाकृ: मिक्सरच्या भांड्यात उकडलेला पालक, सोया ग्रान्युल्स, आले, लसुण, हिरव्या मिरच्या, पंढरपुरी डाळ, जीरे, चवीप्रमाणे मीठ, चाट-मसाला एकत्र करून वाटून घेणे. (चाट-मसाल्यात ही मीठ असते त्याप्रमाणे मीठ घालावे). Image removed. वाटलेले मिश्रण उकडून कुस्करलेल्या बटाट्यात घालणे, ब्रेड क्रम्बस घालून चांगले एकजीव करावे. Image removed. मिश्रणाचे गोळे करुन टिक्की बनवावी व नॉन-स्टीक पॅनमध्ये तेल तापवून शॅलो-फ्राय करावी. Image removed. तयार सोया-पालक टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस, चटणी बरोबर सर्व्ह करु शकता. ही टिक्की नुसती ही खायला छान लागते. आवडत असल्यास मिश्रणात थोडा गरम-मसाला ही घालू शकता. Image removed.
प्राजु

फोटो अ‍ॅज युज्वल .. कातिल आहेत!!

हा प्रकार नक्की करुन बघेन.
मस्त दिसतोय हा प्रकार. रात्री मिश्रण तयार करून ठेवून, सकाळी टिक्की बनवून लेकाला डब्यातही देता येईल.. असं वाटतं .
धन्यवाद गं.

आत्मशून्य

क्लेजा खल्लास झाला! मस्त.

प्रचेतस

_/\_
तुमच्याकडचं त्यांचं कलेक्शन अफाट आहे.

रेवती

मुलाच्या लंचबॉक्सला अजून एक प्रकार झाला.
साहित्य मांडण्यात यावेळी उच्च व्यवस्थितपणा आहे.
फोटू असा आलाय की बघत रहावा.
धन्यवाद!
अवांतर: यापेक्षा पर्फेक्शन आणून आम्हाला लाजवू नये ही विनंती.

सविता००१

सॉल्लीड ग सानिका! आता माझा हा वीकेंड पण ठरला :)

व्वा झक्कास दिसताहेत टिक्या. अभिनंदन.

एक शंका: फ्रायपॅन मध्ये ८ टिक्या असताना प्लेट मध्ये ७च का?

गणपा

मस्त दिसतायत टिक्क्या.
मनीच्या बाता : डाळे वापरले आहेतच तर याला हरभरा कबाब म्हणावे का ? ;)

गणपा

मेल्या चाळीशी लाव जारा. ;)

पिंगू

कातिल टिक्की...

- (झटक्यात स्वर्गवासी.. ) पिंगू

जाई.

प्रेझेँटेशन आणि पाककृती अतिशय सुंदर

स्मिता.

पाकृ लई म्हणले लईच भारी दिसतेय. मी फोटू बघून सांगू शकते की चव अप्रतिम असणार.

साहित्य मांडण्यात यावेळी उच्च व्यवस्थितपणा आहे.
फोटू असा आलाय की बघत रहावा. धन्यवाद!
अवांतर: यापेक्षा पर्फेक्शन आणून आम्हाला लाजवू नये ही विनंती.

बाकी रेवती ताईंच्या या वाक्यांशी १०१% सहमत!

Mrunalini

सहीच..... माझ्या सासुबाई ही टिक्की करतात. माझा आवडता प्रकार आहे. आठवण करुन दिलीस. आता घरी गेल्या गेल्या हे करणार.... :)

मदनबाण

मस्त... चमच्यात पदार्थ इतके मस्त मांडले आहेत ! :)

प्यारे१

टिक्की मस्त.

स्वगतः कित्ती चमचे आणि कित्ती भांडी? दिसतात छानच पण म्हणून स्वप्निलला एवढी सगळी घासण्याचं केवढं काम हे? ;)

यकु

काही बार मध्ये हीच पाकृ फक्त मध्ये काजू लाऊन 'हरभरा कबाब' म्हणून देतात त्याची आठवण झाली.
:)
विलासराव, काही आठवतंय का?

विलासराव

>>>>>>विलासराव, काही आठवतंय का?
नाय बॉ.

बाकी या टिक्या खायला आवडतील. पण कोण बोलवतच नाय.

५० फक्त

आता फक्त तो मिक्सर फिरवत असतानाचा व्हिडो यायचा बाकी आहे तेवढा आला की आम्ही मोकळे डिशा घेउन रांगेत बसायला, कधी येतीय टिक्की याची वाट बघत.

सानिकातै एकदा तुमच्या हातांचा फोटो काढुन पाठवा, फक्त हातात तो प्रसिद्ध चमचा धरुन काढा म्हणजे झालं.

यापुढं तुमच्या धाग्यांवर अवांतर प्रतिसाद द्यायचं ठरवलंय, उगा सगळुयांसारखं लिहुन लिहुन कंटाळा आलाय.

चिंतामणी

नुस्ते फटु आणि पाकृ टाकुन आम्हाला त्रास देण्याचा निषेध.

आधी एकाला सांगीतले आहेच ते पुन्हा सांगतो.

अश्या गोष्टी भारतभेटीत स्वतः बनवुन खायला दिल्या तरच यापुढे अभीप्राय देण्यात येइल.