कलादालन
रेखाचित्रे
Primary tabs
ही मी काढलेली काही रेखाचित्रे आहेत..विशेषतः मी ही सर्व चित्रे रांगोळी या स्वरुपात काढतो...परंतु पहिल्यांदा या रेखा चित्रे कलाप्रकारात तरबेज व्हावे लागते,कारण तोच पुढचा पाया आहे...म्हणुन आधी पाया दाखवत आहेत...कळस पुढे लवकर करु... ;-)

अप्रतिम कलाकुसर आहे तुमच्यामध्ये.
क्षमता
हेच म्हणायचंय ना?
मलाही....
:-)
वाह... सुरेख. :)
शेवटचे मुलीचे चित्र फारच आवडले.
ते माझ्या भावाच्या मुली चे चित्र आहे
स्रुजा नाव तिचे
अतिशय सुरेख!!
२र्या फोटोतले ते महाराज कोण आहेत?
ते हुबळी चे सिद्धारुढ महाराज आहेत
बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय हो तुमचा. चित्रे मस्त आहेत. अजुन जरा डार्क हवी होती हे वैयक्तिक मत (कि कॅमेरा फ्लॅशमुळे तसे दिसतेय?)
११ नंबरचे चित्र गोंदवल्याच्या मंदिराचे आहे काय?
ते मंदिर बहुदा बेळगावचं असावं, कारण कलावती मातेच्या बालोपासनेच्या पुस्तकावर या मंदिराचे चित्र आहे.
ते श्री हरीमंदीर बेळ्गाव चे आहे
श्री हरीमंदीराची उभारणी जेथे जेथे झालेली आहे तेथे तेथे मंदिराचा हाच आराखडा असतो.
जय कलावती माता की!
सर्व रेखाटने अप्रतिम आहेत.
कला आहे शेठ तुमच्या हातात.
साला आमचा टार्या देखील झकास चित्रकार आहे. आजकाल चित्रे काढतो का नाही माहित नाही.
होय टार्याची चित्रकला झक्कास आहे. पण त्याच्या हातात जरा जास्तच जोर असल्याने त्याच्या काही काही चित्रातले चेहरे त्याच्याच हातचा मार खाल्ल्यासारखे दिसतात.
सुपर्ब....... खूप छान.
आता आम्ही कधीकाळी काढलेली चित्रं शोधणं आलं. ;)
ते आणि कशाला? राहु द्या!!
कसलं गाsssर वाटल हा प्रतिसाद बघून ;)
- (गार पडलेला) सोकाजी
कित्ती कित्ती दुत्त एश तू शिप्पातै??????
नव्या नव्या चित्लकालांना पोस्साहन द्यायला शांगिटलंय ना शं-पादक (हीहीही हीहीही ;) ) काकांनी?
मं तू अशं का कल्तेश गं, दुट्ट? ;) ;)
आनि सोक्या बोक्या,
जा मी तुज्याशी गट्टाफू. बोल्नालच नै जा. आनि तुला कोम्पुटल ला पन हात नै लावू देनाल आमच्या. ;)
सगळीच उत्तम, उजवं-डावं करणं कठीण.
संवत्सर प्र-वर्तक चित्रकार कौस्तुभ यांचे स्वागत असो.... आज आली तुमची कलाबाई आमच्या मिपांगणात.. :-) अता कसं माणसात आल्यासारखं वाटतं का नाय? :-)
१) तो शेवटुन दुसरा-शर्ट घातलेला बाळक्रुष्ण आहे...?की बाळक्रुष्णाला शर्ट घातलाय..? ;-)
२) ती शेवटची छोटूश्शी राधा मात्र गो-गोड आहे...
आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.
आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.... ह्ही ह्ही ह्हा ह्हा :-D
मग अजीत पवारांना 'बल-राम' पुत्र म्हणावे काय? ;-)
जबरा स्केचिंग आहे तुमचं,
एलिमेंटरी आणि इंटर्मिजिएट दोन्ही परिक्षा आनंदानं नापास जाहलेला मी यापेक्षा जास्त काय लिहिणार.
कौस्तुभ, मिपावर स्वागत.
सर्वच रेखाचित्रे फारच अप्रतिम आहेत.
रेखाचित्रांमधलीसूक्ष्म कलाकुसरही अप्रतिम केली आहे.
सर्व रेखाचित्रे सुरेख आहेत!!
खूप छान आहेत सगळी रेखाचित्रे.
- (कधीकाळी ४-५ रेखाचित्रे काढलेला) सोकाजी
आपले विषय पाहता आपण सात्विक प्रवृत्तिचे असला पाहिजेत. उत्तम रेखाटने.
सुंदर :) :)
एकदम झकास कला आहे तुमच्या बोटात
खूप छान.. आवडले!
पु.रे.शु. :)
राघव
कलादालनात चित्रप्रदर्शन भरलयं आणि एक मस्त फेरफटका मारून आलोय असं वाटलं.
खूप छान बारकावे, तपशील भरून रेखाचित्रं काढली आहेत. मस्त. यांच्या आधारे काढलेल्या रांगोळ्या पहायची उत्सुकता आहे. लवकर येऊ द्या!
रेखा चित्रे अतिशय आवडली.
ही "रेखा चित्रे" कोण रे?? ;)
रेवतीआज्जी, जरा नातवाकडे (म्हणजे सुधांशुकडे) लक्ष द्या. बहुतेक तुमची गरज लवकरच पडणार असे दिसतेय. का तुम्ही भारतात येणार म्हणल्याबरोब्बर याने बाँब टाकलाय बघा?
अगदी अगदी.
अगदी प्रकटपणे त्याने लिहिलय.
दोन्ही प्रतिसादांना योग्य ती जागा दाखवल्या गेली आहे. :D
सगळी चित्रे आवडली.
कृष्णाच्या फोटोवरून एक प्रश्न.......तुम्ही महानुभाव आहात काय ?
सगळी रेखाटने अप्रतिम आहेत
अप्रतिम चित्रे आहेत
अतिशय छान.. डोळ्यांचे पारणे फेडणारे रेखाचित्रण..
- पिंगू
वरून ७ नंबर चित्राची मूर्ती आमचा घरी आहे. आणि तुम्ही जशीच तशी चित्रात उतरवालीय ....अप्रतिम !!!! :)
अप्रतिम रेखाटने. खुपच सुंदर. सरावाने अजुन जास्त सुंदर होतील यात शंका नाही. हॅट्स ऑफ तुम्हाला.
सुंदर आहेत सर्व रेखा चित्रे. अभिनंदन.
वर्तक साहेब प्रयत्न चांगला आहे. सिद्धारूढ स्वामी, ज्ञानेश्वर महाराज यांची चित्रे चांगली जमली आहेत.
खूप सुंदर. अतिशय आवडली. असं एक कृष्णाचं टेबल कॅलेंडर होत आमच्याकडे. तेच आठवलं. सुंदर कला आहे हो तुमच्या हातात
मी काढलेल्या चित्रांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
अतिशय उत्तम कला आहे तुमच्या हातात..
थोडी वेगवेगळ्या काळात काढल्यासारखी वाटतात. एकच चित्र वेगवेगळ्या दर्जाचं आलं आहे म्हणून...
संत तुकारामांचं चित्र, त्यातलं शेडिंग सर्वोत्तम आलं आहे या सगळ्या चित्रांमध्ये..
आता कळस येऊ द्या !
अतिशय सुंदर चित्रं..
ह्या चित्रांवरून काढलेल्या रांगोळ्यांचे फोटोही टाका इकडे.
खूप छान चित्रे!!!