जे न देखे रवी...
यौवनाची बाग
Primary tabs
कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या जीवनाची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या यौवनाची
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
सही लिहलय रे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
मस्तचं
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
हे जिवनाचा पाहिजे ना.?
युवक चेतन
"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली.
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
छानच.
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :)
पुण्याचे पेशवे
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
हे मस्तच!
पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
आवडली...
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? :W
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
वा! छान आहे...
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात?
रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :)
कविता छान आहे. आवडली.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
आवडल. फार दूरवरचा विचार केलाय पुष्कराजे!
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
हे विशेष आवडले.
चतुरंग