पाककृती

चिकन निजामी

Primary tabs

साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, तुकडे करुन घेणे. चिकन पीसेस ना थोडी हळद, लाल-तिखट व थोडे मीठ लावून मॅरीनेट करावे. Image removed. २ कांदे उभे चिरून , तळून त्यांची ब्राऊन पेस्ट करुन घेणे. १५-२० लाल सुक्या बोर मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) , २-३ टेस्पून सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, ४ लवंगा, १-१/२ टीस्पून जीरे, ७-८ अख्खी काळीमिरी किंवा १ टीस्पून काळीमिरीपूड. हे सर्व वेग-वेगळे कोरडेच भाजून एकत्र करणे व थोडे पाणी घालून मिक्सरवर वाटून घेणे. (काळीमिरीपूड वापरणार असाल तर भाजायची गरज नाही.) Image removed. ३/४ वाटी फेटून घेतलेले दही १/२ ते पाऊण वाटी नारळाचे दुध २-३ टेस्पून फ्रेश क्रिम १-१/२ टेस्पून आले+लसुण पेस्ट १/२ टीस्पून हळद १ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर ( ऑप्शनल आहे) १ -१/२ टीस्पून गरम-मसाला एक चिमुट केशर ३-४ थेंब केवडा एसेन्स बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी मीठ चवीनुसार तेल Image removed. Image removed. पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन त्यात आले+लसुण पेस्ट परतून घ्यावी. चांगली परतली गेली की त्यात लाल-मिरचीचे वाटण घालून चांगले परतावे. Image removed. मग त्यात कांद्याची ब्राऊन पेस्ट, हळद व काश्मिरी मिरची पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे. Image removed. त्यात आता चिकन पीसेस घालून एकत्र करणे. दही घालून , मिक्स करुन , झाकून चिकन शिजवावे. Image removed. चिकन जरा शिजत आले की त्यात चवीप्रमाणे मीठ व नारळाचे दुध घालावे. थोडे पाणी घालून परत झाकण लावून शिजु द्यावे. Image removed. चिकन पुर्ण शिजले की त्यात २-३ टेस्पून फ्रेश क्रिम घालणे व एक वाफ काढावी. (क्रिम खुप घालू नये नाहीतर दुधाळ होईल) Image removed. आता त्यात गरम-मसाला व केशर घालावे. Image removed. गॅस बंद करून त्यात ३-४ थेंब केवडा एसेन्स व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावे. वरून थोडे क्रिम घालून सर्व्ह करावे. Image removed. चिकन निजामी तयार आहे तुम्ही तंदुरी रोटी, नान किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करु शकता.
पियुशा

कसला कातील फोटू आहे ग :)
पण नॉन्-व्हेज खात नसल्यामुळे आम्ही यात पनीर घालु ;)

स्वाती२

जीवघेणा फोटो!

क्रिम घातले नाही तर चालेल का?

JAGOMOHANPYARE

छान. याचा वेज प्रकार करावा लागेल

अन्या दातार

च्यायला कसले निजामी अत्याचार आहेत हे!
हा पाकृ विभाग बंद का केल्या जाऊ नये? त्रास वाचेल काही बॅचलर लोकांचा, आणि काहींचा वाढेल ;)
हा विभाग चालू ठेवायचाच झाला तर 'इनो'कडून स्पॉन्सरशिप का घेऊ नये? ;)

एकदम आकर्षक पाककृती आहे. केशर, केवड्याचे पाणी (एसेन्स नाही) ह्यांच्या सोबत लिंबूरस घालावा पाककृती अजून चवदार होईल.
अभिनंदन.

कौशी

चवदार दिसतेय.. भाकरी सोबत खायला मजा येईल.

गणपा

आकर्षक पाककृतीचा तेवढाच आकर्षक फोटो.

सोत्रि

शेवटचा फोटो कातिल!
ह्या वीकएन्ड्चा मेन्यु फिक्स. सोबत रेड वाइन, मज्जा :)

- (ह्या पाकृमुळे इमान चाळवले गेलेला) सोकाजी