तू, फक्त हो म्हण

तू, फक्त एकदाच हो म्हण
आयुष्याचे तुझ्यासाठीच
असतील सारे क्षण
डोळ्यात उमटेल तुझ्या
माझेच प्रतिबि॑ब प्रतिक्षण
पण तू, फक्त एकदाच हो म्हण

लिहिलयं चागलं पण 'एकदाच' ह्या शब्दाचे प्रयोजन कळले नाही?
नातं हे दीर्धकालीन असावे / टिकावे अशीच अपेक्षा असते. 'हो ' एकदाच म्हटले जाते..दुसर्‍यांदा , तिसर्‍यादा ....नव्हे.
तू, फक्त एकदाच हो म्हण..परत हो म्हणू नकोस्..असं काहिसं वाटतयं ते.
त्यापेक्षा ' तू, फक्त हो म्हण' हे जास्त योग्य वाटेल.