पाककृती

गोल्डन फ्राइड प्रॉन्स

Primary tabs

माझी मिसळ-पाव वरील पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी... साहित्य: १. टाइगर प्रॉन्स २. बेसन ३. मैदा ४. तिखट व मीठ (चवीनुसार) ५. कोथिंबीर ६. लिंबू पाकृ: १. एका भांड्यात ३/४ बेसन व १/४ मैदाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे. २. ह्या मिश्रण मध्ये पाणी, मीठ व तिखट टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करावे. ३. ह्या मिश्रण मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र करून घ्यावे. ४. त्यात प्रॉन्स टाकून थोड्या वेळ फ्रिड्ज मध्ये ठेवावे. Image removed. ५. नंतर एका कढईत तेल घेऊन गरम करायला ठेवावे. ६. प्रॉन्स गरम तेलात गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्यावे. Image removed. ७. गरम गरम गोल्डन फ्राइड प्रॉन्स सेझवान सॉस बरोबर सर्व करावेत. Image removed.
पियुशा

अरे व्वा ! झक्कास जमली आहे पहिलीच पाक्रु.
येउ द्यात अजुन :)

अमृत

आणि चविष्ट (बनवल्यावर कळेलच) पाकृ...

अमृत

Mrunalini

मस्त पाकृ... तोंपासु :)

पैसा

मिपावर स्वागत!

बेसन असल्यामुळे याना कोलंबीची भजी म्हणावे काय?
(तुम्ही किंवा तुमची दीप्ती आयतीमधे आहात का?)

सुजित फाळके

होय कोलांबीची भजी म्हणायास हरकत नाही. मी प्रथम ही डिश गोवा मध्ये खाल्ली होती. त्यांनी ठेवलेले नाव मी कंटिन्यू केले आहे. (आणि होय मी आय.ती. मध्ये आहे.)

पैसा

आयटी वाले किंवा आयटी वाल्या बायकांचे नवरे एवढ्या नीटनेटक्या पाकृ देतात!

पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी...

मग, आम्ही काय करावे अशी इच्छा आहे. पाककृती बायकोसाठी असल्या कारणाने वाचलीही नाही. दुसर्‍यांची प्रेमपत्रे वाचू नयेत, असे म्हणतात.

गणपा

मिपावर स्वागत.
साधारण किती वेळ तळाव्यात?

सुजित फाळके

२-३ मिनिटे मध्यम आचेवर रंग गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळव्यात.

गवि

शाबास.. मस्त... जिंकलंस मित्रा..

पण शेवटच्या फोटोत तेलकट वाटतात.. तसेच असतात का ??

सुजित फाळके

बेसन भरपूर तेल शोषून घेते. कढई मधून काढल्यावर मी नेहेमी पेपर टॉवेल काढून तेल टॉवेल वर शोषून घेतो. फोटो काढन्याआधी मी हे केले नव्हते.

सुजित फाळके

पहिली पोस्ट असल्यामुळे फोटू चा काहीतरी प्रॉब्लेम झला आहे. काही लोकांना दिसत आहे आणि काही लोकांना दिसत नाहीए. मी ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे.

कपिलमुनी

मस्त आहे ..पण बेसन आणि मैदा घालून तळले तर आतमधील कोळंबी शिजते का ?
किती वेळ तळावी ??

सुजित फाळके

आतली कोलंबी छान शिजते. २-३ मिनिटे मध्यम आचेवर रंग गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळव्यात.

आनंदी गोपाळ

शेझवान सॉस घरी केला आहे का?
लसणाचे तुकडे 'दिसत' नाहियेत त्यात, म्हणून विचारलं.