साहित्य:
१ वाटी अख्खे काळे उडीद+ २ टेस्पून राजमा रात्री भिजवून, सकाळी कुकरला थोडे मीठ घालून शिजवून घेणे.
१ कांदा बारीक चिरलेला
२ टोमॅटोची प्युरे
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट
१ टीस्पून जीरे
२ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
२ टेस्पून साजूक तूप
३-४ टेस्पून क्रीम
पाकृ:
कढई किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून जीर्याची फोडणी करावी. त्यात आले+लसूण पेस्ट घालून परतून घ्यावी.
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा.
कांदा चांगला परतला गेला की त्यात टोमॅटोची प्युरे घालून नीट शिजवून घ्यावी.
लाल-तिखट व धणेपूड घालून तेलसुटेपर्यंत परतून घ्यावे.
आता त्यात शिजवलेली डाळ घालावी, लागेल तसे पाणी घालून उकळी आणावी. त्यात चवीनुसार मीठ घालावे. (डाळ शिजवताना मीठ घातले आहे त्याप्रमाणे घालावे.)
उकळी आली की त्यात क्रीम घालावे व एकत्र करावे.
आवडत असल्यास थोडे बटर घालावे.
वरून गरम-मसाला भुरभूरावा व नीट एकत्र करावे .
सजावटीकरता थोडे क्रीम घालावे व गरमा-गरम दाल-मखनी जीरा राईसबरोबर सर्व्ह करावी.
मी आयुष्यात पहिल्यांदाच इथे(म्हणजे खडगपुरात) असली दाल मखनी चाखली.
याचेच दुसरे वर्जन म्हणजे दाल फ्राय मध्ये मखणे (कमळाचे बी) घालून केलेली रेसिपी. दोन्ही प्रकार बघून अवाक झालेलो होतो. महाराष्ट्रात असताना कुठल्याही हॉटेलात दाल मखनी म्हणजे बटर घालून केलेले दाल फ्राय खाल्ले होते. परत कधीही ही डिश ऑर्डर करायची नाही असा कानाला खडाच लावला.
अवांतरः पहिल्या चित्रातला बाऊल अगदी अल्लादिनच्या चिरागसारखा दिसतोय. जरा घासला तर कदाचित "क्या खाना चाहते हो मेरे आका?" असा प्रश्न येईल असं वाटलं!
अवांतरः पहिल्या चित्रातला बाऊल अगदी अल्लादिनच्या चिरागसारखा दिसतोय. जरा घासला तर कदाचित "क्या खाना चाहते हो मेरे आका?" असा प्रश्न येईल असं वाटलं!
वाटतंय काय अन्या, ह्या लोकांकडे आहेतच असले दिवे, अन ही माणसं म्हणजे आपले दिवे, काही अडलं की या मिपाला अन हुडका रेशिपि असं झालंय.
बाकी उडदाची डाळ पहिल्यांदा भिमानगरच्या सरदारजीच्या धाब्यावर खाल्लेली होती, फारशी आवडलेली नाही कधीच. वरण म्हणलं की पिवळं अन आमटी म्हणली कांदा चिंच गुळाची, नायतर ४ इंचाच्या किमान ३० शेवगाच्याच्या शेंगा घातलेली आणि फार होम्सिक व्हायला लागलं तर शेंगाची, बास...
अवांतर : ह्या दोघांनी (सास्व आणि गभाऊ) छळवाद मांडला आहे....
आत्मशून्य
01/04/2012 - 13:34
मस्तच पुण्यात कोरेगावपार्क लेन ७ मधिल एका साध्या हाटिलात (पंजाबी किचन बहुतेक अथवा आता नाव बदललं असेल छोटं पण हाउस्फुल हाटील आहे) हे अन पनिर बुर्जी लय म्हंजे लय म्हंजे लैयच बेस मिळतं, तेव्हापासुनच फेवरीट है.
मस्त
पाकृ आणी प्रेझेँटेशन सुंदर
nice recipe..

अगदी हेच मनात आले...
बाकी पा़कॄ झकासच!
मस्त रेसेपी :)
सुंदर पाककृती आणि सजावट. अभिनंदन.
सुंदर.
तुमच्या पाकृ म्हणजे कमाल असतात. अगदी अव्वल दर्जाच्या.
साहित्यातील चमच्यांच्या जोड्या पाहून डोळे पाणावले.;)
सजावट छान झालिये.
पदार्थाबद्दल बोलत नाही. चांगला झाला असणारच.
आवडली.
आवडली.
आवडली.
दिसतेय तर छान..
तुमच्या सादरीकरणाला फुल मार्क्स. :)
पण आपला उडदाच्या मखनीला पास.
ती बुळबुळीत डाळ कधी आवडलीच नाही.
>>>पण आपला उडदाच्या मखनीला पास.
ती बुळबुळीत डाळ कधी आवडलीच नाही.
गणपा- एक सांग. उडदाचे घुटे कधी खाल्ले नाही का? :O :-O :shock:
नेहमी प्रमाणे...सगळ्यालाच-
सलाम..!
सलाम..!
सलाम..!
मखना ओय मखना
सुंदर सादरिकरण आणि चविष्ट दिसणारी पाक्रू दोन्हीही खूपच आवडले.
काय बोलणार??
सगळंच छान आणि अफलातून आहे.
नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण आणि चविष्ठ पाककृती...... टोप्या उडवल्या आहेत :) :)
काळी डाळ नाहि भावत..
आपली रेग्युलर पिवळी तुर डाळ मस्त..
फक्त उड्दाची डाळ थोडी मेणचट लागते सोबत थोडी चण्याची डाळ घालुन केली तर मला जास्त आवड्ते !! बाकी फोटो आणि प्रेझेंटेशन नेहेमीप्रमाणे उत्क्रुष्ट !! :)
पाकृ बघायला आवडल्या गेली आहे.
खायला आवडेलच ह्याची ग्यारंटी नाय.
पाकृ आणि प्रेझेंटेशन...
अवांतर : ह्या दोघांनी (सास्व आणि गभाऊ) छळवाद मांडला आहे....
मस्तच पुण्यात कोरेगावपार्क लेन ७ मधिल एका साध्या हाटिलात (पंजाबी किचन बहुतेक अथवा आता नाव बदललं असेल छोटं पण हाउस्फुल हाटील आहे) हे अन पनिर बुर्जी लय म्हंजे लय म्हंजे लैयच बेस मिळतं, तेव्हापासुनच फेवरीट है.
पाकृ नेहमीप्रमाणे एकदम मस्त.
प्रेझेंटेशन आणि पुर्वतयारी तर एकदम अप्रतिम.
फोटो खुप छान आले आहेत.
पाकृ आणी प्रेझेँटेशन सुंदर.
दिव्याबद्दल I mean बौलबद्दल अनेकांनी लिहीले आहेच.
सुहास झेलेंशी बाडीस.
(वेगळे लिहायचे तर असे म्हणतो "तुमच्या हातचे खाण्याचा योग लौकर येवो") :) :-) :smile:
आणि मस्त फोटो! ते नीट लावून ठेवलेले चमचे पाहिले की आम्हाला भयंकर कॉम्प्लेक्स येतो...
आणि त्या चमचमीत पाकृ येथे पाहून त्या हाटेलात सतत खाउन खाउन आमचे तोंड येते मग आम्हाला बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खाव्या लागतात.
अतिशय सुंदर.............
प्रेझेंटेशन झकास......................:)
सुंदर पाकृ आणी प्रेझेँटेशन ..
पण असल्या डाळि, राजमा आणि तो सोयाबिन मला मेसध्ये खायच्या दिवसांची आठवण करुन देतो..